agriculture news in marathi, herbal medicine crop producers demand for grant, amravati, maharashtra | Agrowon

वनौषधी उत्पादकांनी केली अनुदानाची मागणी
टीम अॅग्रोवन
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

अमरावती  ः पानपिंपरी तसेच वनौषधी उत्पादकांसाठी मिळणारे अनुदान पूर्ववत करावे तसेच गेल्यावर्षीचे थकीत अनुदान मिळावे, अशी मागणी नागार्जून पानपिंपरी उत्पादक संस्थेचे संचालक विजय लाडोळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी केली. याबाबत जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांना निवेदन देण्यात आले.

अमरावती  ः पानपिंपरी तसेच वनौषधी उत्पादकांसाठी मिळणारे अनुदान पूर्ववत करावे तसेच गेल्यावर्षीचे थकीत अनुदान मिळावे, अशी मागणी नागार्जून पानपिंपरी उत्पादक संस्थेचे संचालक विजय लाडोळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी केली. याबाबत जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांना निवेदन देण्यात आले.

अकोला, अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या क्षेत्रावर वनौषधींची लागवड केली होती. अंजनगावसूर्जी येथे देशाभरातील व्यापारी येऊन वनौषधींची खरेदी करीत होते. वनौषधी लागवडीला प्रोत्साहन मिळावे याकरिता शासनाने वनौषधी मंडळाच्या माध्यमातून अनुदान योजना राबविल्या. परंतु, आयुष मंत्रालयांतर्गत वनौषधींचा समावेश झाल्यापासून हे अनुदान बंद करण्यात आले. त्यामुळे नैसर्गिक कारणांमुळे वनौषधी उत्पादकांचे २०१७-१८ मध्ये नुकसान झाल्यानंतरही त्यांना कोणत्याच प्रकारची मदत दिली गेली नाही.

या संदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात आला. परंतु, त्याची दखल घेण्यात आलेली नाही, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. केंद्र सरकारस्तरावरून वनौषधींसाठी ६० टक्‍के निधीची तरतूद करण्यात आली. परंतु, राज्याचा ४० टक्‍केचा वाटा देण्यास टाळाटाळ झाली. शासनाने आपल्या हिश्‍श्‍याची रक्‍कम देत वनौषधी उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी श्री. महाजन यांच्याकडे करण्यात आली. विजय लाडोळे, मनोहर मुरकुटे, दिलीप भोपळे, संजय नाढे, मनोहर भावे या वेळी उपस्थित होते. याप्रश्‍नाचे तातडीने निराकरण करण्याचे आश्‍वासन या वेळी श्री. महाजन यांनी दिले.

इतर ताज्या घडामोडी
फळबाग लागवड योजनेवर ग्रामसेवकांचा...चिपळूण, जि. रत्नागिरी ः महाराष्ट्र ग्रामसेवक...
‘रिसॅट-२ बी'चे उपग्रहाचे यशस्वी...श्रीहरीकोट : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो...
‘कृष्णामाई’चा कर्नाटकातील काठ तहानला;...कोल्हापूर : कृष्णा नदीवर अवलंबून असणाऱ्या कर्नाटक...
जळगावात लिंबू २२०० ते ५००० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
देशभरात ७२४ महिला उमेदवारांचे भवितव्य...नवी दिल्ली : देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा...
गारपिटीनंतर द्राक्ष बागेची अधिक काळजी...द्राक्ष बागेमध्ये वाढीच्या विविध अवस्थेमध्ये...
अमरावती : नाफेडने अचानक केली तूरखरेदी...अमरावती : ऑनलाइन नोंदणी केलेल्या दहा टक्‍के...
बुलडाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईबुलडाणा ः गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच...
दुष्काळात संत्रा बागेला टँकरच्या...अकोला ः दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्याला चौफेर...
खानदेशात सौर कृषिपंप योजनेतून लवकरच पंप...जळगाव ः सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मिरज, तासगावसह सिंधुदुर्गात पाऊससिंधुदुर्ग, सांगली : विजांच्या कडकडाटांसह...
मराठवाड्यात नवीन खासदारांबाबत उत्कंठानांदेड : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांतील...
कोल्हापूर, सांगलीत निकालाची उत्सुकता...सांगली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता....
सोलापूर, माढ्याच्या निकालाकडे देशाचे...सोलापूर : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात ७५...परभणी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे...
यसनी तोडून पुढे या : रमेश घोलपसोलापूर  : "परिस्थितीने बांधलेल्या यसनी तोडत...
पुणे विभागासाठी साडेपाच कोटींवर वृक्ष...पुणे  ः पर्यावरणाचे संतुलन अबाधित...
सोयाबीन उत्पादकांना पीकविम्याची रक्कम...मुंबई  : शासनाच्या विशेषतः कृषी विभागाच्या...
आमदार निधीतून दुष्काळग्रस्त भागासाठी...मुंबई  ः दुष्काळग्रस्त भागातील जनतेला आमदार...
साडेचौदा टन केशर, बदामी आंबा...मुंबई : वातावरण नियंत्रित करून फळाचे...