agriculture news in marathi, If the people join together, the politics of the country will change | Agrowon

लोकांनी साथ दिल्यास देशाचे राजकारण बदलेल - शरद पवार
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 जून 2018

सोलापूर : ‘देशात सध्या मूठभर लोकांसाठीच काम सुरू आहे. बड्या उद्योजक, श्रीमंतांना झुकते माप दिले जात आहे. सामान्य माणूस, शेतकऱ्यांकडे ज्या अपेक्षेप्रमाणे लक्ष द्यायला हवे, ते दिले जात नाही. लोकांनी साथ दिल्यास देशात व राज्यात सुरू असलेले राजकारणाचे चित्र नक्कीच बदलेल,’ असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी मंगळवारी (ता. १२) कुर्डुवाडीत सांगितले.

सोलापूर : ‘देशात सध्या मूठभर लोकांसाठीच काम सुरू आहे. बड्या उद्योजक, श्रीमंतांना झुकते माप दिले जात आहे. सामान्य माणूस, शेतकऱ्यांकडे ज्या अपेक्षेप्रमाणे लक्ष द्यायला हवे, ते दिले जात नाही. लोकांनी साथ दिल्यास देशात व राज्यात सुरू असलेले राजकारणाचे चित्र नक्कीच बदलेल,’ असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी मंगळवारी (ता. १२) कुर्डुवाडीत सांगितले.

कुर्डुवाडीतील के. एन. भिसे महाविद्यालयामध्ये माढा तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार विनायकराव पाटील यांचा अमृतमहोत्सव सोहळा, संस्थापक अध्यक्ष (कै.) के. एन. भिसे यांच्या पुतळ्याचे अनावरण, महाविद्यालयाच्या ७५ वर्गखोल्यांचे उद्‌घाटन आणि श्री. पवार यांनी तालुक्‍याच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे ऋणनिर्देश यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख अध्यक्षस्थानी होते.

श्री. पवार म्हणाले, ‘‘केंद्र सरकारने जनतेला दिलेली आश्‍वासने पाळली नाहीत. शेतमालाला उत्पादनखर्च अधिक ५० टक्के इतका दर देण्याचे आश्‍वासन दिले; परंतु तेही पाळले नाही. शेतमालाला भाव मिळण्यासाठी कष्टाचे माप पदरात पाडण्यासाठी आपण सामूहिकपणे एकत्र राहणे गरजेचे आहे. वर्षभराने आपल्याला पुन्हा लोकांसमोर जावयाचे आहे. तेव्हा आपण जागरूक राहिलो, तर देशाचे व राज्याचे राजकारण बदलल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही व ते राजकारण सामान्यांच्या हिताची जपणूक करणारे असेल.''’ श्री. पाटील हे मृदृभाषी, कमी व योग्य ते बोलणारे आहेत. समाजकारणामध्ये व लोकप्रतिनिधीएवढी मोठ्या संधीनंतर त्यांनी जनमानसातील भूमिका आदर्शवत ठेवली आहे. के. एन. भिसे यांनी नगराध्यक्ष म्हणून, तसेच विविध संस्थेत व कुर्डुवाडीकरांसाठी चांगले काम केले, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

`गुरुजी'पासून लांब राहा'
या प्रसंगी बोलताना श्री. पवार म्हणाले, की चांगल्या विचारांचा पाठिंबा देऊन समाजाला मार्गदर्शन करणाऱ्या महाराजांची संख्या कमी होऊ लागली आहे. मध्यंतरी एक गुरुजी म्हणाले, ‘‘माझ्या शेतातील आंबे खाल्ल्याने मूल होते. ही गमतीशीर गोष्ट आहे, अशा लोकांपासून बाजूला राहायला पाहिजे.’’

इतर बातम्या
'शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच...नवी दिल्ली  : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि...
संत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल...नागपूर  ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित...
सूक्ष्म सिंचन विस्तारातील अडचणी, पर्याय...औरंगाबाद   : औरंगाबाद येथे आयोजित...
नंदुरबार, धुळ्यात पपई काढणी बंदनंदुरबार  : पपईच्या दरावरून शेतकरी, व्यापारी...
‘ई- टेंडरिंग’ रेशीम उत्पादकांच्या मुळावरपुणे  ः राज्यात पाणीटंचाईमुळे सर्वत्र...
आंदोलनामुळे शेतकऱ्यांना मिळाले ७४...पुणे  : साखर आयुक्तालयासमोर गेल्या तीन...
रोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात... नगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ...
लोणार तालुक्यात कडाक्याच्या थंडीमुळे...बुलडाणा : जिल्ह्यात द्राक्ष शेती टिकवून ठेवण्यात...
...त्या दिवशी घरातलं कुणी जेवलं नायसुपे, जि. पुणे : एकच बैल होता. चितऱ्या...
किमान तापमानात वाढ होण्याची शक्यतापुणे  : राज्याच्या किमान तापमानात वाढ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला जगात...पुणे - द टाइम्स हायर एज्युकेशनने जाहीर...
यंदा पाऊस, पीकपाणी समाधानकारक :...सोलापूर  ः यंदा पावसाचे प्रमाण पुरेसे राहील...
पहाटे, रात्री थंडीचे प्रमाण अधिक राहीलमहाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वत रांगावर १०१४...
पाणंद रस्त्यांची निविदा प्रक्रिया सुरू अकोला : शासनाच्या पाणंद रस्ते योजनेतून...
`साखर उद्योगातील संघटित गुन्हेगारी...मुंबई : गेल्या वर्षीच्या हंगामातील ७०-३०...
शासकीय दूध डेअरीत अमोनियाची गळतीअकोला : येथील मूर्तिजापूर मार्गावर असलेल्या...
कृषी योजनेतील विहिरींनाही दुष्काळाचा...धुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशात विहिरींनी...
नागपुरात `जलयुक्‍त`चा निधी आटलानागपूर : फडणवीस सरकारची महत्त्वाकांशी योजना...
मराठवाड्याची ७६२ कोटींची अतिरिक्‍त...औरंगाबाद ः शासनाने कळविलेल्या आर्थिक मर्यादेच्या...
नत्राच्या कार्यक्षम वापरासाठी सेन्सरचा...कृषी क्षेत्रातून होणाऱ्या नत्रांच्या प्रदूषणाची...