agriculture news in marathi, Horticulture spoilage in Nanded, Parbhani, Hingoli districts | Agrowon

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत फळबागांची नासाडी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांत सोमवारी (ता.१२) दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस तसेच गारपीट झाल्याने फळबागा, रब्बी पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे तोंडाचा घास हिरावण्याची चिन्हे दिसू लागल्यामुळे या तीन जिल्ह्यांतील शेतकरी चिंतित झाले आहेत.

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांत सोमवारी (ता.१२) दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस तसेच गारपीट झाल्याने फळबागा, रब्बी पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे तोंडाचा घास हिरावण्याची चिन्हे दिसू लागल्यामुळे या तीन जिल्ह्यांतील शेतकरी चिंतित झाले आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील विविध भागात अवकाळी पाऊस, गारपिटीने थैमान घातले आहे. रविवार (ता.११) पाठोपाठ सोमवारी (ता.१२) दुपारी साडेचारच्या सुमारास नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव तसेच परिसरातील धानोरा, तळणी, पोखर्णी, ढोकी, खडकी, नाळेश्वर, मरळक गावशिवारात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यामध्ये मोसंबी, लिंबू, डाळिंब, केळी, आंबा आदी फळबागासह गहू,ज्वारी, हरभरा पिके, भाजीपाल्याचे नुकसान झाले.

हादगांव, लोहा, कंधार तालुक्यातील अनेक तालुक्यांतील गावशिवारात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. हिमायतनगर तालुक्यात वादळी वाऱ्यात पिलर कोसळून पाचजण जखमी झाले. दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील ६१ मंडळांमध्ये सरसरी १६ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील चुडावा, गौर, नऱ्हापूर, गोविंदपूर, सोनखेड, पिंपळगांव लिखा, कावलगांव, बरबडी, महागांव, सारंगी, आडगांव, पांढरी, धनगर टाकळी, पिंपळगाव भत्त्या सातेगांव, सोन्ना, निळा, चांगेफळ, भाटेगांव, कळगांव आदी गावशिवारात झालेल्या गारपिटीमुळे पपई, मोसंबी आदी पिकांसह गहू,ज्वारी, हरभरा पिकांची नासाडी झाली.

परभणी तालुक्यातील झरी तसेच परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. पूर्णा तालुक्यात एका महिलेचा मृत्यू झाला तर अन्य सहा जण गारपिटीत सापडून जखमी झाले. पिंपळगाव लिखा गावातील एक वासरू गारपिटीत सापडून दगावले.

हिंगोली जिल्ह्यातील गेल्या दोन दिवसांत झालेल्या गारपिटीमुळे औंढानागनाथ, सेनगांव, वसमत, कळमनुरी या तालुक्यातील १५ ते २० गावांतील २५० ते ३०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सोमवारी (ता.१२) दुपारनंतर वसमत तालुक्यातील कुरुंदा मंडळातील कुरुंदा, नेहरुनगर, पारडी, दाभडी, कोथारी या गावांच्या शिवारात गारपीट झाल्यामुळे पपई सह अन्य फळबागांचे नुकसान झाले.हट्टा मंडळातील आडगांव, हट्टा आदी ठिकाणी वाऱ्यासह पाऊस झाला.

कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर, वारंगाफाटा, आदी ठिकाणी गारपीट झाली. दरम्यान, नुकसानीच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (हिंगोली) व्ही. डी. लोखंडे यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...