agriculture news in marathi, Highest snakebite in maharashtra | Agrowon

सर्वाधिक सर्पदंश महाराष्ट्रात !
श्‍यामल रॉय : सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 24 डिसेंबर 2017

कोलकता : पश्‍चिम बंगालमध्ये सर्पदंशामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण मोठे असून, याबाबतीत महाराष्ट्रानंतर याच राज्याचा क्रमांक लागतो, असे पश्‍चिम बंगालच्या आरोग्य विभागाने सांगितले आहे.  

कोलकता : पश्‍चिम बंगालमध्ये सर्पदंशामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण मोठे असून, याबाबतीत महाराष्ट्रानंतर याच राज्याचा क्रमांक लागतो, असे पश्‍चिम बंगालच्या आरोग्य विभागाने सांगितले आहे.  

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी एप्रिल ते ऑक्‍टोबर या सात महिन्यांमध्ये पश्‍चिम बंगालमध्ये सर्पदंशामुळे २३,६६६ जणांचा मृत्यू झाला. याच कालावधीमध्ये महाराष्ट्रात सर्पदंशाने मृत्यू पावलेल्यांची संख्या २४,४३७ इतकी होती. या दोन राज्यांनंतर आंध्र प्रदेश, ओडिशा आणि कर्नाटकाचा क्रमांक लागतो. देशभरात साधारणपणे एक लाख १४ हजार व्यक्ती सर्पदंशाचे बळी ठरतात सर्पदंशामुळे रुग्णालयात भरती झालेल्या सर्व प्रकरणांची माहिती घेऊन ती कळविण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना दिल्या आहेत. तसेच, राज्यांना काही मार्गदर्शक सूचनाही केंद्राने केल्या आहेत.  

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीण भागात सर्पदंश झालेल्या व्यक्तींमध्ये उघड्यावर शौचाला जाणाऱ्या लोकांचे प्रमाण अधिक आहे, त्यामुळे नागरिकांना शौचालये बांधण्यास प्रोत्साहन द्यावे, असे केंद्राने सूचनांमध्ये सांगितले आहे. सर्पदंश झालेल्या व्यक्तींना शंभर मिनिटांच्या आत रुग्णालयात दाखल करावे, विषारी आणि बिनविषारी सापांमध्ये फरक करण्यास नागरिकांना शिकवावे, सर्पदंशावरील प्रथमोपचारांची माहिती द्यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन...कोल्हापूर  : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि...
सांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली  ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...
औरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद  : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...
नगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर  ः कृषी विभागाच्या विविध योजना...
धुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव  ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...
सातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा  : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...
साताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा  : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...
साखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...
जालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...
तंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...
ग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला  : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...
जमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी  ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...
नाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक  : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...
मोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...
संत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...
पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...
पुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...
साताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...
साखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर  : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...