agriculture news in marathi, HT BT cotton seed distributed in Vidharbha? | Agrowon

विदर्भात पोचली ‘एचटी’ची पाकिटे?
विनोद इंगोले
मंगळवार, 20 मार्च 2018

विक्रेत्यांच्या संघटनांकडून करण्यात आला धक्‍कादायक दावा

नागपूर : गेल्या हंगामात पुरवठा झालेल्या अनधिकृत ‘एचटी’ कापूस बियाण्यांची पाळेमुळे शोधण्यासाठी ‘एसआयटी’ची स्थापना करण्यात आली असतानाच या वर्षीच्या हंगामासाठीची एचटी कापूस बियाण्यांची खेप विदर्भात पोचल्याचे वृत्त आहे. खुद्द विक्रेत्यांच्या काही संघटनांकडूनच हा दावा करण्यात आला असला तरी कृषी विभागाचा गुणवत्ता नियंत्रण विभाग मात्र या दाव्यात तथ्य नसल्याचे सांगत आहे. 

गेल्या वर्षीच्या हंगामात राज्यात सुमारे ३५ लाख एचटी कापूस बियाण्यांची पाकिटे विकली गेली होती. यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यांत सर्वाधिक पाकिटे पोचली होती. कपाशीतील तणनियंत्रणावरील मजुरांचा खर्च वाचत असल्याने शेतकऱ्यांची एचटी कापूस सिडला पसंती असल्याचा दावा केला जातो; परंतु तरीही या कपाशीमधील तणनियंत्रणाकरिता तणनाशकाची फवारणी करावीच लागत असल्याने तोदेखील उत्पादकता खर्चच ठरतो. परिणामी ‘एचटी’देखील फायदेशीर नसल्याचा दुसरा मतप्रवाह आहे. 

असे दोन मतप्रवाह असतानाच गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीदेखील विदर्भात हंगामाच्या सुरवातीला दीड लाखावर एचटी कापूस बियाण्यांची पाकिटे पोचल्याचा दावा केला जात आहे. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात हे अनधिकृत बियाणे पोचल्याचे विक्रेत्यांच्या काही संघटनांकडून सांगितले जात अाहे. सदर प्रकार काही अंशी खरा असण्याची शक्‍यता असल्याचे जाणकार सांगतात. काही बियाणे कंपन्यांचे ‘फिल्ड असिस्टंट’ या कामात गुंतल्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. बीजोत्पादन व त्यानंतर या बियाण्यांच्या विक्री साखळीत या असिस्टंटचा मोठा वाटा राहतो, असेही सांगण्यात आले. 

जोखीम कशाकरिता?
कृषी विभागाच्या गुणनियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी मात्र हा प्रकार एक टक्‍काही खरा नसल्याचे सांगितले. विदर्भात साधारणतः १५ मे नंतर हंगाम सुरू होतो. त्यामुळे अनधिकृत बियाणे हंगामाच्या दोन महिने आधीच आपल्याकडे ठेवण्याची जोखीम कोणी का आणि कशाकरिता घेईल, असा प्रश्‍न संबंधित अधिकाऱ्याने उपस्थित केला.

विदर्भाच्या सीमेलगत असलेल्या काही राज्यांतून एचटी सिडचा पुरवठा होण्याची शक्‍यता पाहता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांमार्फत सीमेलगतच्या पोलिसांना पत्र देत अधिकृत किंवा अनधिकृत बियाणे येत असल्यास कळविण्याच्या सूचना केल्या होत्या. पोलिस अधीक्षकांची भेट त्याकरिता घेण्यात आली; त्यांनीही सहकार्य करणार असल्याचे कळविले होते. या वर्षी हंगामच सुरू झाला नाही आणि अद्याप अनधिकृत बियाणे पोचल्याची एकही तक्रार किंवा माहिती खबऱ्यांमार्फत मिळाली नाही.
- श्री सावजी, विभागीय गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, नागपूर

हंगाम साधारणतः १५ मे नंतर सुरू होतो. तोवर अशाप्रकारचे अनधिकृत बियाणे हाताळण्याची जोखमी कोण पत्करणार? त्यामुळे हंगामापूर्वीच एचटी सिड पोचले, असा दावा खरा वाटत नाही. तरीसुद्धा आम्ही यासंदर्भात आमच्या पद्धतीने खातरजमा करून योग्य ती कारवाई करू. बाजारात अनधिकृत कोणतेही बियाणे पोचणार नाही, यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे.
- डॉ. पंकज चेडे, विभागीय गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, अमरावती

इतर अॅग्रो विशेष
सूर्य तळपताना छत करा दुरुस्तआठवड्यापूर्वी आलेल्या चांगल्या पावसाच्या अंदाजाने...
आयोगाचा कारभार प्रश्‍नचिन्हांकितप्रत्येक निवडणुकीची रीत न्यारी असते,...
पाणी व्यवस्थापनातून वाढविली कापसाची...आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा (ता....
पाणी व्यवस्थापनातून नळावणे गावाची...अनेक वर्षांच्या पाणीटंचाईतून मुक्त होण्यासाठी...
डेरे यांनी उभारली अत्याधुनिक सिंचन...सातारा जिल्ह्यातील कवठे येथील अतुल डेरे यांनी...
‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’कडे आयटी...‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ हेच येत्या काळातील...
पाणी व्यवस्थापनातून ग्रामविकासपाण्यासाठी कायम संघर्ष करीत असलेल्या कान्होळ (जि...
अवघी कारभारवाडी झाली ठिबकमयकोल्हापूर जिल्ह्यातील कारभारवाडी (ता. करवीर) येथे...
सर्वाधिक ६५० शेततळ्यांचं अजनाळेसोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका दरवर्षीच...
अल्पभूधारकांच्या आयुष्यात जलश्रीमंती बुलडाणा जिल्ह्यात जानेफळ परिसरात शासनाच्या...
सत्तावीस गटांच्या बळातून घडली किमयासंगमनेर (जि. नगर) तालुक्यातील सावरगाव तळ...
वाघाड पाणीवापर संस्थांनी शेतीतून उभारले...नाशिक जिल्ह्यात वाघाड प्रकल्पस्तरीय पाणीवापर...
कम पानी, मोअर पानी देणारे डाॅ. वने...नगर जिल्ह्यातील मानोरी येथील कृषिभूषण डॉ....
आसूद : पाणी वितरणाचे अनोखे मॉडेलरत्नागिरी जिल्ह्यात दापोली-हर्णे रस्त्यावर दोन...
विकासाची गंगा आली रे अंगणी...खानदेशात जळगाव, जामनेर व भुसावळ या तालुक्‍यांच्या...
मराठवाड्यात सिंचनातले सर्वोच्च...परभणी जिल्ह्यात वरपूड येथील चंद्रकांत अंबादासराव...
होय, कमी पाण्यात विक्रमी ऊस !सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी येथील प्रयोगशील ऊस...
राज्यात नीचांकी हरभरा खरेदीमुंबई : राज्यातील हरभरा उत्पादक...
सीमेवरील तणावाचा केळी निर्यातीला फटकारावेर, जि. जळगाव : जम्मू-काश्मीर नियंत्रण रेषेजवळ...
ॲग्रोवनच्या ‘मराठवाड्यातलं इस्त्राईल :...जालना : कष्ट उपसणारी पहिली पिढी, पीक बदलातून...