सौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचित

सौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचित
सौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचित

जळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी ‘महावितरण''च्या जळगाव परिमंडलातील (खानदेश) ४ हजार ७९ शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केले. आणखी सुमारे चार ते साडेचार हजार शेतकरी या योजनेत सहभागासाठी इच्छुक आहेत. परंतु ऑनलाइन अर्जासंबंधीच्या अडचणी व अपुरा लक्ष्यांकामुळे अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहतील, अशी स्थिती आहे. 

जळगाव जिल्ह्यातील ५९६, धुळ्यातील २९६ , तर नंदुरबारातील २६७ असे एकूण १ हजार १५९ शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी अंदाजपत्रके देण्यात आली आहेत. शिवाय ‘महावितरण आपल्या दारी'' या उपक्रमांतर्गत वीजजोडणी घेतलेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. 

या उपक्रमांतर्गत ज्या शेतकऱ्यांना केबलद्वारे वीजपुवठा देण्यात आला. अशा शेतकऱ्यांची पायाभूत यंत्रणा उभारून कायमस्वरूपी वीजपुरवठा देण्याबाबत मागणी आली. त्यांनादेखील मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत ऑनलाइन अर्ज करून सहभागी करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय घेण्यासोबत सौरपंपाची आधारभूत किंमतही कमी करण्यात आल्याने एक प्रकारे शेतकऱ्यांवरील भार कमी झाला आहे. यात सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यास तीन अश्वशक्ती डीसी सौरपंपासाठी दहा टक्के म्हणजेच १६ हजार ५६९, तर पाच अश्वशक्ती डीसी सौरपंपासाठी २४ हजार ७१० रुपये लाभार्थी हिस्सा भरावा लागेल. शेतकऱ्यांकडे शाश्‍वत जलस्रोत उपलब्ध आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी कृषिपंपांसाठी वीजजोडणी घेतली नाही किंवा वीज जोडणीचे पैसे भरून त्यांची जोडणी प्रलंबित आहे, अशा शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत प्राधान्य देण्यात येत आहे.

निविदा प्रकियेत सौर कृषीपंपांची आधारभूत किंमत जवळपास ३६ टक्‍क्‍यांनी कमी झाली आहे. यामुळे तीन अश्‍वशक्ती डीसी पंपाची किंमत १ लाख ६५ हजार ५९४, तर पाच अश्‍वशक्ती डीसी पंपाची किंमत २ लाख ४७ हजार १०६ इतकी झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com