agriculture news in marathi, Hindutva is the only way to save a farmer who thinking of suicide | Agrowon

आत्महत्येचा विचार करणाऱ्या शेतकऱ्याला वाचविणे हेच हिंदुत्व
टीम अॅग्रोवन
रविवार, 26 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर : केवळ गोमातेला वाचविणे, हे हिंदुत्व आम्ही मानत नाही. गोमातेला वाचविणे हे हिंदुत्व आहेच; पण आत्महत्येचा विचार करणाऱ्या शेतकऱ्याला वाचविणे म्हणजेच हिंदुत्व, असे आम्ही मानतो, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (ता.२५) कुडित्रे (ता. करवीर) येथे केले.

कोल्हापूर : केवळ गोमातेला वाचविणे, हे हिंदुत्व आम्ही मानत नाही. गोमातेला वाचविणे हे हिंदुत्व आहेच; पण आत्महत्येचा विचार करणाऱ्या शेतकऱ्याला वाचविणे म्हणजेच हिंदुत्व, असे आम्ही मानतो, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (ता.२५) कुडित्रे (ता. करवीर) येथे केले.

कुंभी कासारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम आणि साखर पोती पूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित शेतकरी मेळाव्यात श्री. ठाकरे बोलत होते. श्री. ठाकरे यांनी भाजप सरकारवर कडाडून टीका करताना मी सत्तेत असलो तरीही सरकारचे गोडवे गाणार नाही. जे चुकीचे आहे, त्यावर मी बोलणारच, असे स्पष्ट करत नोटाबंदी, जीएसटी, कर्जमाफी अशा कोणत्याच निर्णयाचा लाभ जनतेला झालेला नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
कारखान्याच्या मैदानावर झालेल्या मेळाव्याला शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.

मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कर्जमाफी योजना सुरू केली. महिने होऊन गेले; पण शेतकऱ्यांच्या कर्जापैकी एक छदामही कर्ज कमी झाले नाही. नुसत्या घोषणा करणार असतील तर या सरकारची मी काय आरती ओवाळू? मग कॉंग्रेस आणि भाजपमध्ये फरक तरी काय?'''' असा सवाल श्री. ठाकरे यांनी या वेळी केला. कारखान्याचे अध्यक्ष चंद्रदीप नरके यांनी प्रास्ताविक केले.

अजित नरके, दादा लाड यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. व्यासपीठावर पाटबंधारे राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार विनायक राऊत, खासदार गजानन कीर्तीकर, आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, आमदार सत्यजित पाटील- सरुडकर, आमदार सुजित मिणचेकर, प्रकाश आबिटकर, प्रा. संजय मंडलिक, माजी आमदार संजय घाटगे, संग्राम कुपेकर उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
तंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...
ग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला  : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...
जमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी  ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...
नाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक  : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...
मोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...
संत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...
पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...
पुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...
साताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...
साखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर  : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...
मिरज पूर्व भागात पाण्यासाठी भटकंती सुरूच सांगली : म्हैसाळ योजनेचा उपसा सुरू होऊन महिना...
धुळ्यात हरभरा खरेदी केंद्रांची संख्या... धुळे  ः धुळे जिल्ह्यातही हरभरा व तुरीला...
येवल्यातून यंदा २८७३ टन द्राक्ष निर्यात येवला, जि. नाशिक : उन्हाळा आला की ५० वर गावांची...
फळबाग लागवडीकडे नाशिकमधील शेतकऱ्यांची... नाशिक : अस्मानी व सुल्तानी संकटात सापडलेल्या...
अकोला जिल्ह्यातील कृषी विभागात १०६ पदे...अकोला : जिल्ह्यात कृषी विभागात शंभरावर विविध पदे...
यंदा पीक आणि पाऊस साधारण : भेंडवळच्या...भेंडवळ जि. बुलडाणा : या हंगामात पीक आणि पाऊस...
मराठवाड्यासाठी २० सौरऊर्जा प्रकल्पांना... लातूर ः मराठवाड्यातील विजेची गरज लक्षात घेऊन...
तयारी हळद लागवडीची...हळद लागवडीसाठी चांगले उत्पादन देणाऱ्या जातींची...
सांगली जिल्ह्यात खंडित वीजपुरवठ्याने... सांगली  : कृष्णा आणि वारणा नदीचे पाणी...