agriculture news in marathi, Ichalkaranji city agitate on Varana river water issue | Agrowon

पाणीप्रश्नी इचलकरंजी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 15 मे 2018

इचलकरंजी, जि. कोल्हापूर : इचलकरंजी शहराला वारणा नदीतून पाणी मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी सोमवारी (ता. १४) येथे पुकारलेल्या सर्व पक्षीय बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी सकाळपासून या बंदमध्ये सहभाग घेतला. या वेळी प्रांताधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.

इचलकरंजी, जि. कोल्हापूर : इचलकरंजी शहराला वारणा नदीतून पाणी मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी सोमवारी (ता. १४) येथे पुकारलेल्या सर्व पक्षीय बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी सकाळपासून या बंदमध्ये सहभाग घेतला. या वेळी प्रांताधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.

इचलकरंजी शहराला वारणा नदी पात्रातून पाणी आणण्यासाठी योजना मंजूर झाली आहे. या योजनेचे काम सुरू करताना दानोळी (ता. शिरोळ) येथे नागरिकांनी तीव्र विरोध केला. प्रशासनाने पोलिस फोर्स घेऊन काम सुरू करण्याचा प्रयत्न केला; पण त्या वेळी वारणा नदीकाठच्या लोकांनी गाव बंद ठेवून प्रतिकार केला. याबाबत इचलकरंजीकरांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. सर्व पक्षीय नेत्यांनी आंदोलनाचा कृती आराखडा केला असून याचा पहिला टप्पा म्हणून सर्वपक्षीय बंद पुकारला आहे.  सकाळपासून सर्व व्यवहार ठप्प होते. रिक्षा, एसटी सेवाही बंद होती. सकाळी १० वाजता भागा भागातून नागरिक शिवाजी पुतळ्याजवळ एकत्र आले. त्यानंतर मोर्चास सुरवात झाली. शिवाजी पुतळा,जनता चौक मार्गे प्रांत कार्यालयावर मोर्चा आला. या ठिकाणी प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना निवेदन देण्यात आले.

मोर्चाचे नेतृत्व आमदार सुरेश हाळवणकर, नगराध्यक्षा अलका स्वामी, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार अशोक जांभळे, मदन कारंडे, शशांक बावचकर, प्रकाश मोरे, विलास रानडे, सदा मलाबादे, विजय भोसले, महादेव गौड आदींनी केले. शासनाने याबाबत लवकर तोडगा न काढल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला.

इतर ताज्या घडामोडी
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...
सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर  ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...