agriculture news in marathi, Honor of Nashik Zilla Parishad in Delhi | Agrowon

नाशिक जिल्हा परिषदेचा दिल्लीत सन्मान
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

नाशिक : स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण या देशव्यापी सर्वेक्षणामध्ये आॅनलाइन नागरिकांच्या प्रतिक्रिया नोंदविण्यात नाशिक जिल्ह्याला देश पातळीवर प्रथम पुरस्कार, तर एकूण सर्वेक्षणात उत्कृष्ट कामगिरी करून ९६.३३ एवढे गुण मिळविल्याबद्दल पश्चिम विभागात तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार केंद्रीय पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री उमा भारती यांच्या हस्ते दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी हा सन्मान स्वीकारला.

नाशिक : स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण या देशव्यापी सर्वेक्षणामध्ये आॅनलाइन नागरिकांच्या प्रतिक्रिया नोंदविण्यात नाशिक जिल्ह्याला देश पातळीवर प्रथम पुरस्कार, तर एकूण सर्वेक्षणात उत्कृष्ट कामगिरी करून ९६.३३ एवढे गुण मिळविल्याबद्दल पश्चिम विभागात तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार केंद्रीय पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री उमा भारती यांच्या हस्ते दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी हा सन्मान स्वीकारला.

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ अंतर्गत शौचालय उपलब्धता व वापर, कचऱ्याचे व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, जाणीव जागृती, स्वच्छतेचे प्रमाण, हागणदारीमुक्त गावाची टक्केवारी आणि पडताळणी, सार्वजनिक जागेवरील स्वच्छतेचे निरीक्षण, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रे, बाजाराची ठिकाणे, मंदिरे-जत्रास्थळे, घनकचरा व्यवस्थापन आदी मुद्द्यांवर आधारित सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. सातारा जिल्हा प्रथम, तर गुजरातमधील पाटण जिल्हा द्वितीय पुरस्काराचा मानकरी ठरला. या वेळी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, केंद्रीय प्रधान सचिव परमेश्वर अय्यर, राज्याचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल आदी उपस्थित होते.

 पोषण आहारातही नाशिक अव्वल
सप्टेंबरपासून सुरू झालेल्या पोषण आहार अभियानांतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उपक्रम राबविण्यात आले आहेत. या अभियानात नाशिक जिल्हा देशात अग्रेसर आहे. पोषण आहार अभियानातील उत्कृष्ट कामगिरीबाबत मंगळवारी शासनाच्या एकात्मिक बालविकास विभागाच्या वतीने या अभियानाची सांगता झाली. या वेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते नाशिक जिल्ह्याचा प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रेय मुंडे, प्रमोद पवार यांनी हा सन्मान स्वीकारला.

इतर ताज्या घडामोडी
सातारा जिल्हा बॅंक देणार मध्यम मुदत...सातारा :  स्थापनेपासून गेल्या ६८ वर्षांत...
औरंगाबादेत हिरवी मिरची ४००० ते ५०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
जळगाव : खरिपाचा रासायनिक खतपुरवठा रखडलाजळगाव : रासायनिक खतांचा खरिपासंबंधीचा पुरवठा...
दुष्काळी मदतीची गावनिहाय माहिती जाहीर...मुंबई  : राज्यातील बहुतांश...
पाण्यासाठी भीमा नदीपात्रात ठिय्या आंदोलन मांडवगण फराटा, जि. पुणे  : घोड आणि...
निम्‍न दुधना धरणाच्या पाण्यासाठी...परभणी : दुष्काळामुळे मानवत तालुक्यातील दुधना...
‘उजनी’काठच्या शेतकऱ्यांची पिके...भिगवण, जि. पुणे   ः प्रशासनाच्या...
पुणे जिल्ह्यातील धरणे तळाशीपुणे  : जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा...
अकोल्यातील खरीप आढावा बैठक...अकोला  ः शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या...
दुष्काळ निवारणासाठी सातारा जिल्हा...सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्‍...
फळबागेत पाणी साठवण कुंड कोकणातील जांभ्या जमिनीमध्ये पाण्याच्या निचऱ्याचे...
फणस लागवड  उष्ण व दमट हवामान फणस पिकाला मानवते....
ऊसवाढीच्या टप्‍प्यानुसार द्या पुरेसे...जमिनीच्या प्रकारानुसार योग्य ठिबक सिंचन पद्धतीची...
पोटदुखीवर पेटाराच्या सालीचा काढा उपयुक्तस्थानिक नाव    : पेटार, पेटारी,...
उष्ण, कोरडे हवामान मॉन्सून वाटचालीस...महाराष्ट्राच्या पश्‍चिम भागावर १००८ हेप्टापास्कल...
भंगाराम तळोधी येथे राइसमिलवर कारवाईचंद्रपूर ः कृषी विभागाला मिळालेल्या गोपनीय...
परभणीत कोबीला प्रतिक्विंटल १२०० ते २०००...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
नाशिक जिल्ह्यातील ५४३ गावांची...नाशिक ः गावठाण निश्‍चितीसाठी गावांमध्ये ग्रामसभा...
नाशिक : टँकरने पाणीपुरवठ्यासाठी जीपीएस...नाशिक : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती अधिक जाणवू...
अनुदानाअभावी चारा छावण्या संकटातबिजवडी, जि. सातारा : माण तालुक्‍यामध्ये १९७२...