agriculture news in Marathi, Humani affected sugarcane area on four lac heacter, Maharashtra | Agrowon

हुमणीग्रस्त ऊसक्षेत्र चार लाख हेक्टरवर
टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

हुमणीचा जून ते ऑक्टोबरपर्यंत मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असतो. नोव्हेंबर ते मे या कालावधीत हुमणी कोशाच्या अवस्थेत जात असल्यामुळे त्याचा प्रादुर्भाव होत नाही. मात्र, चालू वर्षी कमी झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून आला. परंतु हुमणीचा प्रादुर्भाव सार्वत्रिक नसून, परिसरानुसार आहे. नगर, पुणे, सोलापूर, धुळे, नंदुरबार आणि नागपूर भागांत ३० ते ७० टक्क्यांपर्यंत प्रादुर्भाव दिसून आला आहे. 
- डॉ. दादासाहेब पोखरकर, विभागप्रमुख, कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

पुणे ः राज्यात दुष्काळामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसमोर यंदा पावसाने दिलेली दडी व प्रतिकूल हवामानामुळे हुमणीने मोठे आव्हान निर्माण केले. राज्यातील सर्वच ऊस उत्पादक पट्ट्यांमध्ये हुमणीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. पुणे विभागात तब्बल ४० टक्क्यांपर्यंत तर उर्वरित राज्यात ५ ते २० टक्के हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. पुणे विभागात जवळपास अडीच लाख हेक्टरवर तर उर्वरित भागांमध्ये दीड लाख हेक्टरवर हुमणीचा प्रादुर्भाव झाला आहे. राज्यातील जवळपास चार लाख हेक्टरवर हुमणीचा विळखा असल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

कृषी विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात यंदा जवळपास १४ लाख हेक्टरवर ऊस पीक आहे. पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, नगर, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये साधारणतः सहा लाख हेक्टरवर ऊस आहे. त्यापैकी ४० टक्के क्षेत्रात, म्हणजेच अडीच लाख हेक्टरवरील उसावर हुमणीचा प्रादुर्भाव झाला आहे. तर उर्वरित राज्यतील आठ लाख हेक्टरपैकी सुमारे दीड लाख हेक्टरवर हुमणीचा प्रादुर्भाव झाला आहे. अगदी आठ ते दहा फूट उंचीच्या ऊस हुमनीमुळे वाळत आहे. आडसाली ऊस लागणीसही प्रादुर्भाव झाल्याने वाढीवरही परिणाम झाला आहे.

कोल्हापूर कृषी महाविद्यालयाचे कीटकशास्त्र विभागप्रमुख डॉ. पांडुरंग मोहिते यांनी सांगितले की कोल्हापूर आणि सांगली आणि सातारा जिल्ह्यांमध्ये बहुतांशी ठिकाणी हुमणी प्रादुर्भाव झालेला आहे. हुमणी काही ठिकाणी प्रथमच पण काही ठिकाणी दरवर्षी आढळून येते. या भागात दोन प्रकारच्या हुमणी आढळतात. त्यात नदीकाठावर (लिकोफोलिस) आणि माळावर (होलोट्राकिया) असे संबोधले जाते. आता जी हुमणी आढळते ती माळरानाची हुमणी (होलाट्राकीया) असे नामकरण आम्ही केले आहे. आम्ही नवीन हुमणीची जात शोधून काढली आहे.

त्यामध्ये भुंगे होलोट्राकिया पेक्षा लहान आहेत आणि नर भुंग्याला गेंड्यासारखे शिंग आहे. सर्वेक्षणामध्ये होलोट्राकीया ७० टक्के आणि नवीन हुमणी (फायलोग्यथस डायोनासिस) ३० टक्के असे हुमणीचे प्रमाण वारणा कारखान्याच्या परिसरात आढळून आले आहे. या हुमणीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील भात, भुईमूग आणि उभा उसाचे पिकामध्ये नुकसान झाले आहे. 

