agriculture news in marathi, High over rain 14 mandals in Nanded, Parbhani and Hingoli districts | Agrowon

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत अतिवृष्टी
टीम अॅग्रोवन
रविवार, 24 जून 2018

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १३९ मंडळांमध्ये शनिवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या मुसळधार पावसामुळे ओढ्या-नाल्याला पूर आले. शेतीचे बांध फुटले, जमिनी खरडून गेल्या. पेरणी केलेले बियाणे, हळद बेणे वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अनेक तालुक्यात चांगला पाऊस झाल्यामुळे रखडलेल्या पेरण्या सुरू होतील.

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १३९ मंडळांमध्ये शनिवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या मुसळधार पावसामुळे ओढ्या-नाल्याला पूर आले. शेतीचे बांध फुटले, जमिनी खरडून गेल्या. पेरणी केलेले बियाणे, हळद बेणे वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अनेक तालुक्यात चांगला पाऊस झाल्यामुळे रखडलेल्या पेरण्या सुरू होतील.

नांदेड जिल्ह्यातील बारुळ (१४० मिमी), उस्माननगर (११०), कापशी (१०३ मिमी), मुगट (९१), पिंपरखेड (७६ मिमी), धर्माबाद (७५ मिमी) कुरुला (७२ मिमी) या सात मंडळांमध्ये, परभणी जिल्ह्यातील चुडावा (७५ मिमी), कात्नेश्वर (६५), हिंगोली जिल्ह्यतील हिंगोली (७५ मिमी), माळहिवरा (६९ मिमी), बांसबा (६५ मिमी), हट्टा (१३४ मिमी), औंढा नागनाथ (९८ मिमी) या १४ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली.
नांदेड जिल्ह्यातील ७४ मंडळांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस झाला. कंधार, लोहा, हदगाव, मुदखेड, धर्माबाद तालुक्यांत पावसाचा जोर अधिक होता. परभणी जिल्ह्यतील ३५ मंडळांमध्ये मध्यम ते जोरादार पाऊस झाला. परभणी, पूर्णा, पालम, गंगाखेड, मानवत तालुक्यात पावसाचा जोर होता. हिंगोली जिल्ह्यातील ३० मंडळांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस झाला. सर्व पाच तालुक्यांत पावसाचा जोर होता.

मंडळनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये) नांदेड जिल्हा : नांदेड शहर १४, नांदेड ग्रामीण १६, वजिराबाद १६, वसरणी ४८, तरोडा ८, तुप्पा ४५, लिंबगाव ९, विष्णुपुरी ११, अर्धापूर १२, दाभड ९, मुदखेडज २०, मुगट ९१, बारड ५१, कंधार ४७, कुरुला ७२, उस्माननगर ११०, पेठवडज ४५, फुलवळ ५७, बारुळ १४०, नायगाव ९, मांजरम ७, बरबडा ३२, कुंटूर २०, किनवट २४, हिमायतनगर ९, सरसरम ६, उमरी ३९, सिंधी ३२, गोलेगाव ३५, मनाठा २०, पिंपरखेड ७६, निवघा ५२, तळणी २५, हानेगाव ७, वाई ३२, वानोळा ८, मोघाळी ३२, बिलोली १०, लोहगांव २५, कुंडलवाडी १०, सगरोळी १२, मुदखेड १५, जांब ६२, येवती १०, जाहूर १८, लोहा ४८, माळकोळी ४७, कलंबर ६०, शेवडी ३०, सोनखेड ९, कापशी १०३, धर्माबाद ७५, करखेली ३९, जळकोट १५.
परभणी जिल्हा ः परभणी शहर २५, परभणी ग्रामीण १६, सिंगणापूर ३०, दैठणा १२, झरी २४, पेडगांव ७, पिंगळी १७, जांब १८, पालम १०, चाटोरी ३४, बनवस २५, पूर्णा ५०, ताडकळस  ५३, कात्नेश्वर ६५, गंगाखेड १४, राणीसावरगाव २४, माखणी १५, महातुरी २४, सोनपेठ ७, आवलगाव ११, पाथरी, बोरी ७, केकरजवळा १५, कोल्हा १४.
हिंगोली जिल्हा ः हिंगोली ७५, खंबाळा ५२, माळहिवरा ६९, सिरसम ४८, बासंबा ६५, नरसी नामदेव ५६, डिग्रस ३७, कळमनुरी ४१, नांदापूर ४५, आखाडा बाळापूर २५, डोंगरकडा ८, वारंगा १६, वाकोडी १५, सेनगाव २०, गोरेगाव ६२, आजेगाव १५, साखरा ३६, पानकनेरगाव १६, हत्ता १२, वसमत २२, हट्टा १३४, कुरुंदा ३५, टेंभुर्णी १५,आंबा २१, हयातनगर ६०, औंढा नागनाथ ९८, जवळा बाजार ५५, येळेगाव १५२, साळना ४८.

 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
समजून घ्या पाण्याचे महत्त्वपाण्याची समस्या शाश्वत पद्धतीने सोडवण्यासाठी...
जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहोसोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास...
‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण...
राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात...कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री...
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यतापुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या...
प्रेरणा प्रकल्पातून ९० हजार शेतकऱ्यांचे...मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४...
कांद्याच्या ढिगाऱ्यात बुजवून घेत...नाशिक  : कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती व...
एका संदेशाने आयुष्य केले बळकटटाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः काही तासांपूर्वी...
'दावणीलाही नाही आणि छावणीत नाही; जनावरे...सोलापूर :  मागील सरकारच्या काळात छावणीत...
वनहक्काच्या ४३ हजारांहून अधिक...मुंबई : राज्यात मागील अवघ्या तीन महिन्यांत...
खानदेशात मका दरात वाढजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
पशूपालन अन्‌ गूळनिर्मितीतून शेती केली...राशिवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथील...
दुष्काळातही भाजीपाला शेतीतून मिळविले...लातूर जिल्ह्यातील उमरगा (यल्लादेवी) येथील माळी...
रयत राजाची अन् राजा रयतेचाहिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचा लोककल्याणकारी...
थकीत एफआरपीचा तिढासा  खरेच्या किमान विक्री मूल्यात प्रतिक्विंटल २००...
भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...