agriculture news in marathi, Heavy rainfall alert for Konkan, Central maharashtra | Agrowon

कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा अंदाज
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 7 जून 2018

पुणे  : मॉन्सूनचे महाराष्ट्रातील प्रवेशद्वार असलेल्या तळ कोकणामध्ये आज (ता.७) मॉन्सून दाखल होण्याचे संकेत आहेत. मॉन्सूनच्या आगमनाबरोबरच तळकोकणात पाऊस सुरू होणार अाहे, तर शनिवारपासून (ता. ९) मुंबईसह कोकणात धुवाधार पावसाचा अंदाज असून, सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातही शनिवारपासून मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

पुणे  : मॉन्सूनचे महाराष्ट्रातील प्रवेशद्वार असलेल्या तळ कोकणामध्ये आज (ता.७) मॉन्सून दाखल होण्याचे संकेत आहेत. मॉन्सूनच्या आगमनाबरोबरच तळकोकणात पाऊस सुरू होणार अाहे, तर शनिवारपासून (ता. ९) मुंबईसह कोकणात धुवाधार पावसाचा अंदाज असून, सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातही शनिवारपासून मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

तळ कोकणात उद्या जोरदार (६५ ते १२५ मिलिमीटर) पाऊस पडणार असून, मंगळवार (ता. १२) पर्यंत अतिजोरदार (१२५ ते १९५ मिलिमीटर) पावसाचा इशारा आहे. मुंबईसह उत्तर कोकणातील काही भागात १९५ मिलिमीटरपेक्षाही अधिक पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर, सातारा, सांगलीसह दक्षिण महाराष्ट्रात रविवारपर्यंत (ता. १०) तर उत्तर महाराष्ट्रात शनिवार ते मंगळवार या कालावधीत जोरदार पाऊस पडणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कोकण आणि गोव्याच्या किनाऱ्यालगत ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळे समुद्र खवळणार असून, शुक्रवार ते मंगळवार या काळात मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे. 

राज्यात पूर्वमाेसमी पाऊस पडत असून, बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरीतील नाटे, कुंभवडे, विलवडे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेंडूर, वेटोरे, सांगवे, येडगाव येथे जोरदार पाऊस पडला. नाटे येथे ८८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नंदूरबार, नगर, कोल्हापुरात अनेक ठिकाणी पाऊस झाला. कोल्हापुरात पावसाचा जोर अधिक हाेता. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यांमध्येही वादळी पावसाने हजेरी लावली आहे. बुधवारी (ता.६) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३४.३, जळगाव ४०.६, कोल्हापूर ३२.४, महाबळेश्वर २७.१, मालेगाव ४०.२, नाशिक ३६.१, सांगली ३५.४, सातारा ३२.५, सोलापूर ३७.२, मुंबई ३३.५, अलिबाग ३३.६, रत्नागिरी ३१.८, डहाणू ३५.३, आैरंगाबाद ३५.४, परभणी ३४.४, नांदेड ३४.०, अकोला ४१.४, अमरावती ४१.६, बुलडाणा ३७.८, चंद्रपूर ४०.०, नागपूर ४०.९, वर्धा ४२.०, यवतमाळ ३९.०. 

इतर अॅग्रो विशेष
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...
राजकीय उपद्रव्य मूल्य घटल्याने...मुंबई: मर्यादित जनाधार आणि राजकीय उपद्रव मूल्य...
सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावांची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ११४५...
विदेश अभ्यास दौऱ्याच्या शेतकरी यादीत...पुणे : विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेल्या...
क्रांती कारखाना हुमणीचे भुंगेरे खरेदी...कुंडल, जि. सांगली : एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
परवानाधारक व्यापाऱ्यांनीच केळीची खरेदी...जळगाव : चोपडा बाजार समिती दरवर्षी १४...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर...पणजी : देशाचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे...
आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? दुष्काळ पडल्याने पाण्यासाठी बोअर घेण्याची अक्षरशा...
कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नती मिळाली, पण...पुणे : राज्यातील कृषी पर्यवेक्षकांना शासनाने मंडळ...
दुष्काळी मराठवाड्यात मार्चमध्येच ‘केसर'...केज, जि. बीड ः फळांचा राजा आंबा बाजारात...
मिरची पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार (प्रतिनिधी) ः खानदेशातील मिरचीचे आगार...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...
परभणी ठरले देशात उष्णपुणे : राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३७ अंशांच्या...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक थांबणार कधी?नाशिक: नाशिक जिल्ह्यातील मुख्य अर्थकारण...
यवतमाळच्या अनिकेतने तयार केला फवारणीचा...यवतमाळ ः फवारणीमुळे होणाऱ्या विषबाधा सर्वदूर...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर...पणजी : गेल्या एक वर्षापासून अधिक काळ...