agriculture news in marathi, Horse padma gets high price in Sarangkheda | Agrowon

सौंदर्यवती "पद्‌मा' दोन कोटींना...
रमेश पाटील
रविवार, 17 डिसेंबर 2017

माझ्या मुलांप्रमाणे अश्‍वावर लक्ष ठेवतो. "पद्‌मा'च्या देखभालीसाठी स्वतंत्र दोन व्यक्ती काम करतात. तिचा खुराक, औषधे, व्यायाम यांसह अन्य बाबींकडे त्यांच्याकडून लक्ष पुरविले जाते. तिची किंमत दोन कोटी रुपये असून, दीड कोटीत खरेदीदाराकडून मागणी झाली आहे. 
- बालकृष्ण चंदेल, अश्‍वमालक, इंदूर 

सारंगखेडा (जि. नंदुरबार) - दररोज पंधरा लिटर दूध, खुराक म्हणून काजू, बदाम, किसमिस, खारीक व इतर बरेच काही. दिमतीला दोन सेवक... हे वर्णन कोणा पहिलवानाचे नाही, तर सारंगखेडा येथील एकमुखी दत्त यात्रेतील अश्‍व बाजारातील सौंदर्यवती "पद्‌मा'चे आहे. गेल्या वर्षी येथे झालेल्या अश्‍व सौंदर्य स्पर्धेत पहिल्या आलेल्या या अश्‍वाची किंमत दोन कोटी रुपयांपर्यंत लावली आहे. यंदा होणाऱ्या अश्‍व सौंदर्य स्पर्धेतही "पद्‌मा'चा सहभाग राहणार आहे. 

येथील अश्‍व बाजार महिनाभर सुरू राहणार असल्याने तरबेज, उमदे अश्‍व दाखल होत आहेत. आतापर्यंत अश्‍व बाजारात 2200 अश्‍व दाखल झाले आहेत. त्यापैकी साडेसातशे अश्‍वांची विक्री झाली असून, त्यात अडीच कोटींची उलाढाल झाली आहे. काल (ता. 14) "पद्‌मा'नामक पांढरी घोडी येथील बाजारात दाखल झाली. तिचे वाजत-गाजत स्वागत करण्यात आले. पांढऱ्या रंगालाही लाजवेल इतकी शुभ्र असलेल्या या अश्‍वाने आपल्या अदांनी अनेक अश्‍वप्रेमींना घायाळ केले आहे. काठेवाडी जातीची ही "पद्‌मा' चार वर्षांची असून, इंदूर (मध्य प्रदेश) येथील बालकृष्ण चंदेल यांच्या मालकीची आहे. तिची किंमत दोन कोटी रुपये लावली आहे. 

इतर ताज्या घडामोडी
यंदा पीक आणि पाऊस साधारण : भेंडवळच्या...भेंडवळ जि. बुलडाणा : या हंगामात पीक आणि पाऊस...
मराठवाड्यासाठी २० सौरऊर्जा प्रकल्पांना... लातूर ः मराठवाड्यातील विजेची गरज लक्षात घेऊन...
तयारी हळद लागवडीची...हळद लागवडीसाठी चांगले उत्पादन देणाऱ्या जातींची...
सांगली जिल्ह्यात खंडित वीजपुरवठ्याने... सांगली  : कृष्णा आणि वारणा नदीचे पाणी...
मराठवाड्यातील ३२१ गावांना ३९६...औरंगाबाद  : मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांत...
मिरजगाव येथे यंत्रणा सुरळीत, मात्र... नगर : तूर, हरभरा खरेदीसह अन्य बाबी ऑनलाइन...
नांदेड विभागातील २४ कारखान्यांचा गाळप... नांदेड :  नांदेड विभागातील यंदा गाळप सुरू...
व्यापाऱ्यांकडून फसवणूक : मनमाड बाजार...मनमाड, जि. नाशिक  : मनमाड कृषी उत्पन्न बाजार...
जळगाव येथे आंबा ४५०० ते ८००० रुपये... जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
कृषिपंपांच्या वीज थकबाकीवरून...मुंबई  ः सुमारे २३ हजार कोटी रुपयांच्या कृषी...
आमदार-खासदारांची धोरणे व्यापारीहिताचीपरभणी  ः आमदार-खासदारांनी संघटित होऊन...
पीकविमा परताव्यासाठीचे अन्नत्याग आंदोलन...परभणी  ः जिल्ह्यातील पीकविमा परताव्यापासून...
गुजरातमध्ये उन्हाळी पीक लागवड क्षेत्रात...मुंबई : सरदार सरोवर प्रकल्पातील कमी ...
`जलयुक्त`साठी पुणे जिल्ह्यातील 221...पुणे  ः पाणीटंचाई कमी करण्यासाठी राज्य...
नगर जिल्ह्यात ‘नरेगा’तून साडेसहा हजार... नगर  ः ग्रामीण भागात मजुरांना रोजगार...
मराठवाड्यातील लघू प्रकल्पांत १४ टक्के... औरंगाबाद  : एकीकडे उष्णतेचे प्रमाण वाढत...
बुलडाण्यातील सात हजारांवर कृषिपंपांची... बुलडाणा  ः जिल्ह्यात सद्यःस्थितीत सात...
बुलडाण्यात सोयाबीन क्षेत्र वाढण्याची... बुलडाणा  ः गेल्या हंगामात बीटी कपाशीवर...
कोल्हापूर जिल्ह्यातील गाळप हंगाम आटोपला कोल्हापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप...
तीन लाख ७२ हजार टन खतसाठा तीन...परभणी :  नांदेड, परभणी, हिंगोली...