agriculture news in marathi, House Adjourned due to Heavy Rain and electricity problem | Agrowon

पाणी तुंबल्याने वीज गेली, विधासभेचे कामकाज तहकूब
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 6 जुलै 2018

नागपूर : अट्टहासाने नागपूरला पावसाळी अधिवेशन घेतल्यानंतर आज (ता.६) पहिल्याच पावसात विधीमंडळाचे अधिवेशन सोमवारपर्यंत स्थगित करावे लागले. विधानभवनाच्या पाॅवर हाऊसमध्ये पाणी साचल्याने संपुर्ण वीज बंद करण्याची नामुष्की ओढावली. विधीमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच वीज गायब झाल्याने सभागृह स्थगित करावे लागले. विधानभवनात येणारे अधिकारी, कर्मचारी व नागरीकांच्या ओळखपत्राची मोबाईलच्या बॅटरीमधून तपासणी करण्यात येत होती. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या निष्काळजीपणावर टिका केली. 
दरम्यान 

नागपूर : अट्टहासाने नागपूरला पावसाळी अधिवेशन घेतल्यानंतर आज (ता.६) पहिल्याच पावसात विधीमंडळाचे अधिवेशन सोमवारपर्यंत स्थगित करावे लागले. विधानभवनाच्या पाॅवर हाऊसमध्ये पाणी साचल्याने संपुर्ण वीज बंद करण्याची नामुष्की ओढावली. विधीमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच वीज गायब झाल्याने सभागृह स्थगित करावे लागले. विधानभवनात येणारे अधिकारी, कर्मचारी व नागरीकांच्या ओळखपत्राची मोबाईलच्या बॅटरीमधून तपासणी करण्यात येत होती. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या निष्काळजीपणावर टिका केली. 
दरम्यान 

अजित पवार यांनी संताप व्यक्त करत कशाला केला होता अट्टहास ? मुहूर्तावर अधिवेशन घेतले तरी संकट टाळता आले नाही काय ? असा सवाल केला. पाॅवर हाऊस मधे पाणी गेल्याने धोक्याचा इशारा म्हणून जनरेटर देखील सुरू करण्यास अधिकाऱ्यांनी मज्जाव केला. विधानभवनाचे हे हाल तर महाराष्ट्राचे काय हाल असतील असा सवाल विरोधी आमदार सत्ताधारी आमदारांना विधानभवनात्या आवारात विचारत होते. मुख्यमंत्र्यांचे कार्यालय वगळता संपूर्ण मंत्री, विरोधी पक्षनेते यांची कार्यालये अंधारात आहेत, फॅन, लाईट बंद आहेत.

मुंबईला जो न्याय तोच नागपूर मनपाला द्या :शिवसेनेचा भाजपवर पलटवार 

राजधानी मुंबई दरवर्षी तुंबते यावरून शिवसेनेवर निशाणा साधणाऱ्या भाजपवर आज नागपूर तुंबल्याने शिवसेनेनं पलटवार केला. रविभवन व आमदार निवाससह विधानभवनात पाणी तुंबल्याने शिवसेनेनं हल्लाबोल केला. 
मुंबईचा नैसर्गिक भूभाग समुद्रसपाटीला असून नागपूरपेक्षा कित्येक पट पाऊस जास्त पडतो. मात्र मुंबई महानगरपालिका तातडीने उपाययोजना करून परिस्थिती नियंत्रणात आणते असा दावा आमदार सुनिल प्रभू यांनी केला.

मुंबई तुंबल्यानंतर महानगरपालिकेवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात. आता नागपूरात पावसामुळे इतिहासात पहिल्यांदाच अधिवेशन बंद करावे लागले याला नागपूर महापालिका जबाबदार नाही काय ? जो न्याय राजधानी मुंबई मनपा ला दिला जातो तो न्याय उपराजधानी नागपूर देणार काय असा सवाल शिवसेना नेते व आमदार उपस्थित करत आहेत.

इतर अॅग्रो विशेष
मोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...
कृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
बचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
शेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...
देशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...
देशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...
मराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...
सुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...
पाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...
राज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...
उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...
अकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...
विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...