agriculture news in marathi, Honey processing unit starts in pune | Agrowon

मधावर दर्जेदार प्रक्रियेसाठी पुण्यात केंद्र सुरू
टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 एप्रिल 2018

पुणे : ग्राहकांना उच्च दर्जाचा मध उपलब्ध व्हावा, यासाठी पुण्यातील केंद्रीय मधमाशीपालन संशोधन व प्रशिक्षण संस्थेत नुकतेच अत्याधुनिक स्वरूपाचे मधप्रक्रिया केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात आत्तापर्यंत मधप्रक्रियेसाठी चार व्यक्तींनी नोंदणी केली आहे. त्यामुळे किफायतशीर किमतीत चांगल्या अॅगमार्क दर्जाचा मध उपलब्ध होणार आहे.

पुणे : ग्राहकांना उच्च दर्जाचा मध उपलब्ध व्हावा, यासाठी पुण्यातील केंद्रीय मधमाशीपालन संशोधन व प्रशिक्षण संस्थेत नुकतेच अत्याधुनिक स्वरूपाचे मधप्रक्रिया केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात आत्तापर्यंत मधप्रक्रियेसाठी चार व्यक्तींनी नोंदणी केली आहे. त्यामुळे किफायतशीर किमतीत चांगल्या अॅगमार्क दर्जाचा मध उपलब्ध होणार आहे.

राज्यात मधमाशीपालन व्यवसाय करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. याकरिता केंद्रीय मधमाशीपालन संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रोत्साहन दिले जात आहे. ग्राहकांना चांगल्या दर्जाचा मध उपलब्ध होण्यासाठी अत्याधुनिक दर्जाच्या व तंत्रज्ञान आधारित मशिनरीचा वापर करून निर्मिती केली जात आहे. पाच ते सहा महिन्यांपूर्वी केंद्र शासनाच्या सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयामार्फत केंद्रीय मधमाशीपालन संशोधन व प्रशिक्षण संस्थेत मध प्रक्रिया केंद्र सुरू केले आहे. त्यासाठी केंद्र शासनाने जवळपास आठ लाख तीस हजार रुपयांचा खर्च करून पंजाबमधील लुधियाना येथून मशिनरीची खरेदी केली आहे. केंद्र मधप्रक्रिया येथे सुरू झाली आहे. शेतकरी, मधमाशीपालन उद्योग करणाऱ्या व्यक्तींनी मध काढून आणल्यानंतर त्यावर येथे प्रक्रिया करून मिळणार आहे. याकरिता प्रति किलो अकरा रुपयांचे शुल्क आकारण्यात येणार आहे. तसेच मधाच्या साठवणुकीसाठी ५० टाक्या उपलब्ध आहेत. या टाक्यांची क्षमता प्रत्येकी ५०० लिटर एवढी असून सुमारे एका वेळेस ५० हजार लिटर मधाची साठवणूक केली जाणार आहे. 

मधप्रक्रियेसाठी करणार मार्गदर्शन 
केंद्रात प्रक्रियेसाठी लागणारे मार्गदर्शन मध उत्पादकांना दिले जाणार आहे. यामध्ये मधासाठी लागणारी आर्द्रता, मधाचे तापमान, मधाची साठवणूक, मधाची विविध स्वरूपात लागणारी पँकिग अशी विविध माहिती मार्गदर्शन आणि थेट प्रक्रिया करण्याचा अनुभव मिळणार अाहे. त्यामुळे मध उत्पादकांना चांगल्या दर्जाचा मध उपलब्ध करता येणार आहे. तसेच विक्रीसाठी मदत केली जाणार आहे. 

मधाची तपासणी केली जाणार 
प्रक्रिया केलेल्या मधाचा दर्जा ठरविण्यासाठी केंद्रातच तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी केंद्रात स्वतंत्र प्रयोगशाळा उपलब्ध असून आवश्यक तेवढे मनुष्यबळही कार्यरत आहे. साधारणपणे चार-पाच दिवसांत तपासणी करून अॅगमार्क दर्जाचा मध उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांना चांगल्या दर्जाचा व प्रतीचा मध मिळणार आहे. 
 

केंद्रात मधावर प्रक्रिया केल्यामुळे होणारे फायदे 

  •  सार्वजनिक केंद्रामुळे खर्च कमी होणार 
  •  अत्याधुनिक मशिनरी असल्यामुळे वेळ वाचणार 
  •  एकाच ठिकाणी सर्व मशिनरी उपलब्ध असल्यामुळे मधाचा दर्जा ठरविता येणार 
  •  मधप्रक्रियेसाठी मोफत मार्गदर्शन मिळणार
  •  मधाची जास्त दिवस साठवणूक करता येणार 
  •  विक्रीसाठी केंद्राची मदत होणार 

मधमाशीपालन उत्पाकांनी आणलेल्या मधावर प्रक्रिया करून दिली जाणार आहे. केंद्रात त्यासाठी नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे मधाचा दर्जा ठरवून ग्राहकांना चांगल्या प्रतीचा मध मिळणार आहे. याशिवाय मधप्रक्रिया करणाऱ्या उत्पादकांना विविध सुविधांचा लाभ या केंद्रात दिला जाणार आहे. 
- डाॅ. आर. के सिंग, संचालक,
केंद्रीय मधमाशीपालन संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे

संपर्क : ०२० २५६७५८६५

इतर ताज्या घडामोडी
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...
सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर  ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...