agriculture news in marathi, herbicide turnover, Jalgaon | Agrowon

जळगाव जिल्ह्यात तणनाशकांची उलाढाल चार कोटींवर
चंद्रकांत जाधव
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

तणनाशकांच्या वापरामुळे वेळ, पैसा वाचतो. मजूर मिळत नाहीत. अनेकदा वाफसा नसतो. त्यामुळे आम्ही तणनाशकांचा वापर करतो. 
- ज्ञानेश्‍वर निळकंठ पाटील, हिंगोणे, ता. चोपडा, जि. जळगाव

जळगाव ः वाढते मजुरीचे दर व मजूरटंचाई आणि अनेकदा वाफसा नसल्यास वाढणारे तण नियंत्रणात आणणे अवघड जाते. यामुळे तण नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तणनाशकांचा वापर वाढविला आहे. मागील तीन वर्षांत सातत्याने खप वाढत असून, यंदाच्या खरिपात जवळपास तणनाशकांची चार कोटींची उलाढाल झाल्याची माहिती आहे. 

जिल्ह्यात वर्षागणिक तणनाशकांचा वापर वाढत आहे. ग्लायफोसेड प्रकारच्या तणांचा वापर केळी, बंधारे, नापेर राहिलेल्या क्षेत्रातील तण नष्ट करण्यासाठी अधिकचा वापर केला जात असल्याची नोंद जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे आहे. जिल्ह्यात जवळपास ५० पेक्षा अधिक कंपन्यांच्या तणनाशकांचा पुरवठा खरिपात झाला. तणनाशकांचे दर २६० ते ३०० रुपये लिटरपर्यंत आहेत. 

मजूरटंचाईवर पर्याय
जिल्ह्यात तण नियंत्रणासाठी मजूर नाहीत. यातच अनेकदा पावसाने वाफसा नसतो. अशा स्थितीत शेतकरी तणनाशके वापरतात. एक एकरसाठी किमान एक लिटर तणनाशक लागते. फवारणीच्या मजुरीसह ५०० रुपयांत एक एकरात तण नियंत्रणाचे काम होते, तर एक एकरात तण नियंत्रणासाठी पावसाळ्याच्या काळात किमान २० महिला मजुरांची गरज भासते. त्यासाठी जवळपास दोन हजार रुपये मजुरी लागते. यामुळे शेतकरी तणनाशकांना पसंती देत असल्याचे चित्र आहे.
 
तणनाशक कंपन्यांची चांदी
जिल्ह्यात केळी व कपाशी अधिक आहे. कपाशीसह केळी, पपई, सोयाबीन व इतर पिकांमध्येही तणनाशकांचा वापर होऊ लागला आहे. त्यामुळे तणनाशक पुरवठादार, निर्मात्या कंपन्यांचीही चांदी आहे. जिल्ह्यात रावेर, जळगाव, चाळीसगाव, पाचोरा, चोपडा येथे तणनाशकांचा मोठा खप होत असल्याची माहिती कृषी विभागातून मिळाली. 

एक लाख लिटर वापर 
तणनाशकांच्या नेमक्‍या वापरासंबंधी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने ऑडिट केलेले नसले तरी जिल्ह्यात यंदा एक लाख लिटर एवढ्या तणनाशकांचा वापर शेतकऱ्यांनी केला आहे. त्याची किंमत चार कोटींवर असल्याचे सांगण्यात आले. ज्वारी, बाजरी, ऊस, मका या एकदल पिकांमधील द्वीदल तण नष्ट करणारी तणनाशके वापरली जात आहेत, तर कपाशी, सोयाबीन, तूर आदी द्विदल पिकांमधील एकदल तण नष्ट करणारी तणनाशके वापरली जात आहेत.

नेमकी माहिती सांगणे अवघड

जिल्ह्यात यंदा जवळपास एक लाख लिटर तणनाशकांचा वापर झाला असला तरी किती उलाढाल झाली याची नेमकी माहिती सांगता येणार नाही; परंतु मजूरटंचाईमुळे वर्षागणिक तणनाशकांचा वापर वाढू लागला आहे, असे जळगाव जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी मधुकर चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.

इतर अॅग्रो विशेष
‘रेसिड्यू फ्री’ शेतीतून गुणवत्ताप्राप्त...स्थावर मालमत्ता व्यावसायिक उद्योगातील दोन...
प्रतिष्ठा जपण्यासाठी शेतकऱ्यांच्या...नाशिक : यवतमाळमधील साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन...
शेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्यास अखेर...पुणे  ः गेल्या तीन वर्षांपासून बंद...
संत्रा निर्यातीला कृषी विभाग देणार...नागपूर : अपेडाने संत्रा क्‍लस्टरला पहिल्यांदाच...
विदर्भात गुरुवारपासून तुरळक पावसाचा...पुणे   : राज्यातील गारठा कमी झाल्यांनतर...
चढ्या दराचा फायदा कोणाला?मागील दोन दिवसांपासून सोयाबीनचे दर वाढत आहेत....
अतिखोल भूजलाचा उपसा घातकचपर्यावरणाचा नाश कोणी केला? या एका प्रश्नाला अनेक...
निफाड तालुक्‍यात द्राक्ष काढणीला सुरवातनिफाड, जि. नाशिक  ः तालुक्‍यातील उगाव,...
पशुगणनेकरिता आता महिनाअखेरपर्यंत मुदतनागपूर   ः पशुगणनेसाठी पूरक साहित्याचा...
ट्रायकोकार्ड निर्मिती प्रशिक्षण प्रकल्प...नागपूर ः कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठातील...
राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षांनी जाणून...औरंगाबाद :  राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही...
दराअभावी कांदापट्टा सुन्ननाशिक : कांद्याला अगदी मोड फुटेस्तोवर वाट...
वनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...
अर्थसंकल्पीय कृषी कर्ज तरतूदीत १० टक्के...नवी दिल्ली : आगामी २०१९-२०च्या अर्थसंकल्पात शेती...
राज्यात शुक्रवारपासून पावसाचा अंदाजपुणे : वायव्य भारतातील पश्चिमी चक्रावाताची...
औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय सुक्ष्म...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित नवव्या...
शेतीपूरक उद्योगातून बचत गट झाले सक्षमचिखली (जि. बुलडाणा) येथील हिरकणी महिला उत्कर्ष...
गोरक्षणासोबतच जपला व्यसनमुक्‍तीचा वसालाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा...
अप्रमाणित रोपांमुळे ‘फेल' बागांवर...पुणे : दुष्काळात जीवापाड जपलेल्या बागा अप्रमाणित...
सोयाबीन दराचा आलेख चढताच; लातूरला ३८११...लातूर : येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...