बुलडाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई

बुलडाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई
बुलडाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई

बुलडाणा ः गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच जिल्ह्यातील पाणीटंचाई अतितीव्र झाली असून, हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. टॅंकर सुरू असलेल्या गावांमध्ये पाण्यावरून किरकोळ वादविवाद होऊ लागले. शेगाव तालुक्यातील चिंचोली (कारफार्मा) या गावात दोन दिवसांपूर्वी टॅंकर आल्यानंतर पाणीवाटपाच्या वेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नंतर ही परिस्थिती सुरळीत झाली.  जिल्ह्यात सद्यःस्थितीत २२६ गावांत २३८ टँकरने पाणी पुरविले जात आहे. तर, ४२८ गावांमध्ये ५९१ उपाययोजना प्रस्तावित आहेत. त्यापैकी २१५ गावांत २८३ कामांना मंजुरी देण्यात आली. ११३ गावांतील १५५ कामे पूर्ण झाली आहेत. ११० गावांत नळ योजनांची विशेष दुरुस्ती मंजूर करण्यात आली. २२७ गावांमध्ये ७२७ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.  जिल्ह्यात संतनगरी शेगावला लागून असलेल्या चिंचोली या ५००० लोकसंख्येच्या गावात पाणीटंचाईचा कहर झालेला आहे. दरम्यान, या गावचे सरपंच व पदाधिकाऱ्यांनी पाणीटंचाईचा अहवाल पंचायत समितीला दिला होता. या भागाचे आमदार डॉ. संजय कुटे यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर या गावात पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले. चिंचोलीप्रमाणेच इतर गावांची स्थिती झालेली आहे.  सर्वच प्रकल्पांतील पाणी शेवटच्या टप्प्यात आले असून, सव्वा दोनशेपेक्षा अधिक गावांतील नागरिकांची तहान टँकरच्या पाण्याने भागविली जात आहे. प्रतिक्रिया टँकर आल्यानंतर काही जण त्यावर चढून पाणी काढण्याचा प्रयत्न करायचे. यामुळे एखादी दुर्घटना घडू शकली असती. परिणामी, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दोन दिवसांपूर्वी तात्कालिक पोलिस बंदोबस्तात पाणीवाटप केले. आता सुरळीतपणे पाणीवाटप पूर्वीसारखे सुरू आहे. - पी. आर. वाघ, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, शेगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com