agriculture news in marathi, heavy rain in west Maharashtra, Maharashtra | Agrowon

मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाचा अंदाज
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

पुणे : राज्याचा दक्षिण भागात असलेल्या जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन - तीन दिवसांपासून वादळी पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली आहे. बुधवारी रात्री पश्‍चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार सरी कोसळल्या. वादळीवाऱ्यासह आलेल्या पावसाने भात, ऊस, सोयाबीन पिकांचे नुकसान झाले. आज (ता. २८) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जना, विजांसह वादळी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

पुणे : राज्याचा दक्षिण भागात असलेल्या जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन - तीन दिवसांपासून वादळी पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली आहे. बुधवारी रात्री पश्‍चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार सरी कोसळल्या. वादळीवाऱ्यासह आलेल्या पावसाने भात, ऊस, सोयाबीन पिकांचे नुकसान झाले. आज (ता. २८) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जना, विजांसह वादळी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

बुधवारी सकाळपासून असलेल्या कडक ऊन आणि उकाड्यानंतर सायंकाळी ढग दाटून आले. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. कोल्हापूर, सातारा, सांगलीत अनेक ठिकाणी सुमारे दीड तास दमदार पाऊस पडत हाेता. कोल्हापुरातील मुरगुड येथे सर्वाधिक ११० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.

वादळी वाऱ्यामुळे ऊस, भात पिके आडवी होऊन साचलेल्या पाण्यात भिजल्याने फटका बसणार आहे. तर काढणीस आलेल्या साेयाबीन पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. पुणे, सोलापूर, मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतही हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. तर दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. 

 मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होण्यास पोषक स्थिती तयार होत असून, गुरुवारी राजस्थामध्ये वाऱ्यांची दिशा बदलल्याचे दिसून आले. शनिवारपर्यंत माॅन्सून परतीच्या प्रवासाला सुरवात होण्याची शक्यता आहे. उत्तर कर्नाटकपासून मनारच्या आखातापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय अाहे. तर दक्षिण कर्नाटक आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत अाहेत. यामुळे राज्याच्या दक्षिण भागात पावसाला पोषक हवामान होत असून वादळी पावसाची शक्यता आहे. तसेच समुद्र खवळल्याने उंच लाटा उसळ्याचा इशाराही देण्यात आला आहे.

पुणे : जुन्नर तालुक्यात विविध ठिकाणी जाेरदार पाऊस. गाेळेगाव येथे पडत असलेल्या सरींचा video

गुरुवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - कृषी विभाग) : 
 कोकण : गुहाघर ७५, पाटपन्हाले ७४, अबलोली ८०, रत्नागिरी ७०, पावस ३४, फणसोप ४८, कोटवडे ३५, तरवल ३४, पाली ३२, कडवी ४६, फुणगुस ३४, अंगवली ३७, माभले ३२, तेरहे ५३, राजापुर ४०, लांजा ३४, भांबेड ४५, पुनस ३०, साडवली ३८, विलवडे ३५, श्रावण ३२, मदुरा ३५, भुइबावडा ३५, तालवट ३१. 
 मध्य महाराष्ट्र : दौंड २४, जेजूरी २१, चळे २०, जवळा ४३, अपशिंगे २२, आनेवाडी २४, कुडाळ २२, पाटण २४, कराड ४७, कोपर्डे-हवेली ४३, सैदापूर ४१, शेणोली ३७, काले ३४, मलकापूर ४५, कोरेगाव २८, शिरंबे २९, वाठार-किरोली ४२, औंध ४६, पुसेसावळी ३४, मायणी ४०, कातरखटाव ३३, दहिवडी २६, गोंदावले ३५, कुक्‍कुडवाड ३७, मार्डी ५१, शिंगणापूर २८, तरडगाव २२, बुधगाव २५, मिरज ३५, सांगली २८, संख ५५, माडग्याळ ५०, जत २९, मुचुंडी ३८, डफळापूर २२, कुंभारी २०, शेगाव ४३, करंजे ६०, लेंगरे २४, विटा ५१, कोरेगाव ३५, कुरळप २९, तांदूळवाडी ४७, आष्टा ४०, इस्लामपूर २६, मणेराजूरी २४, तासगाव २८, कोकरुड २३, शिराळा ३०, शिरसी ३३, मांगले ४९, सागाव ५८, देशिंग ४९, कवठेमहांकाळ ३९, हिंगणगाव ५२, भिलवडी ४४, कुंडल २७, अंकलखोप ३८, पलूस ३२, वांगी ३५, नेवरी २७, कडेगाव २५, शाळगाव ३४, हातकणंगले २४, हेर्ले ३९, शिरोळ ४०, नांदणी २६, जयसिंगपूर २५, शिरढोण २१, दत्तवाड २२, वाडी-रत्नागिरी ३४, कोडोली ३४, बाजार २३, राधानगरी ४५, सरवडे ३६, आवळी ४१, राशिवडे २८, कसबा ५५, करवीर ७२, निगवे ७२, मुडशिंगी ६८, शिरोली-दुमाला ४०, इस्पूर्ली २२, कणेरी ३६, कागल ५२, सिद्धनेर्ली ५१, केनवडे ३६, मुरगुड ११०, बिद्री ४३, गडहिंग्लज २४, दौंडगे २६, नेसरी २७, गारगोटी ३५, कूर ४१, कोवाड ३२, हेरे ३८. 
 मराठवाडा : बोरोळ २२, लोहारा २३.

इतर अॅग्रो विशेष
कडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...
सकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...
भारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...
मुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...
खरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...
सरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...
नर्सरी मॅन ऑफ वरुड- जावेद खान अमरावती जिल्‍ह्यातील वरुड मोर्शी या प्रसिद्ध...
दुष्काळातही विस्तारला देशी गोवंश व्यवसायकायम दुष्काळी खानापूर तालुक्यातील अडसरवाडी (जि....
नांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड   ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...
वाढते नैसर्गिक आणि सामाजिक प्रदूषणकाळानुसार निसर्गामध्ये खूप बदल होत आहे. सर्व ऋतूत...
लढा स्वतंत्र अस्तित्वाचा अस्सल हापूस कोणाचा हा गुंता मागील अनेक...
नांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...
संतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...
जलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती   : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...
तिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर  : पाथर्डी तालुक्‍यात...
तुझे आहे तुजपाशी जगाच्या सरासरीच्या दीडपट पाऊस भारतात पडतो तरी...
सूक्ष्म सिंचनात अडचणी मोठ्या राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष...
भातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...
ठिबकचा तिढा सुटला, नोंदणीला होणार सुरवातनागपूर  ः ठिबक संदर्भातील नोंदणीवर वितरकांनी...