‘भूजल’विरोधात आंदोलनाचा पवित्रा

‘भूजल’विरोधात आंदोलनाचा पवित्रा
‘भूजल’विरोधात आंदोलनाचा पवित्रा

लखमापूर, जि. नाशिक : शासनाने नव्याने भूजल अधिनियम आणला असून, या निर्णयास शेतकऱ्यांनी विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत हरकती नोंदविण्यात येऊन वेळप्रसंगी आंदोलन व न्यायालयात जाण्याचा निर्णय दिंडोरी येथे झालेल्या सर्वपक्षीय शेतकऱ्यांच्या बैठकीत घेतला. ‘कादवा’चे अध्यक्ष श्रीराम शेटे, आमदार नरहरी झिरवाळ, माजी आमदार धनराज महाले, वाघाड महासंघाचे चंद्रकांत राजे, शहाजी सोमवंशी, शिवाजी पिंगळ, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

या प्रश्‍नावर आमदार झिरवाळ, माजी आमदार धनराज महाले यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एकत्रित हरकती घेण्यात येणार आहेत. वीजदरवाढ प्रस्तावित केली असून, श्रीराम शेटेंनी सांगत याबाबतही हरकत नोंदविण्याचे ठरविले. जायकवाडी धरण भरावे यासाठी ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात पाणी अडविण्यावर निर्बंध घातले आहेत, यावर नाराजी व्यक्त केली. हे निर्बंध उठविण्याची मागणी केली.

गुजरातला वाया जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून तूट भरून काढणे शक्‍य असून, त्यासाठी शासनाने कार्यवाही करण्याची मागणी केली. शेतकऱ्यांनीही जागरूक होत सर्व धरणांच्या लाभक्षेत्रात पाणीवाटप सोसायट्या स्थापन कराव्यात व पाणी परवानगी घेऊन आपला पाण्यावरील कायदेशीर हक्क प्रस्थापित करावा, असे ठरले. या वेळी कोपरगाव साखर कारखान्याचे संचालक सोमनाथ पाटील चांदगुडे, विश्वासराव देशमुख, आर. के. खांदवे, गोपीनाथ गांगुर्डे, बाळासाहेब कदम, जे. डी. केदार, मनोज ढिकले, नितीन गांगुर्डे आदींनी मनोगत व्यक्त केले. बैठकीचे संयोजक नरेश देशमुख यांनी प्रास्ताविक केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com