agriculture news in marathi, Human resources in the field of agriculture Turning to the service area says CM | Agrowon

'कृषी क्षेत्रातील मनुष्यबळाला सेवा क्षेत्राकडे वळविणार'
टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 फेब्रुवारी 2018

मुंबई : कृषी क्षेत्रातील मनुष्यबळाला विशेष कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना सेवा क्षेत्रातील संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ''मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स २०१८'' या जागतिक गुंतवणूक परिषदेत आयोजित "जर्नी टू ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी" या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते.

मुंबई : कृषी क्षेत्रातील मनुष्यबळाला विशेष कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना सेवा क्षेत्रातील संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ''मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स २०१८'' या जागतिक गुंतवणूक परिषदेत आयोजित "जर्नी टू ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी" या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते.

या परिसंवादामध्ये निती आयोगाचे अध्यक्ष अमिताभ कांत यांसह विविध उद्योजकांनी सहभाग घेतला. देशाची वाटचाल पाच ट्रिलियन डॉलर क्लबकडे होत असताना, राज्याने २०२५ पर्यंत एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे पोचण्याची महत्त्वाकांक्षा राज्याने बाळगली आहे. हे लक्ष्य साध्य करण्यासाठीचा रोडमॅप तयार केला असून, मुख्यमंत्र्यांनी याबाबतचे सादरीकरण केले.

मुख्यमंत्री म्हणाले, की देशांतर्गत होणाऱ्या सकल घरेलू उत्पादनात कृषी क्षेत्राचा वाटा हा केवळ ११ टक्के इतका आहे, मात्र या क्षेत्रात वापरले जाणारे मनुष्यबळ हे सुमारे ५० टक्के आहे. तर उत्पादन क्षेत्रातील उत्पन्न ३० टक्के आणि वापरले जाणारे मनुष्यबळ हे २० टक्के आहे. तर सेवा क्षेत्रातील उत्पन्नाचा दर हा ५९ टक्के आहे; मात्र यात वापरले जाणारे मनुष्यबळ हे केवळ ३० टक्के एवढे आहे. कृषी क्षेत्रातील औद्योगिक वाढ ही ५ टक्के आहे, उत्पादन क्षेत्रातील व सेवा क्षेत्रातील वाढ ही १५ टक्के आहे.

२०२५ पर्यंत सेवा क्षेत्रातील वाढ ही ६७ टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. सेवा क्षेत्रात होणाऱ्या वृद्धीचा वाढता दर लक्षात घेता या क्षेत्राला आवश्यक असणारे कौशल्य कृषी क्षेत्रातील मनुष्यबळाला उपलब्ध करून दिल्यास राज्याला ५ मिलियन कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.

राज्यात १२ लाख कोटींची गुंतवणूक
मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स २०१८ या गुंतवणुकदारांच्या परिषदेत सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विविध ४३ सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारामुळे महाराष्ट्रात १२ लाख कोटींची गुंतवणूक होणार आहे. तसेच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. या सामंजस्य करारात देश-विदेशांतील नामांकित उद्योग समूहांचा समावेश आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमेरिकेचे भारतातील राजदूत केनेथ जस्ट व रशियाचे भारतातील राजदूत निकोलाय झिलस्तोव्ह यांच्या विविध क्षेत्रांतील गुंतवणूक, कौशल्य विकास व रोजगार निर्मितीबाबत चर्चा केली.

इतर बातम्या
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
नाशिक जिल्हा बँकेने रेणुकादेवी संस्थेचा...नाशिक : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासमोर...
शेतकऱ्यांचा 'वसाका' प्रशासनाला घेरावनाशिक  : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी...
मीटर रीडिंगची पूर्वसूचना संदेशाद्वारे...सोलापूर  : ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर...
दिव्यांग मतदारांना सुविधा द्या :डॉ....सोलापूर : दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी...
`आंब्याचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न...वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग :  कोकणातील आंबा...
कोल्हापुरात २३०० हेक्टरवर उन्हाळी पेरणीकोल्हापूर  : जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची...
नंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीरनंदुरबार  : जिल्ह्यातील पाणीटंचाई वाढत आहे....
स्मार्ट प्रकल्पाचा केंद्रबिंदू शेतमाल ‘...पुणे : राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना आता पिकवायचे...
पुणे विभागात ४१५ टॅंकरने पाणीपुरवठापुणे : विभागात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र...
रणजितसिंहाच्या भाजप प्रवेशाने खरच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः पश्चिम...
काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी बारा...मुंबई ः आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील...
पूर्व विदर्भात गारपीटपुणे  ः दोन दिवसांपूर्वी मध्य भारतात तयार...
राज्यात १७८ तालुक्यांत भूजल चिंताजनकपुणे ः कमी झालेला पाऊस, वाढत असलेला पाण्याचा उपसा...
आचारसंहिता भंगाच्या ७१७ तक्रारीमुंबई : नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी...
दरामुळे साखरेचा रंग फिकाकोल्हापूर : साखरेचे विक्री मूल्य वाढविल्यानंतरही...