agriculture news in marathi, Help sugar industry in maharashtra : Pawar tell CM Fadanvis | Agrowon

उत्तर प्रदेश, हरियाना, पंजाबप्रमाणे साखर कारखान्यांना मदत करा
टीम अॅग्रोवन
रविवार, 16 डिसेंबर 2018

पुणे : जागतिक साखरेचे बाजार आणि खप विचारात घेता तयार झालेल्या स्थितीत राज्यातील साखरनिर्मितीचा खर्च वाढला आहे. यामुळे कारखान्यांना यंदा प्रतिक्विंटल ४०० रुपये तोटा येईल, असे भाकित माजी केंद्रीय कृषिमंत्री व व्हीएसआयचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्तविले. 

पुणे : जागतिक साखरेचे बाजार आणि खप विचारात घेता तयार झालेल्या स्थितीत राज्यातील साखरनिर्मितीचा खर्च वाढला आहे. यामुळे कारखान्यांना यंदा प्रतिक्विंटल ४०० रुपये तोटा येईल, असे भाकित माजी केंद्रीय कृषिमंत्री व व्हीएसआयचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्तविले. 

जगाच्या साखर बाजारपेठेचा अभ्यासपूर्ण आढावा घेत देशाबरोबरच राज्याच्या साखर कारखानदारीचे नेमके चित्र श्री. पवार यांनी व्हीएसआयच्या वार्षिक सभेत मांडले. श्री. पवार म्हणाले, की २०१७-१८ मध्ये जागतिक साखर उत्पादन १९३ दशलक्ष टन तयार झाले. त्यापैकी १८३ दशलक्ष टन साखरेचा वापर झाला आणि १० दशलक्ष टन साखर अतिरिक्त दिसते आहे. मात्र, २०१८-१९ च्या हंगामात जगात १९२ दशलक्ष टन तयार होईल. त्यातील १८५ दशलक्ष टन वापर होईल. म्हणजेच ७ दशलक्ष टन जगात जादा साखर तयार होणार आहे.

भारतात २०१७-१८ मध्ये ३२२ लाख टन साखर तयार झाली. त्यातील २५६ लाख टन साखरेची विक्री बघता १६० लाख टन शिल्लक राहिली. देशात यंदा ३१५ लाख टन तयार होईल असे देशाचे अन्नमंत्री म्हणतात. त्यामुळे अधिक साखर उत्पादनाचा परिणाम बाजारपेठेवर होईल. त्यामुळे साखरदर घसरलेले आहेत. साखरेचा भाव प्रतिक्विंटल २९०० आहे. मात्र, नजीकच्या काळात बाजारपेठेत सुधारणा होणार नाही.

यंदा कारखान्यांना ३३०० उत्पादन खर्च येणार असून, तोटा प्रतिक्विंटल ४०० रुपये होईल, असे सांगून श्री. पवार म्हणाले, की कारखान्यांना त्यामुळेच एफआरपी देणे अवघड जात आहे. परिणामी ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी बघण्यास मिळते. त्यामुळे या समस्येतून बाहेर निघण्यासाठी आता सरकारी मदत झाली पाहिजे. 

केंद्राने साखर निर्यात वाहतूक अनुदान दिले; पण एफआरपी देण्यासाठी उत्तर प्रदेश, हरियाना, पंजाब सरकारप्रमाणेच महाराष्ट्र सरकारनेदेखील मदत केली पाहिजे. कारण साखर उद्योग हा राज्याच्या ग्रामीण भागाला, शेतीला मदत करणारा धंदा आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक स्रोत वाढविणारा हा व्यवसाय सांभाळण्यासाठी सरकारने मदत करायला हवी, असे आवाहन श्री. पवार यांनी केले.

आधुनिकीकरणाच्या कामाला लागा
ऊस रसापासून बी हेव्ही मोलॅसिस तयार करणे, तसेच इथेनॉल उत्पादन वाढविण्यासाठी केंद्र घोषित केलेल्या आर्थिक मदतीच्या भूमिकेबद्दल मी अभिनंदन करतो. कारखान्यांच्या प्रकल्प आधुनिकीकरणासाठी ६१३९ कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे आता संचालक मंडळाने जुन्या प्रकल्पांचे आधुनिककरण हाती घ्यावे. प्रकल्प नसल्यास उभारावा व केंद्राच्या तरतुदीतील वाटा पदरात पाडून दोन पैसे शेतकऱ्यांना जादा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा, असा सल्ला श्री. पवार यांनी दिला. 

शरद पवारांकडून साखर कारखान्यांना टिप्स

  •     ऊस उत्पादनवाढीसाठी ऊस विकास विभाग सक्षम करा
  •     तीन वर्षांत बेणे बदलासाठी प्रयत्न व्हावेत
  •     इथेनॉलसाठी प्रकल्पांचे आधुनिकीकरण करावे
  •     हुमणी नियंत्रणासाठी वेळीच पावले टाकावीत 
  •     भविष्यात शर्कराकंदाचा वापर, त्यासाठी गव्हाणीत बदल
  •     ऊस उत्पादनवाढीच्या स्पर्धेत सहभाग वाढवावा
  •     खोडवा उत्पादनावर लक्ष केंद्रित करावे
  •     ऊस पिकाची गुणवत्ता, उतारा वाढविण्यासाठी प्रयत्न

इतर अॅग्रो विशेष
‘जीएम’चा तिढामहिनाभरापूर्वी हरियाना राज्यात एका शेतकऱ्याच्या...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारापुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने...
करारावरील अश्‍वगंधा लागवड ठरली डोकेदुखीगडचिरोली ः अश्‍वगंधा लागवड आणि खरेदीचा करार करीत...
शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी बँक...वर्धा : पात्र असतानाही कर्जमाफीचा लाभ न...
‘कृषी’तील सुधारणेस कृतिगट : निती आयोगनवी दिल्ली : कृषी क्षेत्रातील अमूलाग्र...
खातेवाटप जाहीर : अनिल बोंडे कृषिमंत्री...मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
विदर्भात भुईमूग शेंगाचे दर पोचले ५७००...नागपूर ः उन्हाळी भुईमुगाची आवक विदर्भातील अनेक...
खास पोह्यासाठी भाताची ‘कर्जत शताब्दी’...रत्नागिरी ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
महिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथमहिलांसाठी बचत गट चळवळ फायद्याची ठरली आहे. बचत...
कृषी, संलग्न विद्याशाखांसाठी ‘खासगी’कडे...पुणे : राज्यातील कृषी व संलग्न विद्याशाखांच्या...
गायी आणि म्हशींच्या गुणसूत्रांची बॅंक...पुणे ः  गायी, म्हशींच्या आनुवंशिक सुधारणा...
मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक स्थितीपुणे   : अरबी समुद्रात गुजरातच्या...
कोकणात पाऊस जोर धरणारपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळाचा प्रभाव ओसरू...
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...
अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...
कर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या...पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...