agriculture news in marathi, If there is a doubt in weight of sugarcane, then send the SMS to the district collectors says Subhash Deshmukh | Agrowon

उसाच्या वजनात शंका वाटल्यास, जिल्हाधिकाऱ्यांना मेसेज करा
सुदर्शन सुतार
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

पंढरपूर, जि. सोलापूर : "साखर कारखानदारांनो शेतकऱ्यांच्या मापात पाप कराल, तर याद राखा गाठ माझ्याशी आहे, असा दम देत यापुढे प्रत्येक साखर कारखान्यातील ऊस वजनकाट्यांची तपासणी करण्याचे आदेश वजन मापे नियंत्रण अधिकाऱ्यांबरोबरच जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. उसाच्या वजनाबाबत शंका आल्यास थेट जिल्हाधिकाऱ्यांना मेसेज करा, त्याची तातडीने दखल घेऊन कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले.

पंढरपूर, जि. सोलापूर : "साखर कारखानदारांनो शेतकऱ्यांच्या मापात पाप कराल, तर याद राखा गाठ माझ्याशी आहे, असा दम देत यापुढे प्रत्येक साखर कारखान्यातील ऊस वजनकाट्यांची तपासणी करण्याचे आदेश वजन मापे नियंत्रण अधिकाऱ्यांबरोबरच जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. उसाच्या वजनाबाबत शंका आल्यास थेट जिल्हाधिकाऱ्यांना मेसेज करा, त्याची तातडीने दखल घेऊन कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले.

गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा ३८ वा ऊस गळीत हंगामाचा प्रारंभ सहकारमंत्री देशमुख यांच्या हस्ते झाला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, खासदार धनंजय महाडिक, कारखान्याचे अध्यक्ष आमदार भारत भालके, सहकार शिरोमणीचे अध्यक्ष कल्याणराव काळे, भाजपचे जिल्हा अध्यक्ष शहाजी पवार, उपाध्यक्ष राजेंद्र जगदाळे, संजय कोकाटे, शिवाजी कांबळे, कारखान्याचे उपाध्यक्ष लक्ष्मण पवार, संचालक भगीरथ भालके उपस्थित होते.

सहकारमंत्री देशमुख म्हणाले, "साखर कारखान्यांत उसाचे वजन कमी दाखवले जाते, अशा अनेक तक्रारी आहेत. त्यानुसार साखर कारखान्यांतील वजनकाटे तपासणीसाठी जिल्हाधिकारी, वजन, मापन नियंत्रण अधिकारी आणि महसूल विभागातील एक अधिकारी यांना संयुक्त अधिकार दिले आहेत. त्यांच्यामार्फत हंगामात कधीही कारखान्यांचे वजनकाटे तपासले जाणार आहेत.

उसाला पाण्याची आवश्‍यकता अधिक असून, उपलब्धता पाहता शेतकऱ्यांनी कमी पाण्यात कमी क्षेत्रात अधिक उत्पादन देणाऱ्या उसाची लागवड करावी. शेतीसाठी पुरेशी वीज उपलब्ध होण्यासाठी उजनी धरणावर तरंगता सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. टेकफेडरल या कंपनीने हा प्रकल्प उभाण्याची तयारी दर्शवली आहे.''

लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत याविषयी सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. येत्या काही महिन्यांत प्रकल्पाचे काम सुरू होईल, असे मंत्री देशमुख यांनी सांगितले. कारखान्याचे अध्यक्ष आमदार भारत भालके यांनी प्रास्ताविकात कारखान्याच्या गाळप हंगामाचा आढावा घेत सर्वांबरोबर ऊसदर देणार असल्याचे नमूद केले.

इतर बातम्या
कोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज... पुणे : पश्‍चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि...
`दुष्काळाबाबत उपाययोजनांसाठी स्वतंत्र...पुणे  ः दुष्काळ आणि योजनांच्या माध्यमातून...
वऱ्हाडात काही ठिकाणी अवकाळी पाऊसअकोला : वऱ्हाडात मंगळवारी (ता.२०) सकाळ पर्यंतच्या...
साताऱ्यातील प्रमुख धरणांत ७१ टक्क्यांवर...सातारा  ः जिल्ह्यातील सर्वत्र प्रमुख...
वर्धा जिल्ह्यातील प्रकल्पांत ४० टक्के...वर्धा : यंदा समाधानकारक पावसाचा अंदाज हवामान...
धुळे जिल्ह्यात अवकाळी पाऊसधुळे : शहरासह धुळे तालुक्‍यातील पश्‍चिम पट्ट्यात...
अमरावती जिल्ह्यात रब्बीचे ५० टक्‍के...अमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस...
मराठवाड्यात उपयुक्‍त पाणी उरले केवळ २५...औरंगाबाद : दुष्काळाच्या झळा तीव्र झालेल्या...
सांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...
नाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...
मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसाची...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
मालावी देशातील हापूस पुण्यात दाखलपुणे ः दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी देशातील...
वनामकृवि आणि महाअॅग्रोमध्ये सामंजस्य...परभणी ः कृषी विस्तार कार्याअंतर्गत सार्वजनिक-...
सोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊससोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी...
नव्या सहकारी संस्थांना भागभांडवल :...नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था...
पुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांत काही...पुणे ः पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान...
हिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व...
संगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस,...संगमनेर, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
अॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे  : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...
कोल्हापुरात ऐन हंगामातच गुऱ्हाळघरे शांतकोल्हापूर  : यंदा गूळ दरात काहीशी वाढ...