agriculture news in marathi, Horticulture plantation target Far away | Agrowon

फळबाग लागवडीत खोडा; उद्दिष्टपूर्ती कोसो दूर
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 9 जानेवारी 2018

परभणी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गंत फळबाग लागवडीसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. यंदा २ हजार ४६ शेतकऱ्यांना १ हजार ४४३.४५ हेक्टरवर फळबाग लागवडीसाठी प्रशासकीय मंजुरी दिलेली आहे. परंतु डिसेंबर अखेरपर्यंत नऊ पैकी चार तालुक्यातील केवळ ५८ शेतकऱ्यांनी ४०.६० हेक्टरवर लागवड केली आहे. खड्डे खोदूनही रोपे उपलब्ध करून दिली जात नसल्यामुळे फळबाग लागवड करता येत नाही. मजुरीचा भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागला. विविध कारणांनी खोडा निर्माण होत असल्याने फळबाग लागवडीची उद्दिष्टपूर्ती अद्याप कोसो दूर आहे.

परभणी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गंत फळबाग लागवडीसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. यंदा २ हजार ४६ शेतकऱ्यांना १ हजार ४४३.४५ हेक्टरवर फळबाग लागवडीसाठी प्रशासकीय मंजुरी दिलेली आहे. परंतु डिसेंबर अखेरपर्यंत नऊ पैकी चार तालुक्यातील केवळ ५८ शेतकऱ्यांनी ४०.६० हेक्टरवर लागवड केली आहे. खड्डे खोदूनही रोपे उपलब्ध करून दिली जात नसल्यामुळे फळबाग लागवड करता येत नाही. मजुरीचा भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागला. विविध कारणांनी खोडा निर्माण होत असल्याने फळबाग लागवडीची उद्दिष्टपूर्ती अद्याप कोसो दूर आहे.

यंदा परभणी जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेअंतर्गत २ हजार ८०० हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील २ हजार ३९३ शेतकऱ्यांनी १ हजार ८६४.७० हेक्टरवर फळबाग लागवड करण्यासाठी कृषी विभागाकडे अर्ज केलेले आहेत.

एकूण २ हजार ५८ शेतकऱ्यांना १ हजार ५०४.३५ हेक्टरवर फळबाग लागवडीसाठी तांत्रिक मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी १ हजार ४४३.५ हेक्टर फळबाग लागवडीसाठी २ हजार ४६ शेतकऱ्यांच्या अर्जांना प्रशासकीय मंजुरी दिलेली आहे, परंतु डिसेंबरअखेर केवळ ५८ शेतकऱ्यांनीच ४०.६० हेक्टरवर फळबाग लागवड झाली आहे.
जिल्ह्यातील नऊ तालुक्यांपैकी परभणी तालुक्यात सर्वाधिक ३१.९० हेक्टरवर फळबाग लागवड झाली आहे.

पाथरी तालुक्यात ५.८० हेक्टरवर, सोनपेठ तालुक्यात ०.५० हेक्टर, गंगाखेड तालुक्यात २.४० हेक्टर अशी एकूण ४०.६० हेक्टरवर फळबाग लागवड झाली आहे. यामध्ये आंबा ११.५० हेक्टर, चिकू १ हेक्टर, पेरू १.९० हेक्टर, डाळिंब ३ हेक्टर, संत्रा १२.७० हेक्टर, मोसंबी १.६० हेक्टर, कागदी लिंबू ५.९० हेक्टर, सिताफळ ३ हेक्टर या फळपिकांचा समावेश आहे.

फळबाग लागवड प्रस्तावास मंजुरी मिळाली असली, तरी कमी पावसामुळे सिंचनासाठी पाणी उपलब्ध नसल्यामुळे अनेक शेतकरी आता फळबाग लागवडीसाठी इच्छूक नाहीत.

