agriculture news in marathi, Heavy rains in Marathwada | Agrowon

उस्मानाबाद, नांदेड, लातूर, हिंगोली जिल्ह्यांत सर्वाधिक जोर
टीम अॅग्रोवन
रविवार, 24 जून 2018

औरंगाबाद : मराठवाड्यातील बहुतांश भागात शनिवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाने जोरदार हजेरी लावली. उस्मानाबाद, नांदेड, लातूर, हिंगोली जिल्ह्यांत पावसाचा जोर सर्वाधिक होता. तर औरंगाबाद, बीड, परभणी जिल्ह्यांतील काही तालुक्‍यांत पावसाची बॅटिंग दमदार राहिली. या पावसामुळे नदी, नाले, दुथडी भरून वाहू लागले. ३२ मंडळांत पावसाने चांगलीच दाणादान उडवत ६५ ते १५२ मिलिमीटर दरम्यान हजेरी लावली. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगाव तालुक्‍यात तर पावसाने कहरच केला. या तालुक्‍यात बांध फुटून मोठ्या प्रमाणात जमिनीचे नुकसान झाल्याची घटना घटली.

औरंगाबाद : मराठवाड्यातील बहुतांश भागात शनिवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाने जोरदार हजेरी लावली. उस्मानाबाद, नांदेड, लातूर, हिंगोली जिल्ह्यांत पावसाचा जोर सर्वाधिक होता. तर औरंगाबाद, बीड, परभणी जिल्ह्यांतील काही तालुक्‍यांत पावसाची बॅटिंग दमदार राहिली. या पावसामुळे नदी, नाले, दुथडी भरून वाहू लागले. ३२ मंडळांत पावसाने चांगलीच दाणादान उडवत ६५ ते १५२ मिलिमीटर दरम्यान हजेरी लावली. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगाव तालुक्‍यात तर पावसाने कहरच केला. या तालुक्‍यात बांध फुटून मोठ्या प्रमाणात जमिनीचे नुकसान झाल्याची घटना घटली.

पुन्हा एकदा कायम अवर्षणाचा सामना करणाऱ्या लातूर, उस्मानाबाद, बीड या जिल्ह्यांसह हिंगोली, परभणी, नांदेड या शाश्वत पावसाच्या जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी लागली. हिंगोली जिल्ह्यात सरासरी ४७.८९ मिलिमीटर, नांदेड जिल्ह्यात २४. ५६ मिलिमीटर, बीड जिल्ह्यात १०.२८ मिलिमीटर, लातूर जिल्ह्यात ४५.४३ मिलिमीटर, उस्मानाबाद जिल्ह्यात ३०.२५ मिलिमीटर, औरंगाबाद जिल्ह्यात १२.०९ मिलिमीटर, परभणी जिल्ह्यात १५.७७ मिलिमीटर तर जालना जिल्ह्यात सरासरी ५.९२ मिलिमीटर पाऊस पडला.

परभणी जिल्ह्यातील दोन, हिंगोली जिल्ह्यातील सहा, नांदेड जिल्ह्यातील सहा, बीड जिल्ह्यातील एक, लातूर जिल्ह्यातील तेरा तर उस्मानाबाद जिल्ह्यातील चार मंडळांत ६५ ते १५२ मिलिमीटर दरम्यान पाऊस पडला. पाऊस पडलेल्या भागातील नदी-नाले दुथडी भरून वाहले तर जलसंधारणाची कामेही तुडुंब झाली. औरंगाबाद जिल्ह्यातील ३४ मंडळांत शनिवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाने हजेरी लावली. पावसाची हजेरी लागलेल्या एकूण मंडळांपैकी १७ मंडळात २७ ते ५८ मिलिमीटरदरम्यान पाऊस पडला. त्यामध्येही पाच मंडळांत ४० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला. औरंगाबाद तालुक्‍यातील दोन, फुलंब्रीतील तीन, पैठणमधील तीन, सिल्लोडमधील चार, गंगापूरमधील एक, कन्नडमधील चार, तर खुलताबाद तालुक्‍यातील एका मंडळांत दमदार ते जोरदार पाऊस पडला.

