agriculture news in marathi, high court order to government to give information about drought measures, mumbai, maharashtra | Agrowon

दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांची माहिती द्या ः उच्च न्यायालय
टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 मे 2019

मुंबई : दुष्काळासंदर्भात उत्तर देण्यासाठी राज्य सरकारला आणखीन किती वेळ हवा? असा सवाल करत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आवश्यक माहिती देण्यासाठी येत्या शुक्रवारपर्यंतची मुदत दिली आहे. तसेच यासंदर्भातील सुनावणी पुढच्या सोमवारपर्यंत तहकूब केली आहे. पुढील सुनावणीत सरकारकडून दुष्काळ निवारणासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला देण्यात आले आहेत.

मुंबई : दुष्काळासंदर्भात उत्तर देण्यासाठी राज्य सरकारला आणखीन किती वेळ हवा? असा सवाल करत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आवश्यक माहिती देण्यासाठी येत्या शुक्रवारपर्यंतची मुदत दिली आहे. तसेच यासंदर्भातील सुनावणी पुढच्या सोमवारपर्यंत तहकूब केली आहे. पुढील सुनावणीत सरकारकडून दुष्काळ निवारणासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला देण्यात आले आहेत.

राज्यात दुष्काळामुळे अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र असे असतानाही राज्य सरकारला निर्देश देऊनही त्यांचे उत्तर तयार नसल्याने उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. याप्रकरणी नियुक्त केलेले ''विशेष सरकारी वकील उपलब्ध नाहीत'' अशी सबब पुन्हा एकदा सरकारी वकिलांनी न्यायालयाकडे व्यक्त केली.

राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती, दुष्काळ आणि जलसंवर्धन आदींबाबत चिंता व्यक्त करत डॉ. संजय लाखे पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती संदीप शिंदे आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे सुटीकालीन न्यायालयात यावर सुनावणी झाली. मराठवाडा आणि विदर्भामध्ये जलसाठ्यांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून काही ठिकाणी पाणीसाठा शून्य टक्क्यांवर आला आहे. सरकारच्या संकेतस्थळावरही याबाबतची आकडेवारी उपलब्ध आहे. तरीही सरकारकडून पाणीपुरवठ्याच्या सुविधा आणि अन्य जीवनावश्‍यक वस्तूंबाबत तातडीने उपाययोजना सुरू करण्यात आलेल्या नाहीत, असा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे.

सर्वोच्च न्यायालयानेही दुष्काळग्रस्त भागांसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश सरकारला दिलेले आहेत. मात्र त्याचीही पूर्तता करण्यात आलेली नाही, असेही याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला सांगितले. दुष्काळी परिस्थितीचा आढावा सातत्याने घेणारी यंत्रणा स्वतंत्र आपत्तकालीन नियंत्रण कक्षामार्फत निर्माण करण्याची मागणीही याचिकेत केलेली आहे.

इतर अॅग्रो विशेष
कर्जमाफीची कूर्मगतीराज्यात दोन आठवड्याने उशिरा मॉन्सून दाखल झाला...
सोयीनुसार निवडणूक घेण्याचे ढोंग कशाला?देशापुढील वास्तव संकटे, समस्या अग्रक्रमाने...
मराठवाड्यातील ५८ तालुक्यांत पाऊसऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यामध्ये रविवारी (...
पीकविम्यातील हलगर्जीपणा; कृषी...पुणे : प्रधानमंत्री पीकविमा योजनेची कामे करताना...
मॉन्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
तुरळक ठिकाणी मुसळधारेची शक्यतापुणे : राज्याच्या दक्षिण भागात मॉन्सूनने आगमन...
औरंगाबाद, कोपरगाव, येवल्यात धोधो पाऊसपुणे : कोकणानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील...
`गुणनियंत्रण`चा चेंडू आता ‘एसीबी’च्या...पुणे : राज्याच्या कृषी विभागातील गुणनियंत्रण...
आटपाडीत पावसाने पाणीपातळीत वाढसांगली : आटपाडी तालुक्याच्या पश्चिम भागात दोन...
मराठवाड्यात सर्वदूर पावसाच्या सरीऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
नाशिक येथे बुधवारी पाणी व्यवस्थापन परिषदनाशिक ः सातत्याने उद्भवणाऱ्या दुष्काळी स्थितीमुळे...
राज्यात चार वर्षांत १२ हजार...मुंबई  : शेतकऱ्यांना सुखी करण्याचे...
योग्य ओलाव्यावर करा पेरणी बाजरी बाजरी पिकाकरिता पाण्याचा उत्तम निचरा...
प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखअमरावती येथील जयश्री रवींद्र गुंबळे यांनी गेल्या...
ग्रामविकास, आरोग्य अन् शिक्षणासाठी ‘खोज...मेळघाट परिसरातील आदिवासी लोकांच्या विकासासाठी...
मॉन्सून मंगळवारपर्यंत संपूर्ण राज्य...पुणे  : राज्यात दाखल होताच नैर्ऋत्य मोसमी...
मराठवाडा, विदर्भातील दक्षिण भागात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) वेगाने...
पाणीवापर संस्थांनी वाढवावी कार्यक्षमता सहकारी उपसा जलसिंचन योजनेच्या इतिहासाची माहिती...
पत्रास कारण की ...पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व...
दुग्धव्यवसाय, प्रक्रियेने दिला शेताीला...बुलडाणा शहरापासून सुमारे दहा किलोमीटरवरील अजिसपूर...