agriculture news in marathi, Heavy rains in various places in Varahaad | Agrowon

वऱ्हाडात विविध ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी
टीम अॅग्रोवन
रविवार, 24 जून 2018

अकोला ः अकोला व बुलडाणा जिल्ह्यांत शनिवारी (ता. २३) सकाळी बऱ्याच ठिकाणी ढगांच्या गडगडासह पाऊस झाला. मोताळा तालुक्यात वीज पडून एका ४० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. अकोला, बाळापूर, बुलडाणा, मोताळा या तालुक्यांमध्ये पावसाने चांगली हजेरी लावली. शनिवारी पहाटेपासून पावसाला सुरवात झाली होती. सुमारे दीड ते दोन तास हा पाऊस झाला.

अकोला ः अकोला व बुलडाणा जिल्ह्यांत शनिवारी (ता. २३) सकाळी बऱ्याच ठिकाणी ढगांच्या गडगडासह पाऊस झाला. मोताळा तालुक्यात वीज पडून एका ४० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. अकोला, बाळापूर, बुलडाणा, मोताळा या तालुक्यांमध्ये पावसाने चांगली हजेरी लावली. शनिवारी पहाटेपासून पावसाला सुरवात झाली होती. सुमारे दीड ते दोन तास हा पाऊस झाला.

मोताळा तालुक्यात अाव्हा येथे विमलताई श्रीराम घोंगटे (वय ४०) ही महिला सकाळी १० वाजेदरम्यान शेतात काम करीत असताना त्यांच्या अंगावर वीज पडली. यात त्यांचा मृत्यू झाला. दमदार पावसामुळे मोताळा तालुक्यात विविध नाल्यांना पाऊस वाहला. कोथळी परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने शेतशिवारांमध्ये सर्वत्र पाणी साचले होते. या मोसमात हा पहिलाच दमदार पाऊस ठरला.
रिधोरा परिसरात बियाणे गेले वाहून

बाळापूर तालुक्यातही गेल्या २४ तासांत ठिकठिकाणी पाऊस पडला. रिधोरा शिवारात पवन अग्रवाल यांनी ठोक्याने १६ एकर शेतात शुक्रवारी कपाशीची पेरणी केली होती. जोरदार पाऊस झाल्याने शेतात सर्वत्र पाणी साचले. काही ठिकाणी जमीन खरडून गेली. यामुळे लागवड केलेले बियाणेसुद्धा वाहून गेले अाहे, यामुळे अग्रवाल यांचे मोठे नुकसान झाले अाहे.

इतर ताज्या घडामोडी
...तर जिनिंग मिल मालकांविरोधात कारवाई ः...वर्धा   ः गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी...
अकोले तालुक्‍यात पावसाचा जोर कायमनगर  : अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
स्वाभिमानीचा सर्जिकल स्ट्राईक,...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून...
सातारा जिल्ह्यात दूध दरप्रश्नी तिसऱ्या...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...
संतश्रेष्ठ तुकोबाराय पालखीचे सोलापूर...सोलापूर : पिटू भक्तिचा डांगोरा । कळिकाळासी दरारा...
कोयना, कण्हेर धरणांतून विसर्गसातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. बुधवारी...
कर्नाटकातून येणारे दूध आंदोलकांनी अडवलेसोलापूर :  दुधाच्या वाढीव दरासाठी स्वाभिमानी...
किणी टोल नाका येथे पोलिसांची जबरदस्ती;...कोल्हापूर- : स्वाभिमानीने शेतकरी संघटनेने पुणे...
कनिष्ठ सहायकाची एक वेतनवाढ बंदनाशिक  : जिल्हा परिषदेची सभा असो की मुख्य...
भेंडीची वेळेवर लागवड आवश्यकभाजीपाला पिकांमध्ये भेंडी पिकाची लागवड वाढत आहे....
दूध दरप्रश्‍नी राज्य सरकार दोषी : राज...पुणे  ः दूधदराचा प्रश्न गंभीर होत आहे....
पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये १०६ टीएमसी...पुणे  : जिल्ह्यातील पश्‍चिम भागात असलेल्या...
बुलडाणा, वाशीममध्ये दूध दरप्रश्‍नी...अकोला  ः दुधाला प्रतिलिटर पाच रुपये दर...
पोषक घटकांनीयुक्त शेळीचे दूधभारतामध्ये प्रामुख्याने गायीच्या व म्हशीच्या...
मराठवाड्यात तिसऱ्या दिवशीही दूध...औरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या गेलेल्या...
कोल्हापुरात हिंसक वळणकोल्हापूर : दूध आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी...
चंद्रकांतदादांच्या आश्वासनानंतर उपोषण...परभणी  ः पीकविमा परताव्यापासून वंचित...
शेतकऱ्यांना बोंड अळीची नुकसानभरपाई...नाशिक  : गेल्या वर्षी बोंड अळीमुळे कापूस...
खानदेशात ८० टक्के पेरणी उरकलीजळगाव : खानदेशात जवळपास ८० टक्के क्षेत्रावर पेरणी...
हाँगकाँग येथे जांभळ्या रताळ्यापासून...हाँगकाँग येथील एका खासगी साखळी हॉटेल उद्योगाने...