agriculture news in marathi, Honor of women in Aurangabad KVK | Agrowon

औरंगाबाद केव्हीकेत महिलांचा सन्मान
टीम अॅग्रोवन
रविवार, 21 ऑक्टोबर 2018

औरंगाबाद : महिला शेतकरी दिनाचे औचित्य साधून सोमवारी (ता. १५) औरंगाबाद येथील कृषी विज्ञान केंद्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या अठरा महिलांचा सत्कार करण्यात आला.

औरंगाबाद : महिला शेतकरी दिनाचे औचित्य साधून सोमवारी (ता. १५) औरंगाबाद येथील कृषी विज्ञान केंद्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या अठरा महिलांचा सत्कार करण्यात आला.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद व महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शेतीला जोडून असलेल्या प्रक्रिया उद्योगासह इतर विभागात उत्कृष्ट काम करत सत्कारास पात्र ठरलेल्या महिलांमध्ये शिवगंगाबाई विठ्ठलराव पोफळे, लक्ष्मीबाई विलासराव खंडागळे, चित्राबाई गणेश बुरकूल, सुनीताबाई हरिदास ठोंबरे, रेखाबाई रवींद्र वाहटूळे, जयाबाई साब्दे यांच्यासह इतर महिलांचा सहभाग होता.

राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. सूर्यकांत पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्राच्या प्रमुख दीप्ती पाटगावकर यांनी केले. महिंद्रा अँड महिंद्राच्या रिया दळवी, स्वप्नील जोशी, आत्माचे प्रकल्प संचालक प्रकाश आव्हाळे, रत्नप्रभा ऑटो एजन्सीच्या सोनाली पवार आदींची या वेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.

उस्मानाबादच्या पाणी व स्वच्छता विभागाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक रमाकांत गायकवाड, पशुवैद्यकीय महाविद्यालय परभणीचे डॉ. नितीन मार्कंडे यांनीही महिलांना या वेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन अनिता जिंतूरकर यांनी तर आभार महिंद्रा अँड महिंद्राचे जाधव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. किशोर झाडे, प्रा. गीता यादव यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

 

इतर बातम्या
वादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...
परिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...
दुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...
पुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...
खरेदी केंद्रांएेवजी सोयाबीनची बाजारात...जळगाव : जिल्ह्यात मका व ज्वारी खरेदीसंबंधी शासकीय...
दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदतीची आससिन्नर, जि. नाशिक : पावसाच्या अनियमिततेमुळे खरीप...
जुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...
राज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे  : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...
सोलापुरात ‘स्वाभिमानी'चे उपोषण सुरूचसोलापूर : गतवर्षीच्या हंगामातील थकीत एफआरपी...
कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी  : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...
नाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक  : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...
शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा   ः तुम्ही संकटात असताना...
दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नांदेड...
कृषी क्षेत्रातील उत्पन्नाची तफावत दूर...औरंगाबाद : गेल्या कित्येक वर्षांतील परिवर्तनात...
मोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...
पालखेडमधून आज आवर्तन सोडण्याची तयारीनाशिक : पालखेड डाव्या कालव्यातून येत्या दोन...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
पॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे   : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...