नारंगवाडी, मुळज मंडळ विभागांत बांध फुटले
अतिवृष्टीने नारंगवाडी, मुळज मंडळ विभागांत शेतीचे बांध फुटुन मोठे नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांचे पेरणी केलेले क्षेत्र वाहून गेले आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या वळण रस्त्यालगतच्या शेतातील बांध फुटले, काही ठिकाणी रस्ते खचले आहेत. काही शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे, पाण्याच्या मोठ्या प्रवाहाने मातीसह कोवळ्या मोडांना धोका झाला आहे. सात जूनच्या मध्यरात्रीनंतर झालेल्या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या ठिकाणाची सारवासावर करताना पुन्हा दुसऱ्यांदा पावसाने दणका दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान पळसगाव पाझर तलावाचा बांध फुटल्याने प्रताप पाटील, बलभिमराव पाटील, नानाराव पाटील, मोतीराम कदम, राजाराम कदम, सुर्यभान सोमवंशी, उद्धवराव पाटील, अनुसया पाटील, मोहन गायकवाड आदी शेतकऱ्यांच्या शेतीतील माती, भराव वाहून गेला आहे, ऊसासह अन्य पिकात पाणी साचले आहे. उमरगा तालुक्‍याची पावसाची वार्षिक सरासरी ७९९ मिलिमीटर आहे. एक ते जूनपर्यंत ३२२.८ मिलिमीटर पाऊस झाल्याने यंदा सरासरी ओलांडण्याची शक्‍यता आहे.

उमरग्यात पावसाचा कहर
उमरगा शहर व तालुक्‍यात शुक्रवारी (ता. २२) रात्री झालेल्या अतिवृष्टीने संपूर्ण शहर जलमय झाले.  शेतशिवारातील बांध फुटून शेतीचे मोठे नुकसान झाले. उमरगा, मुळज व नारंगवाडी मंडळ विभागात ढगफुटी झाल्यागत पाऊस पडल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले.

 

फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
अब आया उंट पहाड के निछे; राजू शेट्टींचा...सोलापूर : शेतकऱ्यांच्या दूध दराच्या प्रश्‍...
सरकार रिलायन्स, पतंजलीच्या दुधाची वाट...नागपूर : एकीकडे समाधानकारक पाऊस पडत असताना...
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस-...नागपूर : कधी देणार कधी देणार...कापूस, धानाला...
पीक सल्ला१६ जुलै ते ३१ जुलैपर्यंत पेरणी लांबल्यास संकरीत...
खानदेशात दूध आंदोलनास अल्प प्रतिसादजळगाव ः खानदेशात कुठेही दूध आंदोलनाला उग्र स्वरुप...
संत गजानन महाराज पालखीचे सोलापुरात...सोलापूर : पावसाच्या संततधार सरी झेलत ‘गण गण गणात...
रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेधसांगली ः दूध दरवाढीच्या स्वाभिमानी शेतकरी...
दूध दरप्रश्नी तारसा फाटा येथे आंदोलननागपूर  ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
पुणे जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलनपुणे  ः  दूध दरप्रश्‍नी स्वाभिमानी...
दूध दरप्रश्‍नी वऱ्हाडात आंदोलनअकोला   ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
मराठवाड्यात विविध ठिकाणी दूध संकलन बंदऔरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या आंदोलनाच्या...
नगर जिल्ह्यात दूध संकलन बंदनगर  : दूध दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी...
केनियात आढळल्या पिवळ्या वटवाघळांच्या...केनियामध्ये पिवळ्या रंगाच्या वटवाघळांच्या जनुकीय...
सातारा जिल्ह्यात दूध दर आंदोलनास मोठा...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला...
झाडांच्या संवर्धनामध्ये हवामान बदलासोबत...तापमानवाढीमुळे अधिक उंचीकडे किंवा उत्तरेकडे...
नागपूर, गडचिरोलीत संततधारनागपूर  : हवामान विभागाने विदर्भात सोमवारी (...
मराठवाड्यातील २४५ मंडळांत पावसाची रिपरिपऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी जवळपास...
पुणे जिल्ह्यात दमदार पाऊसपुणे   : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली...
अकोले तालुक्यात पावसाचा जोर कायमनगर   ः अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील २६...नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६...