नगर ः सरकार शहरांचे पोषण करण्यासाठी खेड्यांचे शोषण करत आहे.
ताज्या घडामोडी
जिनिंग व्यवसासिकांना खरेदीसाठी बाजार समिती यार्डाचाच पर्याय आहे. त्यामुळे स्पर्धा वाढून शेतकरी हित साधले जाते. परिणामी, बाजार समितीत दर १०० ते १५० रुपये क्विंटल जादा मिळतात. बुधवारी श्रीनिवास जिनिंगसाठीच्या खरेदीत ६ हजार ११ रुपये क्विंटलचा दर कापसाला मिळाला आहे.
- तुकाराम चांभारे, सचिव, बाजार समिती, हिंगणघाट, वर्धा
वर्धा : मागणी आणि पुरवठ्यातील तफावतीच्या परिणामी बाजारात कापसाच्या दरात तेजी आली आहे. बुधवारी (ता. २४) हिंगणघाट बाजार समितीत कापसाला ६ हजार ११ रुपये क्विंटलचा दर देण्यात आला. बाजार समितीत सुमारे १५०० क्विंटल आवक झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
हिंगणघाट तालुका हा कापसावरील प्रक्रिया उद्योगासाठीचे हब मानले जाते. तालुक्यात सुमारे वीस जिनिंग प्रेसिंग आहेत. त्यासोबतच नव्याने सूतगिरणीचे कामदेखील सुरू आहे. या प्रक्रिया उद्योजकांची कापसाची वाढती मागणी राहते. त्यामुळे स्पर्धेतून या ठिकाणी राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत मालाच्या प्रतवारीनुसार १०० ते १५० रुपये क्विंटलमागे अधिक मिळतात, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांकडून देण्यात आली.
या हंगामातील कापूस बाजारात येण्यास सुरवात झाल्याचे सूतोवाच मिळताच बाजार समितीकडून खरेदी सुरू करण्याच्या हालचाली झाल्या. सोमवार (ता. २२) पासून खरेदीला प्रारंभ बाजार समितीच्या यार्डात पार पडला. खरेदीच्या पहिल्या दिवशी ५ हजार ७०० रुपये क्विंटलचा दर देण्यात आला. बुधवारी (ता. २४) बाजार समितीत १५०० क्विंटल कापसाची आवक झाली.
या वेळी पार पडलेल्या लिलावादरम्यान कापसाची खरेदी ५ हजार ७५० ते ६ हजार ११ रुपये प्रति क्विंटलने झाली. श्रीनिवास जिनिंगकडून कापसाला उच्चांकी ६ हजार रुपयांपेक्षा अधिकचा दर देण्यात आला. या हंगामातील हा सर्वाधिक दर मानला जात आहे.
- 1 of 349
- ››