हेलिकोनिया सोसायटी इंटरनॅशनलतर्फे आॅगस्ट महिन्यात परिषद

हेलिकोनिया सोसायटी इंटरनॅशनलतर्फे आॅगस्ट महिन्यात परिषद
हेलिकोनिया सोसायटी इंटरनॅशनलतर्फे आॅगस्ट महिन्यात परिषद

पुणे : हेलिकोनिया सोसायटी इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय संस्थेचे द्विवार्षिक परिषेदेचे आयोजन प्रथमच भारतात होत आहे. ही संस्था जगभरात हेलिकोनिया आणि झिंजिबरेल्स प्रजातींचा प्रचार आणि प्रसार करते. या संस्थेची २०वी द्विवार्षिक परिषद केरळ राज्यातील कुमारकोम येथे ४ ते ६ आॅगस्टच्या दरम्यान होणार आहे.  या परिषदेमध्ये आठ देशांतून २५ परदेशी तज्ज्ञ तसेच महाराष्ट्र, केरळ, मध्य प्रदेश आणि इतर राज्यांतील हेलिकोनिया उत्पादक शेतकरी सहभागी होणार आहेत. परिषदेमध्ये जगभरातील तज्ज्ञ हेलिकोनिया आणि झिंजिबरेल्स लागवड, व्यवस्थापन, बाजारपेठ याबाबत सादरीकरण करणार आहेत. या आंतरराष्र्टीय परिषदेच्या निमित्ताने २९ जुलै ते ३ आॅगस्टदरम्यान मुंबई, उटी, म्हैसूर आणि बेंगळूर अशी अभ्यास सहल आयोजित करण्यात आली आहे. तसेच परिषदेनंतर ७ आॅगस्ट ते १२ आॅगस्टच्या दरम्यान मल्लपुरम, वायनाड, कुर्ग आणि बेंगळूर अशी कृषी पर्यटन सहल आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती हेलिकोनिया सोसायटी इंटरनॅशनल या संस्थेच्या सदस्या मीनल पाटील यांनी दिली आहे. या परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी मिनल पाटील ( मो.९८८१७८७२३०, ईमेल ःminalpatil६६@gmail.com)  यांच्याशी संपर्क साधावा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com