agriculture news in marathi, human resources issue of tembhu scheme, sangli, maharashtra | Agrowon

टेंभू योजना पन्नास अधिकारी कशी सांभाळणार?
टीम अॅग्रोवन
शनिवार, 3 मार्च 2018
सांगली  ः महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने सांगली पाटबंधारे मंडळातील टेंभू उपसा सिंचन प्रकल्प विभागाच्या कार्यालयाची नवीन रचना आखली आहे. या प्रकल्पामध्ये प्रकल्प विभाग १ च्या अंतर्गत पाच उपविभाग आहेत. हे कार्यालय ५० अधिकाऱ्यांनी चालविण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. मात्र, टेंभू उपसा सिंचन अद्यापही पूर्ण झालेली नाही, अशात ५० अधिकारी ही योजना कशी सांभाळणार असा प्रश्‍न उपस्थित राहू लागला आहे. याचा परिणाम थेट योजना पूर्ण करण्यासह अन्य कामांवर होण्याची दाट शक्‍यता आहे. 
 
सांगली  ः महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने सांगली पाटबंधारे मंडळातील टेंभू उपसा सिंचन प्रकल्प विभागाच्या कार्यालयाची नवीन रचना आखली आहे. या प्रकल्पामध्ये प्रकल्प विभाग १ च्या अंतर्गत पाच उपविभाग आहेत. हे कार्यालय ५० अधिकाऱ्यांनी चालविण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. मात्र, टेंभू उपसा सिंचन अद्यापही पूर्ण झालेली नाही, अशात ५० अधिकारी ही योजना कशी सांभाळणार असा प्रश्‍न उपस्थित राहू लागला आहे. याचा परिणाम थेट योजना पूर्ण करण्यासह अन्य कामांवर होण्याची दाट शक्‍यता आहे. 
 
टेंभू उपसा सिंचन योजना सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील दुष्काळी भागाला वरदान ठरत आहे. या तिन्ही जिल्ह्यांतील २१० गावांतील ८० हजार ४७२ हेक्‍टर क्षेत्र या योजनेतून ओलिताखाली येणार आहे. आजमितीस अंदाजे २३ हजार हेक्‍टर क्षेत्र  ओलिताखाली आले आहे.
 
या योजनेच्या चौथ्या व पाचव्या टप्प्यावर अद्यापही विद्युत कामे झाली नाहीत. त्यातच पंपगृहाचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे  योजना अजून पूर्ण झाली नसल्याने दुष्काळी स्थितीमध्ये या योजनेच्या पाण्याचा लाभ केवळ ५० टक्केच शेतकऱ्यांना होतो. सध्या पाटबंधारे विभागाकडे रिक्त पदेही मोठ्या प्रमाणात आहेत. यामुळे ही योजना चालविण्यासाठी अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते आहे. 
 
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने जानेवारीत या योजनेची नवीन रचना आखली आहे. त्यामध्ये केवळ ५० कर्मचाऱ्यांनी ही योजना चालवावी, असा आदेश काढला आहे. वास्तविक पाहता टेंभू उपसा सिंचन योजना अद्यापही पूर्णत्वाकडे नाही.
 
या योजनेला अजून सुमारे १८०० कोटींची गरज आहे. असे असताना योजना ५० कर्मचाऱ्यांवर कशी चालणार, असा प्रश्‍न आता पाटबंधारे विभागातील अधिकारी उपस्थित करू लागले आहेत. जर अशा पद्धतीने शासनाने योजनावरील अधिकारी संख्या कमी करू लागले, तर ही योजना पूर्ण होण्यासाठी अधिक वेळ लागणार याबाबत काहीच शंका नाही.

इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...
हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर झाले...नागपूर ः शासनाची हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर...
नगरला गव्हाला १६४१ ते १८५० रुपये...नगर : नगर बाजार समितीत गव्हाची आवक बऱ्यापैकी होत...
नाशिकला आंबा, खरबूज, कलिंगड तेजीतनाशिक : वाढत्या उन्हाबरोबरच नाशिक बाजार समितीत...
कासवाच्या लिंगनिर्धारणामागील जनुकीय...गेल्या ५० वर्षांपासून अंडी उबण्याच्या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा  : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा वाढू...
अग्रणी नदी पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यातसांगली : तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्‍यांतील अग्रणी...
पुण्यातील डाळिंब, पेरू, चिकू बागांना...पुणे  : जिल्ह्यातील मृग बहारातील डाळिंब,...
इंदापुरातील नीराकाठची पिके जळण्याच्या...वालचंदनगर, जि. पुणे  ः इंदापूर तालुक्‍यातील...
नगर जिल्ह्यात ‘कृषी’च्या कामांवरच ‘...नगर  ः जलयुक्त शिवार अभियानाची कामे...
विषबाधा बळीप्रकरणी पावणेदोन कोटींची मदतअकोला : कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा होऊन मृत...
हिंगोलीतील १०३ गावांची ‘जलयुक्त शिवार’...हिंगोली : जलयुक्त शिवार अभियानाच्या चौथ्या...
विधान परिषदेच्या ६ जागांसाठी उत्साहात...मुंबई ः स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान...
सैन्य दलात अधिकारी होण्याची संधीमुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात...
कर्नाटक: कामगारांच्या पत्राशेडमध्ये...विजयपूर : नुकतेच कर्नाटकात विधानसभेची निवडणुका...