agriculture news in marathi, If the rates of fertilizer workers do not double, then the agitation | Agrowon

ऊसतोडणी कामगारांचे दर दुप्पट न केल्यास आंदोलन
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018
आमच्या संघटनेचा साखर संघाशी करार होऊन सात वर्षे झाली आहेत. मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी''चे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि साखर संघास भेटणार आहे. मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संप अटळ आहे.
- गहिनीनाथ थोरे-पाटील, अध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी वाहतूक मुकादम कामगार युनियन


२४ ऑक्‍टोबर २०१५ ला पाच वर्षांसाठी साखर संघाशी करार झालेला आहे. कराराची अजून एक वर्ष मुदत बाकी आहे. काही ऊसतोड कामगार संघटनांनी संप पुकारला आहे. मात्र, आमची संघटना त्या संपात सहभागी होणार नाही.
- प्रदीप भांगे, महासचिव, महाराष्ट्र राज्य ऊसतोड कामगार मजूर व मुकादम संघटना
माळीनगर, जि. सोलापूर : महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी वाहतूक मुकादम कामगार युनियनने विविध मागण्यांसाठी यंदा संपाचे हत्यार उपसले आहे. मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपाचा इशारा या संघटनेने दिला आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य ऊसतोड कामगार मजूर आणि मुकादम संघटनेने या संपात सहभागी होणार नसल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी वाहतूक मुकादम कामगार युनियन १९८६ मध्ये स्थापन झालेली संघटना आहे. राज्यातील १२ लाख ऊसतोडणी कामगार या संघटनेशी निगडित आहेत. राष्ट्रवादी काॅँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याशी १५ ऑक्‍टोबर २०११ ला झालेल्या चर्चेतून या संघटनेचा साखर संघाशी करार झाला होता.
दरम्यान, यंदा राज्यात जवळपास ११ लाख हेक्‍टर क्षेत्रातील ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. उसाचे वाढते क्षेत्र लक्षात घेता यंदाचा गाळप हंगाम एक ऑक्‍टोबरपासून सुरू होण्याचे संकेत आहेत. मात्र, ऊसतोडणी कामगारांचा संप झाल्यास गाळप हंगाम लांबण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे राज्यातील कारखान्यांपुढे पेच उभा राहण्याची चिन्हे आहेत. 

 

 ऊसतोडणी कामगारांच्या मागण्या
  •     ऊसतोडणी कामगारांच्या दरात आणि मुकादमांच्या कमिशनमध्ये दुप्पट वाढ करावी.
  •     शासनाने जाहीर केलेली २०१४ -१५ची  २० टक्के दरवाढ मिळावी.
  •     पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील ऊसतोडणी कामगार सुरक्षा विमा योजनेची अंमलबजावणी करावी.

इतर ताज्या घडामोडी
सातारा जिल्हा बॅंक देणार मध्यम मुदत...सातारा :  स्थापनेपासून गेल्या ६८ वर्षांत...
औरंगाबादेत हिरवी मिरची ४००० ते ५०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
जळगाव : खरिपाचा रासायनिक खतपुरवठा रखडलाजळगाव : रासायनिक खतांचा खरिपासंबंधीचा पुरवठा...
दुष्काळी मदतीची गावनिहाय माहिती जाहीर...मुंबई  : राज्यातील बहुतांश...
पाण्यासाठी भीमा नदीपात्रात ठिय्या आंदोलन मांडवगण फराटा, जि. पुणे  : घोड आणि...
निम्‍न दुधना धरणाच्या पाण्यासाठी...परभणी : दुष्काळामुळे मानवत तालुक्यातील दुधना...
‘उजनी’काठच्या शेतकऱ्यांची पिके...भिगवण, जि. पुणे   ः प्रशासनाच्या...
पुणे जिल्ह्यातील धरणे तळाशीपुणे  : जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा...
अकोल्यातील खरीप आढावा बैठक...अकोला  ः शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या...
दुष्काळ निवारणासाठी सातारा जिल्हा...सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्‍...
फळबागेत पाणी साठवण कुंड कोकणातील जांभ्या जमिनीमध्ये पाण्याच्या निचऱ्याचे...
फणस लागवड  उष्ण व दमट हवामान फणस पिकाला मानवते....
ऊसवाढीच्या टप्‍प्यानुसार द्या पुरेसे...जमिनीच्या प्रकारानुसार योग्य ठिबक सिंचन पद्धतीची...
पोटदुखीवर पेटाराच्या सालीचा काढा उपयुक्तस्थानिक नाव    : पेटार, पेटारी,...
उष्ण, कोरडे हवामान मॉन्सून वाटचालीस...महाराष्ट्राच्या पश्‍चिम भागावर १००८ हेप्टापास्कल...
भंगाराम तळोधी येथे राइसमिलवर कारवाईचंद्रपूर ः कृषी विभागाला मिळालेल्या गोपनीय...
परभणीत कोबीला प्रतिक्विंटल १२०० ते २०००...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
नाशिक जिल्ह्यातील ५४३ गावांची...नाशिक ः गावठाण निश्‍चितीसाठी गावांमध्ये ग्रामसभा...
नाशिक : टँकरने पाणीपुरवठ्यासाठी जीपीएस...नाशिक : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती अधिक जाणवू...
अनुदानाअभावी चारा छावण्या संकटातबिजवडी, जि. सातारा : माण तालुक्‍यामध्ये १९७२...