मनरेगाअंतर्गत मजुरीचे देयक वेळेवर मिळत नाहीत. अनेक ठिकाणी ग्रामरोजगार सेवक सहकार्य करत नसल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. मनरेगाअंतर्गत फळबाग लागवडीसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे, परंतु संबंधित शेतकऱ्यांकडे शाश्वत पाण्याची उपलब्धता आहे. याची खातरजमा कृषी विभागाने करणे अनिवार्य करण्यात आले आहे. जिल्ह्यात यंदा कमी पाऊस झाल्यामुळे विहिरी, बोअरची पाणीपातळी खालावत आहे. प्रकल्पातील पाणीसाठा कमी होत आहे. येत्या काही दिवसांत अनेक तालुक्यांत सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार नाही. त्यामुळे फळबाग लागवडीसाठी मुदत देऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फारसा उपयोग होणार नाही.

संत्रा आणि आंबा लागवडीसाठी गावातील २० शेतकऱ्यांनी खड्डे खोदून दोन महिने झाले, अजून रोपे उपलब्ध झाली नाहीत. मनरेगाचे मस्टर रद्द करण्यात आल्यामुळे मजुरी घरातून द्यावी लागल्याने भुर्दंड बसला आहे.
रामेश्वर निर्वळ, शेतकरी, रुढी, ता. मानवत, जि. परभणी.

इतर ताज्या घडामोडी
कृषी सल्ला : ऊस, कापूस, उन्हाळी भुईमूग...हवामान अंदाज - शुक्रवार - शनिवारी (ता. २६ - २७)...
द्राक्ष बागेचे वाढत्या तापमानातील...नव्या आणि जुन्या द्राक्ष बागांचा विचार केला असता...
ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केटची दुष्काळाशी...ऑस्ट्रेलियातील एका सुपर मार्केटने दुष्काळाशी...
गोदावरीत प्रदूषण केल्यास होणार कारवाईनाशिक : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी...
सोलापुरात टंचाई निवारणाचा भार...सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग...
खानदेशात पपईला उन्हासह पाणीटंचाईचा फटकानंदुरबार : खानदेशात या हंगामात पपई लागवड कमी...
जळगावात पांढऱ्या कांद्याच्या आवकेत घटजळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सांगली बाजारसमितीत हळद, गुळाची उलाढाल ...सांगली ः व्यापाऱ्यांना सेवाकराच्या नोटिसा...
नगर जिल्ह्यात छावण्यांवर दर दिवसाला...नगर  : नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळात पशुधन...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई होतेय तीव्रसातारा ः जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणीटंचाई तीव्र होत...
पुणे जिल्ह्यासाठी २६ हजार ५७३ क्विंटल...पुणे  ः खरीप हंगाम सुरू होण्यास एक ते दीड...
तंटामुक्‍त गाव अभियानाला चंद्रपुरात...चंद्रपूर : शांततेतून समृद्धीकडे जाण्याचा...
अमरावतीत तुर चुकाऱ्यासाठी हवे ८७ कोटी;... अमरावती : चुकाऱ्यांसाठी यंदा शेतकऱ्यांना...
शेतीच्या दृष्टीने सरकारचा कारभार...नाशिक : अगोदरचा कालखंड व ही पाच वर्षे यात...
अमरावतीतून ९१ विहिरी अधिग्रहणाचे...अमरावती  ः सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे...
शिल्लक एफआरपी मिळत नसल्याने साताऱ्यातील...सातारा  : अजिंक्यतारा कारखान्याचा अपवाद...
कांदा दर वाढले, तेव्हा भाजपने विरोध...नाशिक   ः कृषिमंत्री असताना मी...
'मतदान झालेल्या दुष्काळी भागात ...मुंबई  ः लोकसभेच्या मतदानाच्या तीन...
उच्चांकी मतदानामुळे कोल्हापूर मतदारसंघ...कोल्हापूर  : राज्याच्या तुलनेत कोल्हापूर...
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...