साताऱ्यात मनरेगाअंतर्गत ८४० हेक्‍टरवर फळबाग लागवड

फळबाग लागवड
फळबाग लागवड

सातारा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत २०१७-१८ मध्ये फळबाग लागवडीचे १८.५१ टक्के उद्दिष्ट साध्य झाले. जिल्ह्यात यंदा ४५३९ हेक्‍टरवर फळबाग लागवडीचा लक्ष्यांक होता. त्यापैकी ८४०.५७ हेक्‍टरवर फळबाग लागवड झाली. यामध्ये फलटण तालुक्‍याने आघाडी घेतली आहे,अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

फलोत्पादन संचालनालय, ग्रामपंचायत व कृषी विभागातर्फे वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी पडीक जमीन, सलग जमीन व बांधावर फळबाग लागवडीसाठी ‘मनरेगा’तून प्रोत्साहन देण्यात येत आहे. फळबाग लागवड योजनेअंतर्गत आंबा, काजू, चिकू, पेरू, डाळिंब, संत्री, मोसंबी, लिंबू, नारळ, बोर, सीताफळ, आवळा, चिंच, कोकम, फणस, अंजीर, सुपारी या फळझाडांची लागवड करण्यात येत आहे.

लागवडपूर्व मशागत, लागवड, संगोपन करण्यासाठी मजुरी, रोपे, खते यासाठी तीन वर्षांच्या कालावधीमध्ये पीकनिहाय मापदंडानुसार निधी दिला जातो. मजुरी लाभार्थ्यांच्या खात्यावर तर खते आणि रोपांसाठीचा निधी संबंधित एजन्सीच्या खात्यावरून थेट जमा करण्यात येतो.

जिल्ह्यात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने बागायती शेतीत वाढ होऊ लागली आहे. या योजनेतून बांधावर फळ लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल जास्त आहे. जिल्ह्यात एकूण ८४०.५७ हेक्‍टर क्षेत्रावर ६२ हजार १०९ विविध जातींच्या रोपांची फळबाग लागवड झाली आहे. यापैकी ६९२.८७ हेक्‍टर बांधावर फळबाग लागवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर सलग जमिनीवर १४९.०८ हेक्‍टर क्षेत्रावर तर १.६८ हेक्‍टर पडीक क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात आली आहे. 

तालुकानिहाय लागवड क्षेत्र (हेक्‍टर) ः सातारा १३१.४५, कोरेगाव १८२.१४, खटाव १७.९, कऱ्हाड ६०.३, पाटण १४.१९, वाई १०४.९८, जावली ६.७५, खंडाळा १४३.२२, महाबळेश्वर ११.००, फलटण १४६.०३, माण २१.९. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com