agriculture news in Marathi, hit increased in state, Maharashtra | Agrowon

राज्यभरात उष्मा वाढला
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 9 मार्च 2018

पुणे ः हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. मालदीव व कोमोरिन परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होत आहे. कमाल, किमान तापमानात चढ-उतार होत असून उष्मा वाढला आहे.

पुणे ः हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. मालदीव व कोमोरिन परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होत आहे. कमाल, किमान तापमानात चढ-उतार होत असून उष्मा वाढला आहे.

मध्य महाराष्ट्राच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली असून लक्षद्वीप ते कोकण या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात गुरुवारी (ता. ८) हवामान ढगाळ होते. येत्या शनिवारी (ता.१०) व रविवारी (ता.११) विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला. 

कोकणातील अनेक भागात ढगाळ हवामान असून कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे. आज (शुक्रवारी) राज्यात हवामान कोरडे राहणार आहे. गुरुवारी (ता. ८) सकाळी आठ वाजेपर्यंत भिरा येथे ३९.० अंश सेल्सिअसची सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली, तर महाबळेश्वर येथे १७.० अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. 
कोकण, गोवा व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किंचित वाढ झाली आहे.

राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. 

गुरुवारी (ता. ८) सकाळी आठ वाजेपर्यंत नोंदविलेले कमाल व कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) ः  मुंबई ३१.२ (२३.०), सांताक्रूझ ३३.६ (२१.०), अलिबाग २९.७ (२१.०), रत्नागिरी ३२.२ (२१.०), डहाणू ३१.८ (२१.०), भिरा ३९.० (१९.०), पुणे ३६.२ (१७.९), नगर (१८.०), जळगाव ३६.० (१९.०), कोल्हापूर ३६.२ (१९.५), महाबळेश्वर ३०.९ (१७.२), मालेगाव ३६.४ (२०.०), नाशिक ३५.२ (१७.३), सांगली ३६.६ (२०.१), सातारा ३५.९ (१७.३), सोलापूर ३५.५ (२३.१), औरंगाबाद ३६.० (२०.४), परभणी ३६.६ (२१.५), नांदेड (२०.६), अकोला ३८.६ (२५.४), अमरावती ३६.२ (२२.२), बुलढाणा ३६.५ (२२.२), ब्रह्मपुरी ३८.१ (१७.८), चंद्रपूर ३६.८ (२३.०) वर्धा ३६.५ (२२.६), यवतमाळ ३६.५ (२४.४).

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
दुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...
मराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...
कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...
महिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...
द्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई  ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...
राज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...
देशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...
'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्‌...गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण...
दहशतवादी आणि त्यांच्या पाठिराख्यांना...पांढरकवडा : आपल्या लष्कराबद्दल आपल्याला गर्व आहे...
शेतीतूनच होते औद्योगिक विकासाची पायाभरणीची नमधील कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यकर्त्यांनी...
कसा टळेल मानव-वन्यप्राणी संघर्ष? अलीकडे वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान...
'मंडळात एकच छावणी'च्या निकषात बदल नगर  : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात...
पंधरा एकरांत उत्कृष्ठ हरभरा नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी (ता. शहादा)...
विविध प्रयोगांमधून वाढवले उत्पन्नाचे...यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथील महेश व दीपक या...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर ः परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
किमान विक्री मूल्यवाढीने साखर उद्योगात...कोल्हापूर : साखरेचे किमान विक्री मूल्य २९००...
जन्मोजन्मी दास । व्हावे हेचि माझी आस ।।जन्मोजन्मी दास । व्हावे हेचि माझी आस ।। पंढरीचा...
शहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी...तासगाव, जि. सांगली ः छत्रपती शिवाजी महाराज, डॉ....