agriculture news in marathi, The horrific loss of Humoney in Parbhani district | Agrowon

परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहर
टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

परभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी परिस्थितीत पाण्याअभावी उसाचे पीक वाळून जात आहे. त्यातच हुमणी किडीने उसावर हल्लाबोल केला आहे. पाथरी आणि गंगाखेड तालुक्यातील गाळपासाठी आलेल्या उसाचे हुमणीमुळे मोठे नुकसान झाले आहे. ऊस वाळून गेल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.

परभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी परिस्थितीत पाण्याअभावी उसाचे पीक वाळून जात आहे. त्यातच हुमणी किडीने उसावर हल्लाबोल केला आहे. पाथरी आणि गंगाखेड तालुक्यातील गाळपासाठी आलेल्या उसाचे हुमणीमुळे मोठे नुकसान झाले आहे. ऊस वाळून गेल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.

गतवर्षी सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्यामुळे ऊस लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. यंदाच्या हंगामात गाळपासाठी येणाऱ्या उसाचे एकूण क्षेत्र ४५ हजार हेक्टर आहे. यामध्ये परभणी तालुक्यातील १० हजार ५७० हेक्टर, पूर्णा तालुक्यातील ११ हजार १३२ हेक्टर, पाथरी तालुक्यातील ११ हजार ६०६ हेक्टर, गंगाखेड तालुक्यातील ५ हजार २१५ हेक्टर, मानवत तालुक्यातील २ हजार ३०९, सोनपेठ तालुक्यातील २ हजार ३११ हेक्टर, सेलू तालुक्यातील १ हजार २९० हेक्टर,पालम तालुक्यातील १ हजार १७० हेक्टर, जिंतूर तालुक्यातील ९७ हेक्टर उसाचा समावेश आहे.

यंदा पाथरी तालुक्यातील सोयाबीन, केळी, पेरू, ऊस आदी पिकांवर हुमणीचा प्रादुर्भाव झाला. ऊस लागवडीच्या ५ टक्के क्षेत्रावर हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याचा अंदाज आहे असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
पाथरी तालुक्यातील रेणापूर, बाभळगांव, लोणी आदी गावे तसेच गंगाखेड तालुक्यातील इसाद येथील अनेक शेतकऱ्यांच्या उसाला हुमणीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उभे पीक जागीच वाळून गेले आहे. हुमणीग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

पाथरी तालुक्यातील उसावर हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. कीटकशास्त्राज्ञांच्या पथकाने प्रादुर्भावग्रस्त उसाची पाहणी केली असून, नियंत्रणाच्या उपाययोजना शेतकऱ्यांना सांगिल्या जात आहेत.
- डाॅ. पी. आर. झंवर, कीटकशास्त्र, विभागप्रमुख, वनामकृवि, परभणी

 

इतर ताज्या घडामोडी
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...
कांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर   ः कांद्याचे दर घसरल्याने...