agriculture news in Marathi, How much sugarcane is fixed in state, Maharashtra | Agrowon

राज्यात निश्चित ऊस किती ?
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

पुणे : राज्यात यंदा निश्चित किती ऊस आहे, याचा अंदाज शासनाला अजूनही आलेला नाही. राज्याचे कृषी खाते, साखर कारखाने, साखर आयुक्तालय अशा विविध यंत्रणांनी दिलेले ऊस उत्पादनाचे आधीचे अंदाज सपशेल चुकीचे निघाले आहेत. त्यामुळे सर्व साखर कारखान्यांची आढावा बैठक होण्याची शक्यता आहे.

पुणे : राज्यात यंदा निश्चित किती ऊस आहे, याचा अंदाज शासनाला अजूनही आलेला नाही. राज्याचे कृषी खाते, साखर कारखाने, साखर आयुक्तालय अशा विविध यंत्रणांनी दिलेले ऊस उत्पादनाचे आधीचे अंदाज सपशेल चुकीचे निघाले आहेत. त्यामुळे सर्व साखर कारखान्यांची आढावा बैठक होण्याची शक्यता आहे.

राज्यात यंदा भरपूर ऊस आहे हे नक्की. मात्र, किती ऊस आहे, याविषयी कोणाकडेही निश्चित माहिती नाही. साखर कारखान्यांकडून ऊस लागवडीबाबत व त्यानंतर उपलब्धतेबाबत गांभीर्याने माहिती गोळा केली जात नाही. कारखान्यांच्या म्हणण्यानुसार, ‘‘केवळ गाळपालाच नव्हे तर इतर कारणांसाठीदेखील ऊस वापरला जात असल्यामुळे माहिती गोळा करण्यात अडचणी येतात. दुसऱ्या बाजूला राज्याच्या कृषी खात्यात कोणत्याही पिकाची सर्व माहिती बेभरवशाची असते,’’ असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

कृषी विभागाच्या आकडेवारीनुसारच राज्यातील उसाची उपलब्धता निश्चित केली जाते. या आकडेवारीवर विसंबून राहून साखर आयुक्तालयाने यंदा राज्यात ६५० लाख टन ऊस उपलब्ध राहण्याची शक्यता असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर पावसामुळे स्थिती बदलली. त्यामुळे ७५० लाख टनांच्या वर ऊस असल्याचे सांगितले जाऊ लागले. 

‘‘साखर कारखान्यांमधीळ गाळपाची स्थिती बघता सध्या ७११ लाख टन ऊस गाळून झाला आहे. अजून फेब्रुवारीदेखील संपलेला नाही. त्यामुळे ८०० लाख टनांच्या पुढे ऊस उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही साखर कारखाने यंदा अगदी मेपर्यंत गाळप चालण्याची शक्यता वर्तवित असल्यामुळे राज्यात उसाची उपलब्धता कदाचित ९०० लाख टनांच्या पुढेदेखील असू शकते,’’ असेही एका साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकाने स्पष्ट केले. 

ऊस उपलब्धतेची निश्चित आकडेवारी शासनाकडे नसल्यामुळे नियोजनात अडथळे येतात. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे उसाची उत्पादकता वाढण्याची शक्यता असल्याचे आम्ही यापूर्वीच सांगितले होते. गेल्या हंगामात उसाची उत्पादकता प्रतिहेक्टरी ६५ टन होती. यंदा ती ८० टन राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

उसाची उत्पादकता ८० नव्हे, तर १०० टन 
उसाचे क्षेत्र अंदाजाप्रमाणे योग्य असून, हेक्टरी उत्पादकता मात्र ८० टन नव्हे तर ९८ ते १०० टन इतकी असण्याचा कयास आहे. यामुळे उपलब्धतेविषयी सध्या संभ्रमाची स्थिती आहे. पुढील उपलब्ध उसाबाबत सर्व साखर कारखान्यांकडून प्रत्यक्ष माहिती घेणे हाच पर्याय आता शासनाकडे आहे. त्यामुळे कारखान्यांची आढावा बैठक घेतली जाण्याची चिन्हे आहेत, असे सहकारी साखर कारखान्यांच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

इतर अॅग्रो विशेष
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...
रसदार उन्हाळी काकडी अर्थकारणाला देतेय...जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल, जळगाव आदी...
बॅंक अधिकारी झाला पूर्णवेळ प्रयोगशील...विशाखापट्टण व त्यानंतर हैद्रराबाद येथे खासगी...
स्मार्ट प्रकल्पाचा केंद्रबिंदू शेतमाल ‘...पुणे : राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना आता पिकवायचे...
पूर्व विदर्भात गारपीटपुणे  ः दोन दिवसांपूर्वी मध्य भारतात तयार...
जनावराच्या आहारात पाणी महत्त्वाचेजनावरांचे योग्य पोषण होण्यासाठी तसेच दुग्धोत्पादन...
राज्यात १७८ तालुक्यांत भूजल चिंताजनकपुणे ः कमी झालेला पाऊस, वाढत असलेला पाण्याचा उपसा...
दरामुळे साखरेचा रंग फिकाकोल्हापूर : साखरेचे विक्री मूल्य वाढविल्यानंतरही...
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...