तुमच्या आग्रहापुढे मी नाही कसे म्हणू ? : शरद पवार

तुमच्या आग्रहापुढे मी नाही कसे म्हणू ? : शरद पवार
तुमच्या आग्रहापुढे मी नाही कसे म्हणू ? : शरद पवार

टेंभूर्णी, जि. सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील तुम्ही सर्वांनी आग्रह केल्याने मी नाही कसे म्हणू, असे म्हणून माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास सहमती दर्शवत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर गुरुवारी (ता.२१) माढ्यातील पिंपळनेरच्या सभेत शिक्कामोर्तब केले. त्यांच्या या उत्तराने मात्र गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेवर कार्यकर्त्यांना नेमके उत्तर मिळाले. 

माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक पिंपळनेर (ता. माढा) येथील स्नेहल मंगल कार्यालयात गुरुवारी आयोजित करण्यात आली. खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार बबनराव शिंदे, आमदार दिलीप सोपल, माजी आमदार राजन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, रश्‍मी बागल, जिल्हा कार्याध्यक्ष बळीराम साठे, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा मंदा काळे, माजी आमदार विनायकराव पाटील आदी उपस्थित होते. 

पवार यांनी या बैठकीत मोदी सरकारवर हल्लाबोल केला, ते म्हणाले, ‘‘मोदी सरकारने नोटाबंदीमुळे दहशतवाद, भ्रष्टाचार संपेल असे म्हटले होते. पण तो वाढला आहे. देशाची अर्थव्यवस्था संकटात आहे. जीएसटीमुळे जे व्यापारी मोदी मोदी म्हणत होते, ते आज शिव्या घालत आहेत. सरकारने सरसकट कर्जमाफीचा शब्द पाळला नाही. बेरोजगारी संपविण्याचे आश्‍वासन दिले, पण निती आयोगाने साडेचार वर्षांत बेरोजगारी वाढल्याचे जाहीर केले. सरकारच्या धोरणामुळे रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरने राजीनामा दिला आहे. या सरकारच्या काळात शेतकरी, व्यापारी, रिझर्व्ह बॅंक, न्यायालयही सुटले नाही.‘‘ 

‘न खाउंगा, न खाने दूँगा’ म्हणणाऱ्यांनी ‘राफेल’मध्ये ५६० कोटींचे विमान सोळाशे कोटींना खरेदी केले. हे झाले कसे? याची चौकशी करायला सरकार तयार नाही. विमान बनविण्याचा कसलाही अनुभव नसलेल्या अंबानींच्या कंपनीला हे काम दिले, असा सवालही त्यांनी केला.

या वेळी खासदार मोहिते-पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची त्यांना विनंती केली. सोपल यांनीही त्यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला. शिंदे यांनी सरकारची आजची स्थिती मांडली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com