सहकारातून गृहनिर्माण विभाग स्वतंत्र करणार : पणनमंत्री

सुभाष देशमुख
सुभाष देशमुख

पुणे : सहकाराचा मूळ गाभा असणाऱ्या संस्थांच्या बळकटीकरणासाठी सहकारातून गृहनिर्माण वेगळे करून, त्याचा स्वतंत्र विभाग करणार आहे. यासाठी समिती स्थापन केली असून, समितीचा अहवाल एक महिन्यामध्ये येईल. त्यानंतर निर्णय घेतला जाईल, अशी महिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी (ता.७) दिली.

मंत्री देशमुख म्हणाले, की साखर, पणन सारखी गृहनिर्माण साेसायट्यांसाठी स्वतंत्र यंत्रणा असावी यासाठी सहनिबंधक महमंद असिफ यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीसाठी ठाणे, पुणे, मुंबई शहरांमधील गृहनिर्माण संस्थांबाबत अभ्यास असणाऱ्या लाेकप्रतिनिधींचे देखील अभिप्राय मागविण्यात आले आहे. त्यांचे अभिप्राय आणि समिती सदस्यांचे म्हणणे यावरील अहवाल प्राप्त झाल्यावर निर्णय घेऊन, स्वतंत्र विभाग स्थापन केला जाईल. यासाठी काही कायदेदेखील बदलावे लागतील.

नागरीकरणामुळे वाढणाऱ्या गृहनिर्माण संस्थांचे वाद विवाद साेडविण्यातच सहकार क्षेत्राची ९० टक्के शक्ती खर्च हाेत आहे. परिणामी सहकाराचा मूळ गाभा असणाऱ्या कृषी क्षेत्राशी निगडित ग्रामीण वित्तीय संस्थांच्या कामकाजाकडे दुर्लक्ष हाेत असल्याने चळवळच धाेक्यात आली आहे. सहकाराच्या सक्षमीकरणासाठी गृहनिर्माण संस्थांसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करून त्यांना या संस्थांचे काम द्यावे, अशी मागणी सहकार क्षेत्रातून हाेत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com