agriculture news in marathi, Hingoli district Horticrops faces drought condition | Agrowon

हिंगोली जिल्ह्यात फळबागांचे वाळून सरपण
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 मे 2018

हिंगोली : जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील अनेक गाव-शिवारातील फळबागा पाण्याअभावी जागेवरच वाळून गेल्या आहेत. फळबागांचे सरपण झाले आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

हिंगोली : जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील अनेक गाव-शिवारातील फळबागा पाण्याअभावी जागेवरच वाळून गेल्या आहेत. फळबागांचे सरपण झाले आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

गतवर्षीच्या पावसाळ्यात औंढा तालुक्यात कमी पाऊस झाला. खरिपाच्या पेरणीनंतर दीर्घ खंड पडल्यामुळे सोयाबीन, मूग, उडीद आदी पिके जागेवरच होरपळून गेली होती. खरिपातून काहीच हाती लागले नव्हते. कमी पावसामुळे केळी येथील लघू तलाव तसेच सिद्धेश्वर धरणदेखील भरले नाही. पूर्णा नदीचा प्रवाह खंडित झाल्यामुळे पात्र अनेक दिवसांपासून कोरडे पडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरी, बोअरची पाणीपातळी खालावत गेली. रब्बी पिकांसह उन्हाळी हंगामातील पिके पाण्याअभावी सकून गेली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता.

गेल्या महिनाभरापासून दिवसेंदिवस तापमानात होत असलेली वाढ तसेच भूगर्भातील पाण्याचा उपसा यामुळे सिंचनासह पिण्यासाठी पाणी कमी पडू लागले. औंढा नागनाथ तालुक्यातील केळी, येळी, हिवरखेडा, साळना, गोजेगाव, अनखळी पोटा, वाडी, उंडेगाव आदी गाव शिवारातील संत्रा, मोसंबी आदी गावांतील शेतकरी विविध फळबागांच्या माध्यमातून उत्पादन घेत आहेत. परंतु यंदा फळबागा आजवर कशाबशा तग धरून होत्या. परंतु वाढलेले ऊन आणि पाण्याची कमी उपलब्धता यामुळे अनेक गावांतील फळबागा जागेवरच वाळून जात आहेत. शेतकरी वाळलेली झाडे उपटून टाकत रान खरीप पेरणीसाठी मोकळे करत आहेत. फळबागा वाळल्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.

आजवर फळबागेतून चांगले उत्पन्न मिळाले. यंदा अडीच एकर पैकी एकर संत्राबाग पाणी कमी पडल्यामुळे जागेवरच वाळून गेली. उर्वरित बाग जिवंत राहण्याची खात्री नाही. नुकसानीचे पंचनामे करून मदत द्यावी.
- दिलीप दराडे, 
शेतकरी, अनखळी वाडी, जि. हिंगोली.

इतर ताज्या घडामोडी
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...
कापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव  ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...
पुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे  ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...