agriculture news in marathi, Hirapur animal market turnover four corer | Agrowon

हिरापूरच्या बैल बाजारात चार कोटींवर उलाढाल
सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

बीड : हिरापूर (ता. गेवराई) येथे बैलांचा आठवडे बाजार मंगळवारी (ता. २२) गर्दीने फुलून गेला. आगामी खरीप हंगाम आणि कारखान्यावरील ऊस वाहतुकीच्या तयारीसाठी आतापासूनच बैलांची खरेदी-विक्री वाढली आहे. बाजारात अडीचशेवर बैलजोड्या, तसेच दोनशेवर म्हशी व गायींची खरेदी-विक्री झाली. यातून चार कोटी रुपयांपर्यंत उलाढाल झाली.

बीड : हिरापूर (ता. गेवराई) येथे बैलांचा आठवडे बाजार मंगळवारी (ता. २२) गर्दीने फुलून गेला. आगामी खरीप हंगाम आणि कारखान्यावरील ऊस वाहतुकीच्या तयारीसाठी आतापासूनच बैलांची खरेदी-विक्री वाढली आहे. बाजारात अडीचशेवर बैलजोड्या, तसेच दोनशेवर म्हशी व गायींची खरेदी-विक्री झाली. यातून चार कोटी रुपयांपर्यंत उलाढाल झाली.

हिरापूर येथे अनेक वर्षांपासून मंगळवारी आठवडे बाजार भरतो. सिंदफणा नदीकाठी असलेले हे गाव धुळे-सोलापूर रोडवर असल्याने वाहतुकीसाठी सोयीचे आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून हा बाजार जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. दरम्यान, आता जून महिना जवळ येत असून उन्हाळी कामे आणि आगामी खरीप हंगामाची कामे करण्यासाठी शेतकऱ्यांनी बैलांची खरेदी-विक्री सुरू केली आहे. तसेच, आगामी महिन्यात पाऊस पडून काही दिवसांत चारा उपलब्ध होणार, असे गृहीत धरून शेतकऱ्यांकडून म्हशी आणि गायींचीही खरेदी वाढली आहे. दरम्यान, बाजारात जिल्ह्यासह पाथर्डी, जालना, परभणी आदी ठिकाणचे व्यापारी जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी येतात. दरम्यान, शेतकरी गावरान व जर्शी  बैल शेतीसाठी खरेदी करीत आहेत.

विक्रीसाठी येणाऱ्या बैलांच्या प्रजाती
गावरान, जर्शी, खिल्लार, मैसूर आदी विविध प्रकारच्या प्रजातींचे बैल बाजारात येत आहेत. मैसूर व खिल्लार प्रजातींचे बैल कारखान्यावर ऊस वाहतुकीसाठी वापरले जातात. गावरान व जर्शी बैलांच्या किमती ४५ हजारांपासून ६५ हजार रुपयांपर्यंत आहेत. तर, मैसूर व खिल्लार बैलजोडींची किंमत एक लाख रुपयांच्या घरात आहे. त्यापेक्षा अधिक किमतीच्या जोड्याही मंगळवारच्या बाजारात दिसून आल्या.

इतर अॅग्रो विशेष
इतिहासातील जलसंधारण संकल्पना अन्...मागच्या भागात आपण इतिहासातील सागरी किल्ल्यांवरील...
खानदेशात बाजरी मळणीवरजळगाव : खानदेशात बाजरी पीक मळणीवर आले आहे. आगामी...
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती : '...मुंबई ः शेतीच्या शाश्वत सुधारणेला गती देण्यासाठी...
सांगली : कडब्याचे दर पोचले साडेचार हजार...सांगली  ः यंदा दुष्काळी स्थिती तीव्र आहे....
सांगली जिल्ह्यात पाण्याअभावी रखडली खरड...सांगली  ः जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम अंतिम...
ऊस, कापूस पट्ट्यात कष्टाने पिकविली हळद शेतीचा फारसा अनुभव नाही. पण आवड, जिद्द,...
कृषी विद्यापीठांचे वाण वापरण्यात...वाशीम जिल्ह्यातील शिरपूर जैन (ता. मालेगाव) येथील...
राज्यात अद्यापही २४ टक्के ‘एफआरपी’ बाकीपुणे : ऊस खरेदीपोटी राज्यातील शेतकऱ्यांना...
उत्तर प्रदेशात ऊसबिलावरून धुमशाननवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत कोणता मुद्दा...
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी युवकाचा ‘...नाशिक : राज्यात नापिकी, दुष्काळ, बाजारभाव...
उन्हाचा ताप वाढण्याची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका अाणि उकाडा...
जेजुरी गडावर देवाची रंगपंचमीजेजुरी, जि. पुणे : जेजुरी गडावर पारंपरिक...
शेतकरी मंडळामुळे मिळाला ९० लाखांचा...वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : बॅंकेच्या चुकीमुळे...
कोंबडा झाकला तरी...मा  गील सात वर्षांत कृषी आणि सलग्न क्षेत्रातील...
शेतकऱ्यांची दैनावस्था दूर करणारा...गेल्या अनेक वर्षांत शेती आणि शेतकऱ्यांची जी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने अनेक ठिकाणी...
शिल्लक साखरेचा दबाव पुढील हंगामावर?कोल्हापूर : केंद्राने सुरू केलेल्या कोटा...
‘सॉर्टेड सिमेन’चा प्रयोग यशस्वीनगर : गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...
जांभरुण परांडे गावात जन्माला आली...अमरावती : जांभरुण परांडे (जि. वाशीम) येथे...
शेतकऱ्यांना व्यापार संधी उपलब्ध होणारपुणे : राज्यात फळे भाजीपाल्याचे वाढते...