agriculture news in Marathi, Horticulture affected by Stormy wind, hailstorm, Maharashtra | Agrowon

जत तालुक्यात वादळी वारे, गारपिटीने फळबागांचे नुकसान
टीम अॅग्रोवन
शनिवार, 27 ऑक्टोबर 2018

सांगली : जत तालुक्यातील वाषाण, रामपूर, येळदरी, शेगाव, घाटगेवाडी आणि बागेवाडी येथे गुरुवारी (ता. २५) सायंकाळी वादळी वारे आणि गारपिटीमुळे द्राक्ष, केळी आणि पपई बागा आणि हळद पिकाचे नुकसान झाले आहे. महसूल विभागाने या भागातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तलाठ्यांना दिले आहेत.

सांगली : जत तालुक्यातील वाषाण, रामपूर, येळदरी, शेगाव, घाटगेवाडी आणि बागेवाडी येथे गुरुवारी (ता. २५) सायंकाळी वादळी वारे आणि गारपिटीमुळे द्राक्ष, केळी आणि पपई बागा आणि हळद पिकाचे नुकसान झाले आहे. महसूल विभागाने या भागातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तलाठ्यांना दिले आहेत.

जत शहर व परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान तालुक्याच्या दक्षिण भागात विजांचा कडकडाट सुरू झाला. परंतु पाऊस पडला नाही. त्यादरम्यान बागेवाडी (ता. जत) येथे सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान वादळी वाऱ्यामुळे भगवान पडोळकर, सुखदेव आडगळे, शिवाजी वाघमारे यांच्या घरांवरील पत्रे व कौले उडून नुकसान झाले आहे. या परिसरात काही ठिकाणी वादळी वाऱ्याने झाडे उन्मळून पडली.

नुकसानीचा व्हिडिअो...

जतपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या घाटगेवाडी व रामपूर गावाच्या उत्तर बाजूला सुमारे तीन चौरस किलोमीटर परिसरात सायंकाळी अचानक गारपीट झाली. घाटगेवाडी येथे वादळी वारा, गारपिटीच्या पावसाने पपई बागेचे साडेसात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दुपारी चार ते पाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. वादळी पाऊस व गारा पडल्याने पपई बागेला आलेल्या फूलकळीचे नुकसान झाले आहे. त्यांच्या बागेचे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, तर कुलकर्णी यांच्या शेताशेजारील शशिकांत भोसले यांच्या एक एकर पपई बागेचेही अडीच लाखाचे नुकसान झाले आहे.

शुक्रवारी (ता. २६) सकाळी या तिन्ही गावात उपविभागीय कृषी अधिकारी के. बी. खोत यांनी भेट दिली आहे. पंचनामा करण्यासाठी सहा टीम करण्यात आली आहे. या टीममध्ये तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांचा समावेश आहे. सकाळपासून पंचनामे करण्यास संबधित विभागाचे अधिकारी यांनी सुरवात केली आहे.

उपविभागीय कृषी अधिकारी के. बी. खोत याबाबत म्हणाले, रामपूर गावातील द्राक्ष, हळद, केळी, पपई या पिकांचे नुकसान झाले आहे. वाशाण, रामपूर, येळदरी या गावात सुमारे ६० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. रामपूर गावात चार, वाशाण आणि येळदारी गावात अनुक्रमे एक टीम झालेल्या पिकाची पाहणी करून पंचनामे करणार आहेत. पंचनामे झाल्याशिवाय किती क्षेत्र बाधित झाले आहे आणि किती आर्थिक नुकसान झाले आहे याची माहिती सायंकाळी हाती येईल.

इतर अॅग्रो विशेष
विदर्भात भुईमूग शेंगाचे दर पोचले ५७००...नागपूर ः उन्हाळी भुईमुगाची आवक विदर्भातील अनेक...
खास पोह्यासाठी भाताची ‘कर्जत शताब्दी’...रत्नागिरी ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
महिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथमहिलांसाठी बचत गट चळवळ फायद्याची ठरली आहे. बचत...
कृषी, संलग्न विद्याशाखांसाठी ‘खासगी’कडे...पुणे : राज्यातील कृषी व संलग्न विद्याशाखांच्या...
गायी आणि म्हशींच्या गुणसूत्रांची बॅंक...पुणे ः  गायी, म्हशींच्या आनुवंशिक सुधारणा...
मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक स्थितीपुणे   : अरबी समुद्रात गुजरातच्या...
कोकणात पाऊस जोर धरणारपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळाचा प्रभाव ओसरू...
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...
अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...
कर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या...पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
सांगली जिल्ह्यात बेदाणा उत्पादनात वाढ,...सांगली ः बेदाणा निर्मितीसाठी प्रतिकूल वातावरण...
तिसऱ्या दिवशीही समुद्राला उधाणसिंधुदुर्ग : वायुवादळामुळे समुद्राला आलेले...
खरीप हंगामासाठी भेंडीची नवी जातचिपळूण ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
कोकणात बरसणार पूर्वमोसमीच्या सरीपुणे : ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात...
दुष्काळ सांगतो ‘जपून वापरा पाणी’हवामानाच्या नुकत्याच व्यक्‍त झालेल्या अंदाजानुसार...
‘असर’दार शिक्षणासाठी...कृषी पदवीधर आता माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी...
मॉन्सूनची दक्षिण कर्नाटकपर्यंत चालपुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...