दुबार पेरणीसाठी पैसा कुठून आणायचा

दुबार पेरणीसाठी पैसा कुठून आणायचा
दुबार पेरणीसाठी पैसा कुठून आणायचा

सांगली ः रोहिणी, मृग नक्षत्रावर खरीप हंगामातील पिकांची पेरणी केलीय. वाफसावर उगवण झाली. पण, आता पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. अगोदरच पेरणीसाठी खर्च झाला आहे. त्यात खरीप हंगामासाठी पीककर्ज मिळत नाही. तर दुबार पेरणीसाठी पैसा कुठून आणायचा, असा प्रश्‍न तालुक्‍यातील शेतकऱ्यांना पडला आहे.

जत तालुक्‍यात जून महिन्यात १०६ मिलिमीटर म्हणजे ८१ टक्के इतक्‍या पावसाची नोंद झाली आहे. परंतु, तीस दिवसांत केवळ सात ते दहा दिवसच पाऊस झाला आहे. या पावसावर तालुक्‍यात ११ हजार ८४२ हेक्‍टरवर खरीप हंगामातील पेरणी झाली आहे. वाफसावर पिकांची उगवण झाली आहे. त्यानंतर पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. शेतकरी पावसाची वाट पाहू लागला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

शासनाने खरीप हंगामासाठी पीककर्ज उपलब्ध केले आहे. पेरणीसाठी कर्ज घेऊन पिकांची पेरणी केली आहे. मात्र, पाऊस नसल्याने पिकांची उगवणच झाली नसल्याने दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. एकदा कर्ज मिळाले. मग दुबार पेरणीसाठी पैसा कुठून आणायचा असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करीत आहेत.

‘नोकरी सोडून शेती करायला आलोय. शेतात ऊस, मका पिकं आहेत. विहिरीतील पाणी संपले आहे. पण पाऊस नाही. पिकं वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. पाऊस पडला नाही तर दुबार पेरणी करायची वेळ येणार आहे.’ - रावसाहेब कोरे,  युवा शेतकरी, रावळगुंडवाडी, ता. जत

‘अठरा एकर शेती आहे. पेरणीसाठी मशागत करून ठेवली आहे. पाऊस नसल्याने पेरणी केलेली नाही. पाऊस झाला तरच पेरणी करणार आहे.’ - दत्तात्रय गाडकवाड, सोरडी, ता. जत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com