हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचे निधन

हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचे निधन
हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचे निधन

कोल्हापूर : हिंदकेसरी गणपतराव आंदळकर (वय ८६) यांचे पुण्यात आज (ता.१६) रात्री निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांना काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातून पुण्याला उपचारासाठी नेले होते. आज रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त कोल्हापुरसह राज्यभरात कळताच कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली. येथील न्यू मोतीबाग तालमीतील शिष्यगणांना तर त्यांच्या निधनाच्या वृत्ताचा धक्का बसला. भारत सरकारने त्यांना अर्जून पुरस्काराने सन्मानित केले होते.   

कोल्हापुरात १९५० साली गणपतराव सांगली जिह्ल्यातील शिराळा तालुक्यातून पुनवत गावातून कुस्ती शिकण्यासाठी आले. “मोतीबाग” तालमीत बाबासाहेब वीर यांच्याकडे कुस्तीची तालीम सुरु केली. जन्मजात मिळालेल्या बळकट शरीर यष्ठीवर मेहनत घेऊन त्यांनी कुस्तीचा नियमीत सराव केला. जयपराजयाची फिकीर न करता शेकडो कुस्त्या लढल्या आणि बहुतांशी जिंकल्या देखील.

 १९५८ मध्ये पाकिस्तानचा पैलवान नासिर पंजाबी याला खासबाग मैदानावर हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने त्यांनी धूळ चारली. या विजयानंतर त्यांची यशस्वी कारकीर्द खऱ्या अर्थाने सुरु झाली. पुन्हा कधी मागे वळून देखील पहिले नाही. १९६० मध्ये पंजाबचे पैलवान खडकसिंग यांचा पराभव करून हिंद केसरीची गदा मिळवली आणि संपूर्ण भारतात कोल्हापूरच्या लालमातीला नावलौकिक मिळून दिले. १९६२ मध्ये जकार्ता एशियाड स्पर्धेत ग्रीको रोमन गटात त्यांनी सुवर्णपदक पटकावले ,तर फ्री स्टाईलमध्ये रौप्य मिळवले. १९६४ मध्ये त्यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे नेतृत्व केले. गणपतरावांनी आपल्या पूर्ण कारकीर्दत २०० हुन अधिक कुस्त्या लढल्या. ४० पेक्षा जास्त कुस्तीत पाकिस्तान मधील मल्लांना त्यांनी धूळ चारली. देशभरात ख्यातनाम कुस्तीपटूंची नावं गाजत असताना गणपतरावांनी कोल्हापूरच्या लाल मातीचा डंका वाजवता ठेवला. त्यांनी आपल्या कारकिर्दीत श्रीपाद खांचाळे (पहिले हिंद केसरी ), श्रीरंग जाधव, बनातसिंग पंजाबी यांच्यासह अनेक ख्यातनाम मल्लांशी झुंज दिल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com