सोलापूर जिल्ह्यात ४० हजार एकरवर प्रादुर्भाव
सोलापूर जिल्ह्यात एकूण १ लाख ६० हजार एकर इतके ऊस लागवडीचे क्षेत्र आहे. जिल्ह्यात जवळपास ४० हजार एकर क्षेत्राला हुमणीचा फटका बसला आहे. पंढरपूर, माढा, माळशिरस, मोहोळ, करमाळा या ऊस पट्ट्यातच त्याचा अधिक प्रादुर्भाव झाला आहे. सध्या दुष्काळाची परिस्थिती आहे. त्यामुळे पाण्याची अडचण झाली असाताना, त्यात आता हुमणीमुळे शेतकऱ्यांना हैरान केले आहे. मुळासकट ऊस हुमणीमुळे पोखरला जात असल्याने उत्पादनात मोठी घट येणार आहे. एकीकडे ऊस दराबाबत अजूनही काहीच ठरत नसताना, त्या आधीच आता हुमणीमुळे नवेच संकट उभे ठाकले आहे.

मराठवाड्यतही प्रादुर्भाव
दुष्काळाने होरपळत असलेल्या मराठवाड्यात औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांत हुमनीच्या प्रादुर्भावानेही जवळपास १७ हजार ४३७ हेक्‍टरवरील ऊस उलथवून टाकण्याचे काम केले आहे. बीड जिल्ह्यात हुमनीच्या प्रादूर्भावाची तीव्रता अधिक असल्याचे समोर आले आहे. परभणी जिल्ह्यातही १० टक्‍क्यांपर्यंत हुमणीचा प्रादुर्भाव झाला आहे.

नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्टरला फटका
नगर जिल्ह्यामध्ये सुमारे ३५ हजार ३०७ हेक्‍टर क्षेत्राला बाधा झाली असल्याचा प्रशासकीय अहवाल आहे. मात्र प्रत्यक्षात पन्नास हजार हेक्‍टर क्षेत्राला हुमणीने घेरले असल्याचे बोलले जात आहे. राज्यातील सर्वाधिक साखर कारखाने आणि उसाचा जिल्हा म्हणून नगर जिल्ह्याची ओळख आहे. मात्र यंदा हा जिल्हा उसावरील हुमणीच्या गंभीर हल्ल्याने हतबल झाला आहे. प्रतिकूल हवामान, सतत ढगाळ वातावरण, पाण्याचा अति वापर अशा कारणांमुळे हुमणीचा प्रादुर्भाव झाला असल्याचे सांगितले जात आहे. हुमणीने उसाची पांढरी मुळे खाण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे उसाचे सर्वाधिक क्षेत्र बाधित झाले आहे. 

साताऱ्यात अडीच हजार हेक्टरवर कीड
सातारा जिल्ह्यात विविध पिकांना हुमणीचा विळखा बळल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. ऊस पिकावर सर्वाधिक प्रादुर्भाव दिसून येत असून कृषी विभागाने केलेल्या पाहणीनुसार जिल्ह्यातील २४५५ हेक्टर क्षेत्राला प्रादुर्भाव झाला असल्याचे दिसून आले आहे. उसासह इतर पिकांस हुमणीचा प्रादुर्भाव झाला असल्याने क्षेत्रात वाढ होणार आहे. 

प्रतिक्रिया
पाथरी तालुक्यातील उसावर हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. कीटकशास्त्राज्ञांच्या पथकाने प्रादुर्भावग्रस्त उसाची पाहणी केली असून, नियंत्रणाच्या उपाययोजना शेतकऱ्यांना सांगिल्या जात आहेत.
- डाॅ. पी. आर. झंवर, कीटकशास्त्र, विभागप्रमुख, वनामकृवि, परभणी

इतर अॅग्रो विशेष
गोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...
पिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...
कापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...
दुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...
वादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...
पुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
राज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे  : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...
आयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...
नवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...
पर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...
ऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...
दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...
पडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...
चारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....
मोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...
पॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे   : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...
ढगाळ हवामानामुळे थंडी गायब; आजही...पुणे : अरबी समुद्रात असलेल्या तीव्र कमी दाब...
तमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला...मुंबई : मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या...
ब्लॉक प्रिंटिंग व्यवसायातून आर्थिक...पूर्व विदर्भातील भंडारा, वर्धा या जिल्ह्यांत...