agriculture news in marathi, horticulture plantation status, nashik, maharashtra | Agrowon

फळबाग लागवडीकडे नाशिकमधील शेतकऱ्यांची पाठ
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 20 एप्रिल 2018
नाशिक : अस्मानी व सुल्तानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने रोजगार हमी योजनेतून फळबागा उभारण्यासाठी मदतीचा हात दिला. मात्र, शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरविल्याचे स्पष्ट होते आहे.
 
नाशिक : अस्मानी व सुल्तानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने रोजगार हमी योजनेतून फळबागा उभारण्यासाठी मदतीचा हात दिला. मात्र, शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरविल्याचे स्पष्ट होते आहे.
 
जिल्ह्यात आजमितीस फळबाग लागवडीसाठी १६५२ प्रस्ताव आले असून, त्यापैकी ४६२ बागांची कामे पूर्ण झाली आहेत. ६०७ ठिकाणी कामे सुरू असून, ५८३ बागांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. सरकारने रोजगार हमी योजनेतून राज्यात एक लाख ११ हजार १११ हेक्‍टर क्षेत्रावर फळबागा लागवडीचे लक्ष्य ठेवले आहे. योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या बागांचे तीन वर्षापर्यंत संगोपन केले जाणार आहे. 
 
शेतकऱ्यांना हक्काचे उत्पन्न प्राप्त व्हावे आणि मजुरांना रोजगार मिळावा हा या योजनेमागील उद्देश आहे. आंबा, पेरू, मोसंबी, डाळिंब अशा विविध प्रकारच्या २४ फळांच्या बागा या योजनेत घेता येतात. शेताच्या बांधावर २६ प्रकारच्या फळझाडांची लागवड करता येणे शक्‍य आहे. शेतीमालाला भाव मिळत नसल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांसाठी ११ कलमी कार्यक्रमांतर्गत रोजगार हमी योजनेमधून फळबागांच्या लागवडीचा उपक्रम आखण्यात आला.
 
जिल्ह्यातील कळवण, सुरगाणा भागात डाळिंब, स्ट्रॉबेरीचे भरघोस उत्पादन घेतले जाते. स्ट्रॉबेरी गुजरातमध्ये निर्यात केली जाते. जिल्ह्यात पेरू, मोसंबी व इतर फळपिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे जिल्ह्यात फळबागांचा उपक्रम यशस्वी होणे अपेक्षित होते. मात्र, गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यासाठी दिलेल्या एकूण लक्षाकांपैकी केवळ ३० टक्केच बागा पूर्ण करण्यात यश आल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे. 
 
फळबागा अथवा बांधावर फळझाडांची लागवड केल्यानंतर पुढील तीन वर्षे संगोपनाची जबाबदारी कृषी विभागावर आहे. झाडांच्या संगोपनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे आवश्‍यक आहे. अस्मानी व सुल्तानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने रोजगार हमी योजनेतून फळबागा उभारण्यासाठी मदतीचा हात दिला. 
मात्र, शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवल्याचे स्पष्ट होते आहे.
 
जिल्ह्यात आजमितीस एक हजार ६५२ फळबागांचे प्रस्ताव आले असून, त्यापैकी ४६२ बागांचे काम पूर्ण झाले आहे. ६०७ ठिकाणी काम सुरू असून, ५८३ बागांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत.

इतर ताज्या घडामोडी
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...
सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर  ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...