एप्रिल महिन्यात राज्यातील तापमान ४० अंश सेल्शिअसच्या वर गेलेले असताना, वाढत्या इंधन दराचे चटकेही
ताज्या घडामोडी
अहमदाबाद, गुजरात ः बुलेट ट्रेनमुळे भारत आणि जपान यांच्यातील संबंध आणखी दृढ झाले अाहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृष्टीचे नेते आहेत. या बुलेट ट्रेनच्या भूमिपूजनामुळे मी खूप आनंदी अाहे, असे प्रतिपादन जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांनी येथे केले.
भारत आणि जपान यांच्या मैत्रीतून प्रत्यक्षात उतरलेल्या अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनचे भूमिपूजन गुरुवारी (ता. १४) जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे अाणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. या वेळी रेल्वेमंत्री पीयूष गोयल, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अादी उपस्थित होते.

या वेळी ॲबे म्हणाले, की हा ऐतिहासिक दिवस असून, भारतात सुरू असलेल्या बुलेट ट्रेनच्या भूमिपूजन कार्यक्रमाचा मी साक्षीदार आहे. त्यामुळे मला खूप आनंद आहे. दोन वर्षांपूर्वी ही ट्रेन सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतला होता. दहा वर्षांपूर्वी मला भारतीय संसदेत बोलण्याची संधी मिळाली होती. भारत आणि जपान यांच्यातील संबंध चांगले आहेत. हिंदी आणि प्रशांत महासागरांचे हे संबंध उज्ज्वल भविष्याकडे जातील, अशी आशा आहे.
दुसऱ्या महायुद्धानंतर जपान खंडर बनले होते. त्यानंतर जपानमधील सर्वांनी एकत्र येत १९६४ मध्ये जपानच्या हायस्पीड रेल्वेसेवेची सुरवात झाली. यामुळे जपानच्या अर्थव्यवस्थेत मोठे बदल झाले. सुझुकी आणि टोयोटासारख्या कंपन्यांना जोडणारी ही यंत्रणा झाली. त्यामुळे जपान विकसित देशांच्या यादीत जाऊन बसला. पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दूरदर्शी नेते आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांनी बुलेट ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि न्यू इंडियाच्या दिशेने पाऊल टाकले. जेव्हा अहमदाबादला पुन्हा येईन, तेव्हा बुलेट ट्रेनने प्रवास करू, असे अॅबे यांनी सांगितले.
भारतात बुलेट ट्रेन युगाची सुरवात : नरेंद्र मोदी
आजपासून आधुनिक भारताच्या पायाभरणीस सुरवात झाली असून, ही बुलेट ट्रेन युगाची सुरवात आहे. या प्रकल्पामुळे भारताला एक विकासाची दिशा मिळणार आहे. बुलेट ट्रेनमुळे रोजगारनिर्मितीच्या अनेक संधी निर्माण होणार अाहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. बुलेट ट्रेन ही पर्यावरणाला पूरक आणि इंधनातही बचत करणारी असल्याचे मोदी यांनी सांगितले.
अशी असेल देशातील पहिली बुलेट ट्रेन
- अहमदाबाद-मुंबई मार्गावर धावणार
- ताशी ३५० किलोमीटर वेग
- ५०८ किलोमीटर अंतर तीन तासांत गाठणार
- १२ रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार
- प्रत्येक स्थानकावर केवळ १६५ सेकंद थांबणार
- मुंबईतील भोईसरजवळ २१ किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून प्रवास
- यातील सात किलोमीटर लांब बोगदा पाण्याखालून असणार
- सुमारे ३५ बुलेट ट्रेन सुरू होणार
- प्रत्येक बुलेट ट्रेन रोज ७० खेपा मारणार
- २०५० पर्यंत बुलेट ट्रेनची संख्या १०५ वर नेण्याचा संकल्प
प्रकल्पाचा खर्च
- एकूण खर्च १.१० लाख कोटी
- - जपानकडून ०.१ टक्के व्याजाने ८८ हजार कोटी कर्ज मिळणार
- १५ अाॅगस्ट २०२२ रोजी ही ट्रेन धावणार
- 1 of 146
- ››