agriculture news in marathi, horse pea rate analysis, | Agrowon

हरभऱ्यात नरमाईचा कल
दीपक चव्हाण
शुक्रवार, 8 डिसेंबर 2017

यंदा हरभरा उत्पादनात अपेक्षित मोठी वाढ, शिल्लक मालाचे प्रमाण आणि देशांतर्गत वार्षिक खप या तीन घटकांमुळे हरभऱ्याचा बाजार गेल्या दोन वर्षांइतका किफायती राहणार नाही असे दिसते. त्याचा पडताळा एनसीडीईएक्स या वायदे बाजारातील व्यवहारांतही दिसतोय. शुक्रवारी (ता. १) २० डिसेंबर मुदतीचा हरभरा वायदा १७२ रु. ने खाली येत ४५६० रु. प्रतिक्विंटलवर बंद झाला. २० सप्टेंबर २०१७ रोजी ५९५८ च्या उच्चाकांवरून मोठ्या फरकाने खाली आला आहे. पुढील वर्षांतील वायदेही नरमाईचा कल दाखवत आहेत. शुक्रवारचे (ता. १) वायदेनिहाय भाव असे : जानेवारी - ४५५२, मार्च- ४१३८, एप्रिल- ४१६०. 

यंदा हरभरा उत्पादनात अपेक्षित मोठी वाढ, शिल्लक मालाचे प्रमाण आणि देशांतर्गत वार्षिक खप या तीन घटकांमुळे हरभऱ्याचा बाजार गेल्या दोन वर्षांइतका किफायती राहणार नाही असे दिसते. त्याचा पडताळा एनसीडीईएक्स या वायदे बाजारातील व्यवहारांतही दिसतोय. शुक्रवारी (ता. १) २० डिसेंबर मुदतीचा हरभरा वायदा १७२ रु. ने खाली येत ४५६० रु. प्रतिक्विंटलवर बंद झाला. २० सप्टेंबर २०१७ रोजी ५९५८ च्या उच्चाकांवरून मोठ्या फरकाने खाली आला आहे. पुढील वर्षांतील वायदेही नरमाईचा कल दाखवत आहेत. शुक्रवारचे (ता. १) वायदेनिहाय भाव असे : जानेवारी - ४५५२, मार्च- ४१३८, एप्रिल- ४१६०. 

देशातील सर्वाधिक हरभरा पिकविणाऱ्या मध्य प्रदेशातून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून नवी आवक सुरू होईल, तर मार्चच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या बाजारात आवक वाढेल. सुमारे चार महिने कालावधीचे पीक असलेल्या हरभऱ्याचा मुख्य आवक हंगाम सुरू होण्यास ९० दिवसांचा कालावधी असताना किंवा अजूनही लेट पेरा सुरू असताना इतक्या मोठ्या प्रमाणात बाजारभाव कोसळण्यामागची कारणे समजून घेऊया.

केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या १ डिसेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार यंदा मागील वर्षाच्या तुलनेत हरभरा लागवडीत ७.८ टक्के वाढ आहे. अजूनही लेट पेरा सुरू असून, पुढील पंधरवड्यापर्यंत आजवरचा सर्वाधिक पेरा होण्याची शक्यता दिसतेय. देशात २०१६ मध्ये ७८ लाख हेक्टर, तर २०१५ मध्ये ६८ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरा झाला. २०१६ मध्ये तापमानवाढीमुळे दहा वर्षांतील सर्वांत कमी म्हणजे सुमारे ७० लाख टन उत्पादन मिळाले.

देशाची गरज सुमारे ९५ लाख टन असताना, २५ लाख टनांची तूट कॅलेंडर वर्ष २०१६ मध्ये निर्माण झाली. २०१५-१६ मधील १० लाख टन आयातीच्या माध्यमातून ही तूट कमी होणारी नव्हती. त्यामुळे देशांतर्गत हरभऱ्याचा बाजारभाव इतिहासातील विक्रमी १० हजार रुपये प्रतिक्विंटलच्या पातळीपर्यंत पोचला होता. विशेष म्हणजे मे २०१६ पर्यंत शेतकऱ्यांचा माल विकला गेल्यानंतर पुढे बाजारभावात १०० टक्क्यांची वाढ झाली. स्टॉकिस्ट मंडळींनी यात मोठा पैसा कमवला. कॅलेंडरवर्ष २०१७ च्या मार्चमध्ये पुरवठ्याचे चित्र सुधारले होते. उत्पादन ७० लाख टनांवरून ९३ लाख टनांपर्यंत सुधारले होते.

पण तरीही बाजारभाव आधारभावाच्या खाली गेले नाहीत. देशांतर्गत पाइपलाइनमध्ये १५ लाख टनांची तूट, आधीच्या तेजीमुळे शेतकऱ्यांकडील स्टॉकमध्ये वाढ, स्टॉकिस्टकडून खरेदीत वाढ आदी कारणांमुळे हंगामाची सुरवात चांगली झाली होती. मात्र, पुढे ऑगस्टनंतर बाजार उतरणीला लागला. बाजारभाव ५५०० वरून आजघडीला ४२०० रुपयांपर्यंत नरमला आहे.
मार्च २०१६ ते ऑक्टोबर २०१७ असे १८ महिने हरभऱ्याचा बाजार शेतकऱ्यांसाठी किफायती ठरला.

