agriculture news in marathi, Highest Gram Sowing in Jalgaon District | Agrowon

जळगाव जिल्ह्यात हरभऱ्याची सर्वाधिक पेरणी
चंद्रकांत जाधव
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

जळगाव : जिल्ह्यात रब्बी पिकांची पेरणी वेगात सुरू आहे. त्यात कमी पाणी व कमी खर्चाचे पीक म्हणून हरभऱ्याला पसंती मिळत आहे. जिल्हाभरात तापी व गिरणाकाठावरील गावांमध्ये यंदाही हरभऱ्याची पेरणी अधिक असून, यापाठोपाठ दादर (ज्वारी) व मक्‍याची पेरणी केली जात आहे.

जळगाव : जिल्ह्यात रब्बी पिकांची पेरणी वेगात सुरू आहे. त्यात कमी पाणी व कमी खर्चाचे पीक म्हणून हरभऱ्याला पसंती मिळत आहे. जिल्हाभरात तापी व गिरणाकाठावरील गावांमध्ये यंदाही हरभऱ्याची पेरणी अधिक असून, यापाठोपाठ दादर (ज्वारी) व मक्‍याची पेरणी केली जात आहे.

जिल्ह्यात यंदा एक लाख ३८ हजार हेक्‍टरवर रब्बी हंगामाची पेरणी होईल, असा अंदाज किंवा उद्दिष्ट कृषी विभागाने बांधले आहे. रब्बी पेरणीला वेग आला असता, परंतु मध्यंतरी पाऊस आल्याने उडीद, मुगाच्या रिकाम्या क्षेत्रातील पेरणी काहीशी रखडली. त्यात दिवाळी सण आला. अशात पेरणी रखडली होती. दिवाळी आटोपताच थंडी वाढल्याने पेरणीला वेग आला आहे.

पावसानंतर काही शेतकऱ्यांनी लागलीच मशागत करून हरभरा व दादरची पेरणी केली. आजघडीला दादर व हरभऱ्याचे पीक जोमात आहे. त्यात वातावरणात गारवा वाढू लागल्याने या पिकांची वाढही जोमात आहे.

ज्वारी, सोयाबीन याच्या रिकाम्या झालेल्या क्षेत्रात मका पेरणी सुरू आहे. यावल, चोपडा, एरंडोल भागात काही शेतकरी कांदा लागवड करीत आहेत; परंतु बागायती रब्बी पिकांमध्ये मका पेरणीला अधिक पसंती मिळत आहे. गहू पेरणीस अजून फारशी सुरवात झालेली दिसत नाही. परंतु पुढील आठवड्यात तापीकाठावरील गावांमध्ये गहू पेरणी सुरू होईल, असे चित्र आहे.

जिल्हाभरात आतापर्यंत जवळपास ३५ ते ३६ हजार हेक्‍टरवर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. यात सर्वाधिक २० ते २२ हजार हेक्‍टर क्षेत्र एकट्या हरभऱ्याचे आहे. यापाठोपाठ दादरची जवळपास सात ते आठ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. मका व कांद्याचे क्षेत्र अनुक्रमे चार व दीड हजार हेक्‍टर असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

बियाणे मुबलक
रब्बीच्या पेरणीसाठी बियाणे मुबलक प्रमाणात आहे. विविध कंपन्यांसह महाबीजचे बियाणे शेतकरी घेत आहेत. तसेच गव्हाचे बियाणे पुढील आठवड्यात येईल. गहू पेरणीची मुदत अगदी १५ डिसेंबरपर्यंत असल्याने हे बियाणे टप्याटप्प्याने येईल, असे कृषी विकास अधिकारी मधुकर चौधरी यांनी सांगितले.

अपेक्षित क्षेत्रावर पेरणी होणार
जिल्ह्यात रब्बीची अपेक्षित क्षेत्रावर पेरणी होईल, अशी स्थिती आहे. ऑक्‍टोबरमध्ये आलेल्या पावसाने अनेक शेतकऱ्यांना कोरडवाहू रब्बी पिके पेरणीची उभारी मिळाली आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे गवत वाढले. त्यात वाफसा मिळत नाही. ट्रॅक्‍टरने मशागत करून घ्यावी लागत आहे. त्यात काही दिवस आणखी वेळ लागेल. अनेक ठिकाणी ट्रॅक्‍टर मशागतीसाठी उपलब्ध होत नाहीत.

 

इतर बातम्या
सांगलीतील ९० टक्के द्राक्ष हंगाम उरकलासांगली : जिल्ह्यातील यंदाचा द्राक्ष हंगाम ९०...
फरारी द्राक्ष व्यापाऱ्यास शेतकऱ्यांनी...नाशिक  ः चालू वर्षाच्या हंगामात जिल्ह्यातील...
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील प्रचार...औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील...
सध्याचे सरकार म्हणजे लबाडाचे आवतन : पवारनगर : सध्याचे केंद्र सरकार म्हणजे लबाडाचे आवतन...
परभणीत वांगी प्रतिक्विंटल १००० ते २५००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
मतदान केंद्रावरील रांगेपेक्षा...सोलापूर  : सोलापूर लोकसभा मतदारसंघात सर्वत्र...
अवकाळीचा सोलापूर जिल्ह्याला मोठा फटकासोलापूर : जिल्ह्याला गेल्या चार महिन्यांत अधून-...
मंठा तालुक्यात वादळी वाऱ्याने नुकसानमंठा, जि. जालना  : तालुक्यात मंगळवारी ( ता....
पुणे विभागातील दोन लाख हेक्टरवरील ऊस...पुणे  ः गेल्या चार ते पाच महिन्यांपासून पुणे...
मराठवाड्यातील मतदान टक्केवारीत किंचित घटबीड, परभणी : मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद,...
सातारा जिल्‍ह्यातील ऊस उत्पादकांना...सातारा  ः जिल्ह्यातील सह्याद्री कारखान्याचा...
म्हैसाळ योजनेत २२ पंपांद्वारे उपसासांगली : म्हैसाळ योजनेच्या पंपांची संख्या विक्रमी...
दिग्गजांच्या सभांनी तापणार साताऱ्यातील...सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातील राजकीय...
‘सन्मान'च्या लाभार्थ्यांबाबत प्रशासन...गोंदिया : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ...
प्रभावी अपक्ष उमेदवारांमुळे लढती रंगतदारमुंबई : राज्यात तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील २१...
धनगर समाज भाजपच्याच पाठीशी ः महादेव...सांगली  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच...
चैत्र यात्रेनिमित्त भाविकांनी दुमदुमला...ज्योतिबा डोंगर, जि. कोल्हापूर  : ‘...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सरींमुळे...
‘ॲग्रोवन'चा आज १४वा वर्धापन दिन; जल...पुणे : लाखो शेतकऱ्यांच्या कुटुंबातील घटक बनलेल्या...
यंदा बीटी कापूस बियाणे मुबलक : कृषी...पुणे : राज्याच्या कापूस उत्पादक भागातील...