ऊर्ध्व गोदावरी आराखडा मंजुरीने दुष्काळी भागाच्या आशा उंचावल्या

ऊर्ध्व गोदावरी आराखडा मंजुरीने दुष्काळी भागाच्या आशा उंचावल्या

नाशिक: पश्चिम वाहिन्यांचे वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात आणून नाशिकसह नगर व औरंगाबाद जिल्ह्याला वरदान ठरू पाहणाऱ्या मांजरपाडा प्रकल्पास राज्य मंत्रिमंडळाने नुकतीच मान्यता दिली. याबरोबरच पुणेगाव दरसवाडी व डोंगरगाव पोहोच कालव्याच्या रखडलेल्या कामांनाही सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यामुळे या ३ जिल्ह्यांतील दुष्काळी तालुक्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.  येवल्याचे आमदार व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने २००९  मध्ये नाशिक येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या वळण योजनेला मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी अडवून ते वळण योजनांद्वारे पूर्व वाहिनी खोऱ्यांमध्ये वळविण्यासाठी जलसंपदा विभागाने महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली होती. नाशिक जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रातील पश्चिम वाहिनी नद्यांचे गुजरातकडे वाहून जाणारे पाणी अडवून हे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी भुजबळ यांच्या प्रयत्नांमुळे सुरू झालेल्या मांजरपाडासह इतर प्रवाही वळण योजनांची अंतिम टप्प्यातील कामे रखडलेली होती. या योजनांमध्ये सुरगाणा तालुक्यातील मांजरपाडा, तर दिंडोरी तालुक्यातील गोळशी महाजे, ननाशी, पायरपाडा, पिंप्रज, आंबेगाव, झालीपाडा, धोंडाळपाडा, चाफ्याचा पाडा, रानपाडा, गोळशी, हट्टीपाडा, पळसविहीर, चिल्लरपाडा इत्यादी वळण योजनांचा समावेश आहे.  मंगळवारी (ता. ३०) नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मांजरपाडा प्रकल्पाच्या उर्वरित कामास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार बुधवारच्या (ता. १) बैठकीत त्यांनी दिलेला शब्द खरा ठरला. ८६ टक्के काम पूर्ण पश्चिम वाहिनी, पूर्व वाहिनी खोरे दुभाजक रेषेच्या पश्चिम बाजूला वाहत जाणारे छोटे छोटे नाले तीव्र उतार सुरू होण्याआधी छोटे बंधारे बांधून अडविणे, त्यांचा सांडवा पूर्व बाजूला काढून सांडव्यावरून वाहून जाणारे पाणी कालव्याद्वारे पूर्व बाजूला गोदावरी खोऱ्यात वळविणे असे या योजनांचे स्वरूप आहे. मांजरपाडा प्रकल्पातील ८.९६ किमी लांबीच्या बोगद्याचे ८६ टक्के, तर धरणाचे व सांडव्याचे जवळपास ६५ टक्के काम पूर्ण झालेले आहे. पोहोच कालव्याचे काम दोन वर्षांपासून बंद ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पांतर्गत पुणेगाव कालवा तसेच दरसवाडी पोहोच कालवा या कामांचा समावेश आहे. पुणेगाव डावा कालवा एकूण ६३ किलोमीटर लांबीचा असून, या कालव्याच्या १ ते २५ किलोमीटरमधील वाढीव विसर्गानुसार विस्तारीकरणाचे काम अपूर्ण आहे. ५० ते ६३ किलोमीटरपर्यंतच कालव्याचे क्रॉँकिटी अस्तरीकरण करण्याची नितांत आवश्यकता होती. दरसवाडी पोहोच कालव्याची एकूण लांबी ८८ किलोमीटर असून, त्यापैकी ४१ ते ८८ किलोमीटरचे काम अपूर्ण आहे. ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पात तृतीय प्रशासकीय मान्यता नसल्यामुळे व खर्चास निर्बंध असल्याने सदर पोहोच कालव्याचे कामे दोन वर्षांपासून बंद होते. आता या प्रकल्पाच्या तृतीय सुधारित प्रशासकीय अहवालास मान्यता मिळाल्याने काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com