मोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे नुकसान

मोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे नुकसान
मोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे नुकसान

मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली मंडलातील ‘हुमणी’बाधित ऊस क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. १८ हजार १६८ शेतकऱ्यांचे १७ हजार एकरांचे ‘हुमणी’मुळे नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार जीवन बनसोडे यांनी दिली.

यंदा पाऊस नसल्याने खोडवा उसाची वाढ झाली नाही. त्यामुळे लागणीच्या उसापेक्षा खोडव्या उसाला ‘हुमणी’चा मोठा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान तर झालेच, पण उसाच्या वजनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण पूर्ण कोलमडले आहे. शेतकऱ्यांनी ‘हुमणी’बाबत प्रशासनाकडे तक्रारी केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधीक्षक यांनी तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन, तातडीने ‘हुमणी’बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान, तहसीलदार बनसोडे, तालुका कृषी अधिकारी श्रीधर जोशी व गटविकास अधिकारी अजिंक्‍य येळे यांनी बैठक होऊन पंचनाम्यासाठी तीन सदस्यीय पथकाची स्थापना केली होती. त्यात तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवक यांचा समावेश होता. त्यांनी महिनाभरापासून शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन समक्ष पाहणी केली. वस्तुस्थितीचे पंचनामे केले. पंचनामे करताना इतर कागदपत्रांबरोबरच आधार कार्ड व बॅंक पासबुकाच्या छायांकित प्रती घेतल्या.

मंडलनिहाय शेतकरी आणि बाधित क्षेत्र

मंडल एकूण शेतकरी बाधित क्षेत्र
मोहोळ     २८७९ २००० एकर
शेटफळ १३५३ १००० एकर
टाकळी सिकंदर  ४४८२ ३२५० एकर
कामती बु. ३२३१ २७५० एकर
वाघोली ५२५८ ५२५० एकर
पेनूर   ९५० २७५० एकर
नरखेड   १५ २३ एकर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com