agriculture news in marathi, horticulture plantation scheme status, maharashtra | Agrowon

राज्यात १३ हजार हेक्टरवर नवीन फळबाग लागवड
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 डिसेंबर 2017
पुणे  : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत कृषी विभागाच्या माध्यमातून राज्यात शेतकऱ्यांनी आतापर्यंत १३ हजार हेक्टरवर नवीन फळबाग लागवड केली आहे. 
 
रोजगार हमी योजना आता ''एमआरईजीएस'' नावाने ओळखली जाते. शेतकऱ्यांना या योजनेतून २०१६ ते २०१८ अशा दोन लागवड हंगामाच्या मुदतीत एक लाख ११ हजार हेक्टरवरील फळबागांसाठी अनुदान दिले जाणार आहे. यापैकी १३ हजार ७२६ हेक्टरवर फळबागा उभ्या राहिल्या आहेत, असे कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.
 
पुणे  : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत कृषी विभागाच्या माध्यमातून राज्यात शेतकऱ्यांनी आतापर्यंत १३ हजार हेक्टरवर नवीन फळबाग लागवड केली आहे. 
 
रोजगार हमी योजना आता ''एमआरईजीएस'' नावाने ओळखली जाते. शेतकऱ्यांना या योजनेतून २०१६ ते २०१८ अशा दोन लागवड हंगामाच्या मुदतीत एक लाख ११ हजार हेक्टरवरील फळबागांसाठी अनुदान दिले जाणार आहे. यापैकी १३ हजार ७२६ हेक्टरवर फळबागा उभ्या राहिल्या आहेत, असे कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.
 
फळबाग लागवडीसाठी निधीची टंचाई नाही, तसेच लागवडीचे लक्ष्यांकदेखील लवचिक आहेत. फळबागांसाठी नव्या मापदंडानुसार अनुदान दिले जात आहे. योजनेत सध्या शासन पातळीवर काहीही अडचणी नाहीत. मात्र, शेतकऱ्यांनीच पुढाकार घेत नव्या फळबागा लागवडीसाठी या योजनेचा लाभ घ्यावा, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
कृषी विभागाच्या माध्यमातून आतापर्यंत पालघर, नंदूरबार, भंडारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये चांगली फळबाग लागवड झाली आहे. 
 
राज्यातील शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी ''एमआरईजीएस''मधून पहिल्याच वर्षी ५० टक्के अनुदान मिळते. दुसऱ्या वर्षी ३० टक्के आणि तिसऱ्या वर्षी २० टक्के अनुदान दिले जाते. त्यामुळे आंब्यासाठी शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १.६७ लाख रुपये, काजूसाठी एक लाख रुपये, डाळिंबाला १.२० लाख रुपये, तर संत्रा लागवडीसाठी सव्वा लाखाचे अनुदान दिले जात आहे, असे कृषी आयुक्तालयातून सांगण्यात आले.
 
विभागनिहाय आतापर्यंत झालेली फळबाग लागवड (हेक्टर)ः ठाणे ६७६५, नाशिक १४५५, पुणे ११२८, कोल्हापूर ८५९, औरंगाबाद ६८३, लातूर ७४३, अमरावती १२२८, नागपूर ८६३. 

इतर अॅग्रो विशेष
‘कृष्णा’ आली दिघंचीच्या अंगणीदिघंची, जि. सांगली ः  अनेक वर्षे दिवास्वप्न...
जनावरांच्या बाजारातील व्यवहार उधारीवरचपरभणी: खरिपाच्या पेरणीच्या तोंडावर काहीशी...
सहकार विभाग आयुक्तांविना पोरकापुणे : गेल्या आठ महिन्यांपासून राज्याच्या सहकार...
आत्मा प्रकल्प संचालक चौकशीत दोषीपुणे: कृषी खात्यातील वादग्रस्त अधिकारी बी. एन....
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या ‘व्होट शेअर’...पुणे : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता...
खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवड सुरू जळगाव ः खानदेशात मुबलक जलसाठे किंवा कृत्रिम...
कोकण वगळता उष्ण लाटेचा इशारापुणे : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या...
शेतकऱ्यांनो विकते ते पिकवाः डॉ. भालेअकोला ः येत्या हंगामात पीक लागवड करताना...
हतबलतेतून फळबागांवर कुऱ्हाड अन्‌...जालना : जीवापाड जपलेली बाग वाचविण्यासाठी रानोमाळ...
विषाणूंद्वारे खोल मातीतही पोचविता येतील...मातीमध्ये खोलवर पिकाच्या मुळावर एखाद्या बुरशी...
जळगाव : शिवारात पाणीबाणी, शेतकरीराजा...जळगाव ः गावात तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाने...
हरवले जलभान कोनाड्यात‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’...
मोदी लाटेचे गारुडसतराव्या लोकसभेचे भवितव्य स्पष्ट झालेले आहे. खरे...
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
चंदन लागवडचंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे....
हुमणीच्या प्रौढ भुंगे­ऱ्यांचा सामुदायिक...गेल्या काही वर्षांत राज्यामध्ये हुमणी अळीचा...
संरक्षित शेतीतून आर्वीतील शेतकऱ्यांची...वाढती पाणीटंचाई आणि  बदलत्या हवामानामुळे...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...
राजू शेट्टींच्या पराभवाने शेतकरी...कोल्हापूर ः शेतीविषयक विविध प्रश्‍नांबाबत देश...
मोदीच आजच्या महाविजयाचे महानायक : अमित...नवी दिल्ली : देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या...