agriculture news in marathi, Helth of animals are in danger due to vaccination not available, jalgaon, maharashtra, | Agrowon

जळगावमध्ये लसीअभावी लाळ्या खुरकूतचा वाढला प्रादुर्भाव
टीम अॅग्रोवन
सोमवार, 29 जानेवारी 2018
जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात जनावरांच्यावर लाळ्या खुरकूत नियंत्रणासाठी योग्य उपचार होत नाही. खासगी पशुवैद्यक उपचार वाढून जास्त रक्कम घेत आहेत. शासनाने याची वेळेवर दखल घ्यावी. - - पशुपालक, ममुराबाद, जि. जळगाव
जळगाव ः लाळ्या खुरकूत प्रतिबंधक लस न दिल्याने जिल्ह्यातील जनावरांमध्ये याचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यामुळे पशुपालकांना अधिक पैसे मोजून खासगी पशुवैद्यकाकडून उपचार करून घ्यावे लागत आहेत. एका जनावरांच्या उपचारासाठी किमान एक हजार ते १२०० रुपये खर्च येत असल्याने पशुपालकांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. 
 
जिल्ह्यात पाचोरा, चाळीसगाव, जळगाव, जामनेर भागांत दुधाळ गाई, म्हशींची संख्या अधिक आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुग्ध उत्पादन होते. सध्याच्या काळात जिल्हा सहकारी दूध संघासह इतर खासगी डेअऱ्यांच्या दूध संकलनात वाढ झाली होती. परंतु मागील आठ ते दहा दिवसांपासून दुधाळ जनावरांमध्ये लाळ्या खुरकूत आजाराचे प्रमाण वाढल्याने दुग्धोत्पादनावर परिणाम दिसू लागला आहे.  अजूनपर्यंत कुठल्याही गावामध्ये जनावरांना लाळ्या खुरकूत प्रतिबंधक लस दिलेली नाही. कारण जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये ही लस उपलब्ध नव्हती.
 
जे सधन पशुपालक आहेत, त्यांनी खासगी पशुवैद्यकांकडून जनावरांचे लसीकरण करून घेतले. त्यांच्या जनावरांमध्ये या आजाराचा फारसा प्रसार झालेला नाही. परंतु एखादी बैलजोडी व घरच्या दुधापुरती गाय, म्हैस सांभाळणाऱ्या शेतकऱ्यांकडील जनावरांना मोठ्या प्रमाणात लाळ्या खुरकूताचा प्रादुर्भाव झालेला आहे. सध्याच्या काळात जनावरांना योग्य उपचार मिळण्याची गरज आहे, परंतु शेतकऱ्यांच्या भाबडेपणाचा फायदा घेऊन लाळ्या खुरकूतग्रस्त जनावरांना खासगी पशुवैद्यक दोन ते तीन सलाईन, काही इंजेक्‍शने देत आहे. योग्य उपचाराअभावी एका जनावरामागे एक ते दोन दिवसांत एक हजार ते बाराशे रुपये खर्च होत आहे. 
 
जिल्हा परिषदेचे तीन ते चार गावे मिळून एक पशुवैद्यकीय उपचार केंद्र किंवा दवाखाना आहे. परंतु तेथे पुरेसे मनुष्यबळ नाही, कर्मचारी उपस्थित नसतात. तसेच लाळ्या खुरकूत प्रतिबंधक उपचार यंत्रणा नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केलेली आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पी. एस. इंगळे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला, परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही. 

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...