चार हजारांचा टप्पा कधीही न ओलांडलेल्या बाजाराने एकदम दहा हजाराला स्पर्श केला. त्यामुळे हरभऱ्यात शेतकरी गुंतवूणक वाढवणार हे स्पष्ट होते. तशी त्याची सुरवात मागच्या वर्षांपासूनची झाली होती आणि उत्पादनही उच्चांकी मिळाले. पण, वर उल्लेख केल्याप्रमाणे तूट भरून काढण्यात उत्पादनवाढीचा मोठा भाग खर्ची पडला. तसेच स्टॉकवाढीला प्रोत्साहन मिळाले, त्यामुळे मार्च २०१७ चा हंगाम सुरू झाल्यानंतर सहा महिन्यांपर्यंत बाजार किफायती राहिला. तथापि, यंदाचे पाऊसमान आणि आजघडीला पेरणी क्षेत्र वाढल्याचे आकडे आल्यामुळे बाजाराने दम तोडला आहे. याशिवाय, २०१६-१७ मध्ये दहा लाख टन हरभरा आयात झाल्याचे सरकारी अहवालात म्हटले आहे. एकूणच नवे पीक येईपर्यंत देशांतर्गत पुरवठा चांगला राहणार असल्याने बाजारात नरमाई राहणार आहे. अजूनही काही शेतकरी आणि स्टॉकिस्टकडे माल शिल्लक आहे. 

पुढील ९० दिवसांत पिकास अनुकूल वातावरण राहिले तर बाजार संभाव्य उत्पादनवाढ डोळ्यासमोर ठेऊन दबावत राहणार हे उघड आहे. किमान आधारभूत किमतीच्या खाली बाजारभाव जाईल का, हे इतक्यातच सांगणे घाईचे होईल. सरकारने मटारच्या आयातीवर ५० टक्के कर लावल्यामुळे हरभराडाळीतील स्वस्त भेसळीला आळा बसेल. या माध्यमातून हरभऱ्याला मागणीला आधार मिळणार आहे. आणखी एक अनुकूल बाब अशी, की हरभऱ्यावरील निर्यातबंदी मागे घेण्यात आली आहे. देशांतर्गत बाजारभाव आंतरराष्ट्रीय आयात पॅरिटीच्या आसपास जाण्याची शक्यता, ड्यूटीरूपाने आयातीवरील प्रतिबंध आदी कारणांमुळे २०१८ मध्ये देशाबाहेरून मालास येण्यास आडकाठी असेल. 

दरवर्षी हरभऱ्याची मागणी चार टक्क्यांनी वाढतेय. आजघडीला देशाची वार्षिक गरज सुमारे १०० लाख टन आहे. येत्या काढणी हंगामापर्यंत हवामान अनुकूल राहिले तर साधारण तेवढेच उत्पादन मिळू शकेल. टप्प्याटप्प्याने माल बाजारात आल्यास बाजारभावाला आधार मिळेल. मात्र, संभाव्य मंदीच्या शक्यतेमुळे घबराटीने विक्री (पॅनिक सेलिंग) सुरू झाली, तर तुरीमध्ये ज्याप्रमाणे सरकारी खरेदी झाली तशीच व्यवस्था हरभऱ्याबाबत करणे क्रमप्राप्त ठरेल. त्यासाठी आतापासून सरकारदरबारी पाठपुरवा करावा लागणार आहे.

(लेखक शेतीमाल बाजार अभ्यासक आहेत.)

इतर ताज्या घडामोडी
केळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...
करडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...
रताळे उत्पादनवाढीसाठी ओडिशाचा...पेरू येथील आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गीर, साहिवाल...पुणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध आणि कुक्कुट...
औरंगाबाद जिल्ह्यात ४६९७ क्‍विंटल...औरंगाबाद : हमीभावाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात मका...
मराठवाड्यातील ५६९ गाव-वाड्यांना टॅंकरऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाईचा सामना...
तुरीला ५००० पर्यंत दर, देशी वाणांना...जळगाव : खानदेशात तुरीची मळणी अनेक भागात सुरू झाली...
टँकरऐवजी पाइपलाइनने पाणीपुरवठा करा :...नागपूर : अपुऱ्या व अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील...
दिल्लीतील व्यावसायिकांनी फळबागा...नगर : नगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्‍यातील तीव्र...
सातारा जिल्ह्यातील धरणांत अल्प साठासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांत गतवर्षीच्या...
नाशिक जिल्हा बँकेत खडखडाट तरी सचिवांना...नाशिक : एकीकडे सभासदांना पुरेशी रक्कम देण्यास...
कर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...
योग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...
परभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
भाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...
यंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई  ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...
अटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...
कर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...
ग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...
प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...